Sunday, 18 November 2018

*टाइमबँक*

          स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका  ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

          मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

          एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम  आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

          सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

          ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच*करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ वकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

*बघा विचार करुन*

हा लेख मी वाचला, मला संकल्पना आवडली म्हणून लेख स्वतः टाईप केला आहे. काही शाब्दिक चुका असतील त्या माझ्या आहेत.
(लेखकाचे नाव माहित नाही.

Tuesday, 18 September 2018

Rajendra Dakhane

*अडगळीत_गेलेले_शब्द*
.
.
‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की *‘अडगळ’* हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.
.
.
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.
.
.
जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. *ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर* हे शब्द विसरायला झाले आहेत.
.
.
*माळा* (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
.
.
तसंच आता *व्हेंटिलेटर* फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.
.
.
*‘वळचण’* हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
.
.
*पागोळं* म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात - ती पागोळी.
.
.
*‘फडताळ’* ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. *खुंटी, कोनाडे, देवड्या* हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
.
.
जुन्या घरातील *न्हाणीघर* (बाथरूम) असंच. ऐसपैस *चुलाण्यावर* पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी *चौरंग,* अंग घासायला *‘वज्री’, ‘घंगाळ’* असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
.
.
गृहिणीची *कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या* सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
.
.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला *‘आगवळ’* म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
.
.
.

स्वयंपाकघरातील *चूल* गेली त्याचबरोबर *चूल,वैल,निखारे* हे शब्दही गेले.
.
.
स्वयंपाकघरातील *सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज* हे शब्द आठवेनासे झाले.
.
.
*ओगराळं* हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
.
.
*पंचपाळे, चौफुले, कावळे* हे सगळे हरवले.
.
.
देवघराबरोबर *सहाण, गंधाची थाटी* गायब.
.
.
*‘काथवट’* हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
.
.
कपड्यांचा विचार करताना *तठव,जाजम,बसकर, सुताडे* सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
.
.
पण उत्तरवस्त्र *‘पाभरी’* हरवून गेली.
.
.
सोवळ्यात नेसण्याची *‘धाबळी’* सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
.
.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
.
.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण *कणग्या, ढोल्या* - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.
.
.
*सूप* खुंटीवरून बाउल मधे आलं.
.
.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे *‘पेव’* खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
.
.
जेवण्याची *पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक* वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर *पिकदानी* सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ *अडकित्त्याचा* हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला *चोप* म्हणत असत..घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला *बैठक* असायची ,तिला *ढाळज* किंवा *ढेळज* म्हणत..हे पण अडगळीतील नावे आहेत ...
.
.
.
लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच....
( Rajendra Dakhane

Saturday, 15 September 2018

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
            *सन: ७/२/१९५८*

      *.... गणपतीचे रहस्य ....*

(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)

   पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा

_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._

_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._

_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._

_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._

_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._

_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._

_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._

_चित्त आणि मल्ल._

_चित्त म्हणजे शरीर,_ 
_मल्ल म्हणजे मळ._

_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावूनपार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला._

_तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे._

_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!_

_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??_

        *…अष्टविनायक…*

_जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला._

_म्हणजे दुखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत._

_मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले._

_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे._

_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपति सुखकर्ता दुखहर्ता होउ शकतो काय...???_

_काल्पनिक गणपतिने बुद्धत्व प्राप्त करुन दुक्खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही._

_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???_

_बुद्धाने दुक्ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत._

_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपति हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे...!!!_

_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले..._

          *…मोरया…*

_पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्रह्मंनानी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या._

_मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे....!!!_

_कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे._

_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!_

_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली._

_ब्रह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर_

_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले._

_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._

_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._

_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._

_कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता._

_पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला._

_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला._

_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि  सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात._

_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो._

 *- प्रबोधनकार ठाकरे*
    *सन: ७/२/१९५८*

Vijay sir 👌👌👍

Tuesday, 11 September 2018

वॉटस्ॲपवरून पाठवलेली -- पुणे, मराठी इ.इ.

*#पुणे*

हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले 'यम'नियमही स्वतंत्र आहेत.

वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता 'अमृततूल्य' म्हणतो

पुणे-मुंवई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. - गुगलवर मराठी टाईप करताना अद्  भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, 'गणपती बघायला आले आणि इथेच राहिले' या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत
चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी -

*एका वाक्यात उत्तरे द्या*
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

*खालील विषयांवर निबंध लिहा -*
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार - अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

*सविस्तर उत्तरे द्या -*
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

*हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. -*
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३.  पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

*योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा - (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) -*
१. पुणेकर ..... असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले ...... आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ..... आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ..... असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे.
पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे.

*पुण्यवान पुणेकर*

Tuesday, 4 September 2018

विवेकवाद
आभाळ का पडत नाही?
गोष्ट आहे विनोबांची.  आज तीव्रतेने आठवण झाली. ऐका –
एका गावातल्या एका तरूणाला एकदा प्रश्र्न पडला की डोक्यावरच्या या आभाळाला टेकू द्यायला खांब नाहीये, पण मग ते पडत कसं नाही?
या प्रश्र्नाने त्याच्या मनात घर केलं. त्याची तहान, भूक, झोप, शांती आणि इच्छाशक्ती हरवून गेली. साधू-संत, देवऋषि-महर्षि, गुरूजी-पुजारी आणि सर्व देवभक्त सर्वांना विचारून झालं. कोणालाच उत्तर ठाऊक नव्हतं.
एकदा त्या गावात एक अवलिया आला. दिसत होता भिकारी, पण तेजस्वी! गवकरी म्हणाले ‘जा त्याला विचार तुझा प्रश्र्न’. हा गावकरी गेला त्याच्याकडे.
म्हणाला “तुम्ही देव पाहिलाय का हो? ह्या आभाळाला खांब नाहीये आणि तरी ते कोसळत नाहीये आपल्यावर. सगळे म्हणतात की ते देवानं पेललंय. मला तर बुवा हा देव काही मला भेटला नाही की कोणाला दिसला नाही. तुम्ही इतके हुशार दिसताय, मला एव्हढं उत्तर द्या की.”
अवलिया गालातल्या गालात हसला. त्याला उत्तर ठाऊक होतं. पण ते उत्तर मिळवण्यासाठी एक कठोर परीक्षा द्यावी लागणार होती. गावकरी तयार झाला. अवलिया म्हणाला “उद्या सकाळी लवकर उठ. हातात वाडगा घे. प्रत्येक घरात भीक माग. पण एक अट आहे. कोणतंच घर वगळायचं नाही. घरासमोर उभा राहून हाक मारायची. घरातलं जे कोणी बाहेर येईल त्याला जोरजोरात येतील त्या शिव्या द्यायच्या. हात उगारायचा नाही. सगळी घरं संपली की काय काय घडलं ते मला जसंच्या तसं सांगायचं. परीक्षा कठीण आहे. पूर्ण केलीस तर आभाळ कोणी पेललंय ते कळेल.”
गावकरी अचंबित झाला पण उत्तराची आशा इतकी प्रबळ होती की तो तयार झाला. सकाळी लवकर निघाला. पहिल्या घरासमोर उभा राहून “जरा खायला दे गं माऽऽऽय”, अशी हाक दिली. मायमाऊली हातात भाकरी घेऊन बाहेर आली. या पठ्ठ्यानं शिव्या द्यायचं काम सारू केलं. त्या माऊलीनं त्याला बेदम चोपून काढलं. आणि हाकलून दिलं. बिचारा! तसाच पुढं गेला. उत्तर हवं होतं ना! गावातल्या प्रत्येक घरात हेच घडलं.
मार खाऊन अर्धमेला झाला. अंगावरचे कपडे फाटले. अंधार पडायला लागला. पोटातली भूक सहन होईना. परत निघाला. वाटेत एक मिणमिणता दिवा दिसला. एक झोपडं दिसलं. वाटलं बस्स आता. आता मार खायची हिम्मत नाही. ऐनवेळी अवलियाचा चेहरा आठवला. उत्तराची अपेक्षा वाढली. पाय ओढत ओढत झोपडीपाशी आला. हाक मारली. एक म्हातारी बाहेर आली. यानं शिव्यांची लाखोली सुरू केली. मार खायच्या तयारीत तिच्याकडे बघत होता. तेव्हढ्यात ती म्हातारी पुढं आली. त्याच्या दंडाला धरलं. म्हणाली “अरे येड्या, दमलेला दिसतुयस, जरा आत ये, बस, पाणी पी, भाकरी न् भाजी खाऊन घे. मग काय त्या शिव्या दे.”
गावकरी रडू लागला. खाण्याआधीच त्याचं पोट भरलं होतं. नंतर शिव्या द्यायचं तो विसरून गेला. त्या अवलियाकडे परत जायला निघाला. मनात म्हणाला ‘एव्हढं सगळं झालं पण तो देव किंवा आभाळाला पेलणारा कोणी भेटला नाही.’
अवलियाला सर्व कथा इत्यंभूत सांगितली.
अवलिया म्हणाला, “बाळा, तुझी दृष्टी अधू झालीये. ती म्हातारी आहे ना, ती म्हणजे विवेकाचं प्रतीक आहे. तिनं नुसतं बोट लावलंय आभाळाला. त्यामुळे ते पडत नाहीये. तिच्यात तुला देव दिसेल नीट पाहिलस तर!”


Saturday, 25 August 2018

*एक वेगळा अनुभव*
उत्तम पडियार
ग्राफॉलॉजिस्ट

तुरुंगात एक कैदी गेली ४ ते ५ वर्ष खुनाच्या case मध्ये आहे. तो माझ्या कडून थेरपी घेतोय.
काल मला त्यांनी विचारलं "मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो का?" मी त्यांच्या प्रश्नांसमोर प्रश्न विचारला "का, वैताग आला का?"
त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो, मुद्दाम त्यांच्या शब्दात वर्णन करतो "एका महिन्यात माझी जामीन होण्याची शक्यता आहे, मला ही थेरपी पूर्ण केल्याशिवाय जायची इच्छा नाही"
ज्या व्यक्तीने गेली ४,५ वर्ष घर बघितलं नाही, मोकळ आभाळ बघितलं नाही, त्या व्यक्तीला बाहेर जाण्यापेक्षा जास्त काळजी थेरपी पूर्ण करण्याची आहे.

केलेल्या कामाची पावती याहून अधिक चांगली कोणाला मिळाली नसावी.

मी भाग्यवान आहे, graphology ला धन्यवाद

उत्तम पडियार
९४२३६४७०७८
*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*

Monday, 20 August 2018

*समुपदेशन...*
*एक चांगला मेसेज* अभय शरद देवरे


मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक  परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, "या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या." पण मी त्यांना म्हटलं की "असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही." त्यावर ते म्हणाले, "नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील." शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्‍यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या पण तेसुद्धा स्वीकारले.  कारण तो शिकायला आलेला होता. जरी त्याचे वडील म्हणाले होते की मुलाला तुम्ही काहीही देऊ नका तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते.  महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला तेंव्हा तो नाराज झालेला दिसला पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले. शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी  माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन ! त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ' माती, पंख आणि आकाश ' हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश ! पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले.
नाराजीने त्याने पगार घेतला आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.
हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात. त्याने एक उदाहरणही दिले. सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे.  मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील. आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले शिवाजीमहाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात...... अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ? पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ?  त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.
या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे. एकापत्य संस्कृतीत नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण.  मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही. दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे असे वाटते. 

*@ अभय शरद देवरे*
मराठी माणसाने बनवलेली सामान्यांची कार -
‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने. शंकरराव कुलकर्णी त्यांचं नांव. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं. इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. कारची किंमत होती १२००० रुपये. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिन देखील भारतीय बनावतटीचं होतं. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या १५ जणांच्या टीमसोबत १९४५ मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केलं. १९४९ मध्ये शंकररावांनी या कारचं पहिलं मॉडेल तयार केलं. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसं बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून ५ मॉडेल त्यांनी बनवले. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक होता एम.एच.के.१९०६. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. १९७५ साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. परंतु लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे  पुढे या प्रकल्पाचं पुढं काहीच होऊ शकलं नाही. मीरा कारचं मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती, तसंच अनेक शासकीय परवानग्या देखील गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय त्याच काळात सुजुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरु करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं.
वॉटस् ॲपवरून

Saturday, 14 July 2018

हिंदू राज्य म्हणजे काय? नरहर कुरूंदकर

"हिंदुराज्य म्हणजे काय?" - हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे. भारतीय संविधानात स्मृतींच्या कायद्याविरोधी कोणताही कायदा असणार नाही व जो कायदा स्मृतींच्या विरोधी जाईल, तो कायदा रद्दबातल होईल, असे कलम समाविष्ट करण्यास हिंदुत्ववादी तयार आहेत काय? धर्मशास्त्राप्रमाणे हिंदुराज्य करायचे, तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत. अस्पृश्यांचे सगळेच हक्क रद्द करून त्यांना शिक्षणबंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि राजसत्तेने ब्राह्मण अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदु-धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्यरचना हिंदुत्ववादींना मान्य आहे काय? कारण खऱ्या अर्थाने हिंदुराज्य म्हणजे हिंदू प्रजेची संविधानाने स्वीकारलेली व पुरस्कारलेली गुलामी! इस्लामिक स्टेटची कल्पना याहून निराळी नाही. इस्लामिक स्टेट बिगरमुसलमानांना अधिकार देत नाही, हे केवळ अर्धसत्य झाले. इस्लामिक स्टेट धर्मशास्त्राप्रमाणे मुसलमानांनाही अधिकार देत नाही. अधिकार फक्त धर्मपंडितांचे  उलेमांचे; व हेही अधिकार निरपवाद नाहीत. ते मुस्लिम धर्मशास्त्राला सापेक्ष आहेत. हिंदुराज्य म्हणजे हिंदूंची गुलामी, मुस्लिम राज्य म्हणजे मुसलमानांची गुलामी, मग इतरांची गुलामी त्या (दोन्ही प्रकारच्या) राज्यांत अंतर्भूत आहेच.हे सत्य पाहूनही हिंदुराज्याची कल्पना स्वीकारार्ह वाटणार आहे का?

  - नरहर कुरुंदकर [`जागर' (१९६९) पृ १७३]

Tuesday, 10 July 2018

लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*
*मुंबई व इतर शहरे का बुडतात ?* *सतत दुर्घटना का घडतात ?*
अॅड. गिरीश राऊत

 या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खुप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासुन दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.

*मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल*. मात्र मुंबईच्या  काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडले गेले आहे.
सन १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगर पालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की *मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे.* त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो.

६४ च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, कीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी. *परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०•०३ एकर एव्हढेच उरले आहे.* त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.

मुंबई, सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. सन १७८४  सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणा-या सागरातील पहिल्या भरावाचे ( रेसकोर्सपासुन पायधुणीपर्यंत ) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती.  या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी  केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील  असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. *त्याचबरोबर महापूराकडे वाटचाल होत राहिली.*

मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनि:स्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या  दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाऱ्या  मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. *तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते*. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा  जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पूराच्या दिशेने वाटचाल झाली. उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती,  नरिमन पॉईंट, लोखंडवाला  काँम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव,  वांद्रे - कुर्ला संकुल इत्यादी भराव. यातील शेवटच्या 'वांद्रे - वरळी'  सागरी  पुलाच्या, मिठी नदीला गाडणाऱ्या, सागरात जाण्यापासुन अडवणार्या भरावाने व खांबांनी, मुंबईसाठी एका मोठ्या दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे. काँक्रीटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरत्यांना नाहक दोष दिला जात आहे. २६ जुलै २००५ रोजी महापूराच्यावेळी सायंकाळी दुपारी साधारण ३• ३० पासुन रात्री १०• ३० वाजेपर्यंत मोठी ओहोटी होती. भरती नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या आंधळ्या विकासाचे समर्थक प्रसारमाध्यमांद्वारे जनतेची दिशाभूल करतात याची जाणीव असावी.

उत्तरेकडील  बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासुन ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळ पर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या  तीन खाडी टेकड्यांपासुन ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज,  सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतुन माहीमच्या खाडीत येते. या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव ( त्यापैकी सुमारे ७०० एकर  मॅनग्रोव्ह गाडून ) करून नष्ट केली गेली. तेथून ते पाणी   माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम  काॅजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱ्या  प्रभादेवी, दादर - शिवाजी पार्क, माहीम व  वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला 'सी लिंक' प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.

*माहीमची खाडी व माहीमचा  उपसागर हे मिठी नदीच्या मुखाचे,  मॅनग्रोव्हचे जंगल असलेले, शहराच्या गाभ्यातील  क्षेत्र हा मुंबईची मूळ बेटे आणि उपनगरे यामधील दुवा आहे.* शहराच्या जीवनरेखा असलेल्या तीनही रेल्वे माहीमच्या खाडीच्या खाजण क्षेत्रातून जातात.  पूराच्या  दुर्घटनांच्या निवारणाच्या द्रृष्टीने तो अतिशय महत्वाचा  आघातशोषक आहे. परंतु याची जाणीव नियोजनकर्त्यांना नाही.
केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे  बुडत आहेत. नागपूरातही तेच  घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला 'मुंबई', त्यानंतर २८ ऑगस्टला 'न्यू ऑर्लीन्स व त्या पाठोपाठ 'शांघाय' सन २००५ मधे बुडाली.

अमेरिकेत 'ह्यूस्टन' शहरासह  पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे  'हार्वे' नाव दिलेले अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० कि मी वेगाचे  चक्रीवादळ आठवडाभरात दोनदा आदळले. अशावेळी खाड्या, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याची व सागरी रस्ते व भुयारी रेल्वे,  रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.

 *तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बाॅन येथे झालेल्या युनोच्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते जाहीर झाले आहे. एव्हढा 'कार्बन डाय ऑक्साईड' वायू  वातावरणात साठला आहे की, त्याच्या उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे तापमान वाढतच राहणार आहे. कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश तात्काळ  न थांबवल्यास मानवजात व जीवसृष्टी या शतकात नष्ट होणार आहे. म्हणजे *औद्योगिकरण व शहरीकरण हा शाप ठरला आहे.*

महासागरांचे पाणी आणि पर्वत व धृव प्रदेशांवरील बर्फाची, वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची    रूढ अभिसरण पध्दती मोडली आहे. प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे.* त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे. शहरे 'उष्णता बेट' परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या सागराच्या पातळीतील वाढीमुळे  मुंबई, न्यूयाॅर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. आपल्याकडे मात्र तापमानवाढीला अधिक वेग देणाऱ्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई  नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत. प्रसारमाध्यमे हितसंबंधामुळे किंवा त्यांचा सहभाग असल्यामुळे
याला हातभार लावत आहेत. आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.

मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या 'आय पी सी सी' ने हे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. *मेट्रो प्रकल्प व त्यातही  'मेट्रो - 3' हा भुयारी रेल्वे प्रकल्प व 'सागरी रस्ता' हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज  आहे. *माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्व देणे ही चूक आहे.* कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायट्यांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.

वांद्रे - कुर्ला संकुल, मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वांत खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील  रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील    कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले. तेथील इमारतींच्या  तळ मजल्याच्या वर  संकुलाच्या  रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही. असा रस्ता म्हणजे देखील दुर्घटनेला समजुन उमजून आमंत्रण आहे.

आम्ही वरळी-वांद्रे सागरी पुल प्रकल्पाविरूध्द प्रखर आंदोलन केले. मच्छीमारांनी वांद्रे  भूशिराच्या जवळ समुद्रात, क्रेनमधुन टांगलेल्या एक - दोन टन वजनाच्या मोठ्या  दगडांखाली सतत आठ -दहा दिवस होड्या व बोटी लावुन, जीव धोक्यात घालून भराव थांबवला. मुंबई वाचवण्यासाठी  वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागांत व प्रभादेवीच्या समुद्रात भराव करू दिला नाही. माहीम काॅजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला  भरावाचा काही  भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढुन टाकावयास लावल्या. माहीमच्या खाडीत झोपडपट्ट्या करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बर्‍याच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५ च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

*मुंबईला आता  doing ची नसून  undoing ची गरज आहे.* सी लिंक प्रकल्प मुंबईसाठी संकट आहे. तो बंद करून काढून टाकावा. माहीम काॅजवे ते वांद्रे भूशिरापर्यंत केलेला भराव व त्यावरील रस्ता ( येथे पूल बांधला नाही ) हा मागास व हास्यास्पद आहे. त्यामुळे समुद्राची कोंडी होऊन भरत्या मुंबईच्या पर्जन्यवाहिन्यांमधुन उलट शहरात शिरतात. पूर्ण वांद्रे - कुर्ला संकुल ( बी के सी )   मिठी नदीच्या मूळ प्रवाहासह, सागराच्या भरती व ओहोटी रेषांमधील क्षेत्राला गाडून उभे आहे. अशा स्थितीत सर्व नाले , नलिका स्वच्छ आहेत,  गाळ  प्लास्टिक इ. घनकचर्यापासुन मुक्त आहेत, अशी कल्पना केली तरी मुंबई बुडणार आहे. सर्व शहर जलमय झाल्यावर पंप काय कामाचे. साठलेले पाणी एका ठिकाणी उचलून, टाकणार कोठे ? बी के सी मधील इमारती न बांधलेला भरावाचा भाग तर तातडीने काढून टाकावा. जमिनीच्या किंमतीचा विचार करू नये.

'मेट्रो ३ भूयारी रेल्वे' हा बोगस प्रकल्प आहे. तो नियोजनात नव्हता. कोणत्याही वाहतुक अभ्यासाने त्याची शिफारस केली नाही. 'हा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता', हे  याबाबतचे न्यायालयाचे विधान चुकीचे आहे. एम एम आर डी ए ने नागरिकांना दिलेल्या पत्रात कारणे देऊन, मुंबईत भूयारी रेल्वे करू नये असे म्हटले आहे. त्यात मुंबई बुडण्याचे कारणही आहे. प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी म्हणतात की, हरित ऊर्जा वापरू. याबाबत नागरिकांनी किती वीज वापरली जाणार ? व ऊर्जेबाबत  इतर माहिती विचारली. यावर, मेट्रो ३ हा प्रकल्प सुरू झाल्यावर ही माहिती देऊ असे मासलेवाईक, बेजबाबदार उत्तर एम एम आर सी एल कडून मिळाले. या प्रकल्पात ६७३ झाडे तोडली जातील असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात सुमारे १५००० पेक्षा जास्त झाडे आतापर्य॔त तोडली गेली. माहीमच्या खाडीतील मॅनग्रोव्ह जंगल तोडले गेले. सन २०११ मधे या प्रकल्पाचा खर्च २४ ३४० कोटी रू. दाखवला आहे. तो आता वाढत ५००००  कोटी रूपयांवर गेला असा अंदाज आहे. तो अजून वाढेल.  प्रकल्पामुळे मुंबईकरांचे आताच हाल होत आहेत. ९०  ते १२० फूट खोल असल्याने भविष्यात तो मुंबईकरांना बुडवून मारणार आहे असे दिसते. एलफिन्स्टन पुलावर दिवसाढवळ्या घडणारी दुर्घटना हाताळता येत नाही तर १०० फूट खाली माणसांना कसे वाचवणार ?

 फक्त २००० कोटी रूपयात बेस्ट बसचा ताफा दुप्पट, तिप्पट करून व कर्मचार्यांचे   इतर प्रश्न सोडवून मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. गेल्या ३० वर्षांतील सर्व अहवालांनीदेखील बसला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. पण त्याविरूध्द जाऊन अनावश्यक बांधकामयुक्त महागड्या प्रकल्पांचा मारा करण्यात आला. याला बहुतेक मुंबईकरांची, स्वतःला आधुनिक मानून, पटकन खुळावली जाणारी  तंत्रज्ञान संमोहित मानसिकतादेखील कारण आहे. प्रकल्पकर्ते तिचा खुबीने वापर करतात. मुंबईत ठिकठिकाणी जमीन खचत आहे हे दिसत असताना मेट्रो ३  प्रकल्प होऊ दिला तर नंतर अश्रू गाळून उपयोग नाही.
प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याची व तो रद्द करण्याची गरज आहे.

बर्याच  नागरिकांना युरोप, अमेरिकेचे वेड आहे.  तेथील जीवनशैली येथे यावी म्हणून ते आसुसलेले आहेत. त्यावर बोट ठेवून, आपण काहीही खपवू शकतो अशी संबंधित राजकारणी, नोकरशहा, कंपन्या, अभियंते इ. ना खात्री आहे. ते कोणतीही घातक गोष्ट करताना, आपल्याला विकास नको का ? आपण मागास राहणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर नागरिक मागे हटतात व आपण प्रगतीचे विरोधक ठरू नये या भावनेने पूर्ण चुकीच्या प्रकल्पाला विकास मानून, होकार देऊन बसतात.
नागरिकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कृपया याला नकारात्मक विचार समजू नये. *हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱ्या  पृथ्वीची जपणुक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे.* आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक, निराशावादी विचाराचा माणुस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.

तापमानवाढीचे सतत भान हवे. *दर वर्षी १/५° से म्हणजे पाच वर्षात १°से अशी  इतिहासात कोट्यावधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व  वाढ पृथ्वीच्या  सरासरी तापमानात होत आहे.  फक्त येत्या  ४ वर्षांत  सन १७५० च्या तुलनेत २°से ची वाढ  होत आहे.  माध्यमे सांगतात त्याप्रमाणे सन २१०० मधे नाही. मानवजात वाचविण्यासाठी केलेला  'पॅरिस करार' अयशस्वी ठरत आहे.* भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कॅनडात आत्ता उष्णतेची अभूतपूर्व लाट चालू आहे. आतापर्यंत ५०  च्या वर माणसे मरण पावली. जपानमधे तासाला चार इंच असा ऐतिहासिक विक्रमी पाऊस पडत आहे. महापूर आला आहे. ३० लाख  नागरीकांना सुरक्षित जागी हलवले जात आहे व ५० ००० माणसे सुटका करण्याच्या कामाला लावण्यात आली आहेत. या घटनांची जाणीव हवी. त्याऐवजी राजकारण, मनोरंजन, युध्द, उद्योग, तंत्रज्ञान, अर्थव्यवहार अशा बिनमहत्वाच्या हानिकारक  गोष्टीत जग गुंतले आहे.

 विकासाच्या संमोहनातुन तात्काळ बाहेर पडणे आवश्यक आहे. *मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली  जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तरच  कार्बनचे उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश थांबेल.  तसे केले नाही तर औद्योगिकरण कोसळण्याच्या प्रक्रियेबरोबर जीवनही नष्ट होईल.* आशियातील औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या  मुंबईतील दुर्घटना मोठ्या अनर्थाची नांदी आहेत.
धन्यवाद,

आपला
गिरीश राऊत

निमंत्रक : मुंबई रक्षण समिती / भारतीय जीवन व   पर्यावरण चळवळ

दू. क्र. ९८६९ ०२३१२७ व्हाॅ. अॅप.
         ०२२ २४३७८९४८
कृपया सर्वत्र पाठवा.

Sunday, 24 June 2018

योग दीना निमित्त -अशोक पानसरे, हैद्राबाद.

योग वैदिक कि अवैदिक??
**********************

योगशास्त्र हे वैदिकांचे नसून अवैदिकांचे आहे. ते श्रमण परंपरेतून विकसित झालेले आहे. परंतु सध्या योग पतंजलीच्या नावावर खपवला जात आहे. स्वतः पतंजली योगशास्त्र बौद्ध विद्यापीठात शिकला. पतंजली आपल्या भाष्यात म्हणतो, "योगशास्त्रे सांख्य प्रवचने", म्हणजे योग सांख्यांचा आहे असे तो स्वतः कबूल करतो. सांख्य तत्वज्ञान हे निरीश्वरवादी दर्शन आहे. त्यांनी उपनिषदातील ब्रम्ह नाकारून सृष्टीच्या उत्पत्तीला प्रकृती आणि पुरुष कारणीभूत आहेत हा सिद्धांत मांडला. "प्रकृती हे सृष्टीचे अव्यक्त(Hidden) रूप आहे, त्यात विकृती निर्माण झाली की सतत परिवर्तने होऊन त्यातून विविध मूलद्रव्य निर्माण होतात. नवीन असे काहीच निर्माण होत नाही, उलट जे अव्यक्त स्वरूपात आहे तेच व्यक्त स्वरूपात प्रदर्शित होत राहते." सांख्य तत्वज्ञानाचा प्रवर्तक कपिलमुनी आहे, त्यानेच बुद्धाच्या कपिलवस्तु या नगराची रचना अक्षपटा सारखी केली.

कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात म्हणतो की योग बृहस्पतीचा आहे. बृहस्पती चार्वाक परंपरेतील आहेत म्हणून तेही निरीश्वरवादी आहेत, त्यांनी वैदिकांच्या तीन वेदांची खिल्ली उडवलेली आहे.
"त्रयो वेदस्य कर्तारा भंड धूर्त निषाचरः"

हिंदू धर्माचे आद्यशंकराचार्य आपल्या शांड्करभाष्य या ग्रंथात बुद्धाला "योगाणाचक्रवर्ती" म्हणत आहेत!!

सांख्य निरीश्वरवादी, बृहस्पती निरीश्वरवादी, बुद्ध निरीश्वरवादी.

मग योग कुणाचा? वैदिकांचा कि अवैदिकांचा?

अशोक पानसरे, हैद्राबाद.

Wednesday, 30 May 2018

कोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश

पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी भारतीय पत्रकारितेतील सर्वात विलक्षण प्रयोग नुकताच पार पाडला. हा प्रयोग म्हणजे खरतर भारतीय शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठा व क्रांतिकारी अविष्कार आहे. प्रयोगाचे नाव कोब्रापोस्ट ने ठेवले आहे ऑपरेशन १३६. या प्रयोगाचे निष्कर्ष अर्थातच मुख्य प्रवाहातील मीडिया साफ दाबून टाकण्याचा यत्न करेल, परंतु भारतातील अगदी नावाजलेल्या वृत्तपत्र समूहांची नैतिकता काय लायकीची आहे याचे सांगोपांग दर्शन घडविणारा कोब्रापोस्टचा हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपणा सर्वांचीच आहे.

आचार्य अटल असे नाव धारण करून, सफेद कुर्ता, धोतर,” राधे राधे” छापलेली रेशमी उपरणे अशा अवतारात पुष्प शर्मा नामांकित वृत्तसमूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मालकांना भेटला. मी झुंझुनू राजस्थान येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून नंतर आयआयटी दिल्ली व आयआयएम बेंगलोर येथून उच्चं शिक्षण घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात सेटल झालो, मी एक इ गेमिंग कंपनी स्कॉटलंड मधून चालवितो परंतु मुळात माझी कमिटमेंट हिंदुत्वाशी आहे. उज्जैन येथील एका आश्रमाशी मी जोडलेला आहे. भारतात हिंदुराष्ट्र कायम व्हावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत, आणि त्यासाठी हात सोडून खर्च करायची आमची तयारी आहे. बोला आपण आमच्या अजेंड्यावर काम कराल काय? त्यासाठी काय किंमत घ्याल अशी विचारणा आचार्य अटल या बड्या प्रसारमाध्यमांतील अधिकारी/मालकवर्ग/पत्रकार/ संपादक अशा मंडळीकडे करीत असे. या सर्व मुलाखती शर्माने गुप्त कॅमेरावर रेकॉर्ड केल्या. कोब्रापोस्टने हे व्हिडियो आपल्या पोर्टल वर टाकले. २४ मे २०१८ रोजी या स्टिंग ऑपरेशनचा दुसरा भाग प्रकाशित व्हायचा होता, दैनिक भास्कर या वृत्त समूहाने उच्चन्यायालयात धाव घेऊन त्यांना बेनकाब करणारे व्हिडियो प्रकाशित करण्यास मनाई करणारा हुकूम आणला.
बर, तर परत एकदा आचार्य अटलने नेमकी काय गाजरे या प्रसारमाध्यमांना दाखविली याकडे वळू. आचार्य अटल देशभर फिरला. हिंदुत्वाची सुपारी घ्यायची तयारी एखाद्या मीडिया हाऊस ने दाखविली की आचार्य अटल आपल्या प्रसार मोहिमेचा नेमका आराखडा मांडत असे. व त्यातील प्रत्येक बारकाव्यावर साधक बाधक चर्चा करून कंत्राट स्वीकारणारे मीडिया हाऊस या मोहिमेतील हरेक पायरी कंत्राट देणाऱ्यास अभिप्रेत आहे त्या प्रकारे पार पाडेल यावर सहमती मिळवत असे. त्यानंतर हे करण्यासाठी किती मोबदला कोणत्या स्वरूपात द्यावा लागेल यावर आचार्य अटल या महानुभावांबरोबर घासाघीस करीत असे.
आचार्य अटलने या सर्वच नामचीन वृत्तसमूहांसमोर, साधारण एकच प्लान ठेवला. त्यात सुरवातीचे काही महिने या वृत्तसमूहांनी त्यांना ‘पुरविण्यात’ येणारा कन्टेन्ट आपल्या वृत्तपत्रात, वाहिनीवरून “पेरायचा” होता. हा कन्टेन्ट साधारणपणे भाजपाच्या राजकीय विरोधकांची, विशेषतः राहुल गांधी, मायावती, अखिलेश, लालू यांची प्रतिमा मालिन करणाऱ्या वृत्तांच्या स्वरूपात असणार होता. या बरोबरीने पहिले तीन महिने मृदू हिंदुत्ववादी लाईन सदर वृत्तसमूहाने घ्यावी अशी अपेक्षा होती. जसजशी २०१९ ची निवडणूक जवळ येईल तसतसे सरळ सरळ भाजपाच्या बाजूने पक्षपाती बातम्या छापाव्यात/ प्रसारित कराव्यात अशी अपेक्षा होती.
आपल्याला नेमका कशा प्रकारचा अपप्रचार करून हवाय, हे स्पष्ट करण्यासाठी मुलाखतीच्या सुरवातीलाच आचार्य अटल दोन ध्वनिमुद्रित जिंगल्स वाजवून दाखवायचा. त्यातील पहिल्या जिंगल मध्ये एक नेता एका शेतकऱ्याला विचारतोय की तुमचे पाय एवढे मळलेले कसे काय? शेतकरी म्हणतो, बेटा, शेतात माती असते, पाय तर मळणारच. नेता म्हणतो- अरे असं आहे काय? काय काळजी करू नका भाऊ, मी निवडून आलो कि सगळ्यांच्या शेतात फरशी बसवून देईल. त्यावर एक धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.
दुसऱ्या जिंगल मध्ये एका गावकऱ्यांस एक नेता विचारतो, की तुम्हाला गावात काय सुविधा हव्यात? गावकरी सांगतो, बाकी वीज पाणी रस्ते सर्व काही आहे, पण स्मशानासाठी फार लांब जावे लागते. नेता सांगतो “बिलकुल काळजी करू नका. मी निवडून आलो कि प्रत्येक घरात एक स्मशान बांधून देईन” . परत धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.

आचार्य अटल पुढे सांगायचा कि गेल्या निवडणुकीत आमच्या “संगठन का” बजेट ८००० कोटी होते, या खेपेस ते खूप जास्त असणार आहे. पैशाची कमी नाही, प्रचार बरोबर झाला पाहिजे. वृत्तसमूहातील धुरिणांना शर्माचे एकूण रूप, भाषा, व “प्रपोजल’ पाहून समोर सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच बसल्याचा भास होत असे. त्यातील अनेकांनी हावऱ्या प्रमाणे आचार्य अटलचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून टाकला, काहींनी तर हा हिंदुत्ववादी अजेंडा अजून कसा चांगल्याप्रकारे राबविता येईल याबद्दलच्या आपल्या कल्पना आचार्य अटलला इमेल करून कळविल्या.

सध्या “राष्ट्र्वादा” ची चलती आहे. हिंदुत्ववादी मालकांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी स्वतःस सुसंगत करून घेण्याची चढाओढ मीडिया मधेही स्पष्ट दिसून येते. सरहद्द विरहित पत्रकार या जागतिक संघटनेने केलेल्या २०१७ सालच्या सर्व्हेत, लेखन स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत १३६ व्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे.

कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वतःवर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते.

याहून महत्वाचे निरीक्षण खुद्द पुष्प शर्माने नोंदविले आहे. आचार्य अटल या नावाने भेटीगाठी झाल्यानंतर, ज्या वृत्त समूहांनी आचार्य अटलचा अजेंडा राबविण्यास होकार दिला होता, त्याना पुष्प शर्माने परत फोन करून अजून चित्रविचित्र मागण्या समोर ठेवल्या. कॅम्पेनचा भाग म्हणून, अरुण जेटली, मनेका गांधी, वरुण गांधी, जयंत सिन्हा, मनोज सिन्हा यांची प्रतिमा मालिन करायचे काम हाती घायचे होते. शेतकरी चळवळी व निदर्शने हे माओवाद्यांचे कारस्थान आहे असे रंगवायचे होते. त्यानंतर सिव्हिल सोसायटीमधील, नागरी हक्कांसाठी आग्रही असणाऱ्या प्रशांत भूषण, दुष्यन्त दवे, इंदिरा जयसिंग अशा मंडळींची बदनामी करणारी मोहीम चालवायची होती. त्यानंतर न्यायव्यवस्थेच्या “न्यायी” भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बातम्या, कन्टेन्ट प्रसृत करायची मागणी होती.
आपल्या “राष्ट्रवादी” प्रसार माध्यमांनी आचार्य अटलच्या ह्या मागण्या पूर्ण करण्यास साफ नकार दिला असे जर तुम्हाला वाटले असेल, तर तुम्ही अतिशय भाबडे आहात. हे सर्व करण्यास आपली प्रसार माध्यमे एका पायावर तयार झाली. याचा अर्थ एवढाच, की ही मंडळी स्वतःच्या बापाचीही नाहीत. पुरेसे पैसे मिळणार असतील तर हे लोक कसलीही मोहीम चालवितील.

टाइम्स ग्रुप हा भारतातील सर्वात शक्तिशाली मीडिया हाऊस आहे. त्यांचे टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आज १७९ वर्षाचे आहे. जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश वृत्तपत्र असा त्याचा लौकिक आहे. सर्व आवृत्या मिळून त्याचा रोजचा खप तीन करोड च्या वर आहे. टाइम्सचा पसारा मोठा आहे. त्यांची पाच वृत्तपत्रे आहेत, एकतीस मासिके आहेत, बत्तीस रेडियो स्टेशन्स आहेत. एकूण ११ हजार कर्मचारी इथे काम करतात. निर्भय व निरपेक्ष पत्रकारिता टाइम्स ग्रुप मध्ये केली जाते असा एक सर्वसामान्य समज भारतात आहे. अशा या नामचीन वृत्तसमूहाचा पर्दाफाश पुष्प शर्माने कोब्रापोस्ट मध्ये केलेला आहे.
फक्त टाइम्स ग्रुपचं नाही तर वृत्तव्यवसायातील दिग्गजांना पुष्प शर्माने उघडे पडले आहे. या यादीत कोण नाही ? इंडिया टीवी, दैनिक जागरण, सब टीवी, अमर उजाला, समाचार प्लस, पंजाब केसरी, एच एच एन २४ X ७, स्वतंत्र भारत, स्कुपव्हूप, रेडीफ, टीव्ही १८, हिंदुस्थान टाईम्स, ए बी पी न्यूज, भारत समाचार, लोकमत, इंडिया टुडे ग्रुप, के ग्रुप, न्यू इंडियन एक्सप्रेस, स्टार इंडिया, या सगळ्यांनाच पुष्प शर्माने अक्षरशः नागडे केले आहे. यातील प्रत्येकाची पुष्प शर्मा बरोबरची सविस्तर मुलखात कोब्रा पोस्टच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
बाकी इंडिया टीव्ही ,ए बी पी न्यूज वैगेरेच स्टिंग ऑपरेशन पाहून आपल्याला धक्का बसायचं कारण नाही. पण टाइम्स ग्रुप जर अशा तर्हेची ‘म्याटर’ वाजवत असेल, तर आपल्या लोकशाहीचा एक आधारस्तंभ किती ठिसूळ झालेला आहे याची कल्पना येते. पुष्प शर्माने केलेले टाइम्स ग्रुप मधील स्टिंग ऑपरेशन इथे मुद्दाम सविस्तर देत आहे.

रेडियो मिरची हा एफ एम चॅनेल हा टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा आहे. भारतातील अडतीस शहरात लोक सकाळ दुपार संध्याकाळ हा चॅनेल ऐकत असतात. हा एफ एम चॅनेल जाहिरातीसाठी अव्वल समजला जातो कारण करोडो लोकांपर्यंत तो रोजच पोचत असतो. प्रदीप व्ही या रेडियो मिरचीच्या जाहिरात विभागाच्या प्रमुखा बरोबर झालेल्या मुलाखतीचे स्टिंग कोब्रापोस्ट वर आहे. शर्मा या प्रदीप व्ही ना सांगतात की आम्हाला आमचा राजकीय अजेंड्यास पूरक असा ‘कंटेन्ट’ तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसृत करायचा आहे. “म्हणजे नक्की कसा कन्टेन्ट ?” प्रदीप व्ही विचारतात. शर्मा त्यावर काँग्रेस व राहुल गांधींची प्रतिमा मालिन करण्याचा प्लॅन नीट उलगडून सांगतात. त्यावर प्रदीप व्ही जी काही प्रतिक्रिया देतात त्यावरून कळते की हे चारित्र्य हननाची सुपारी घ्यायला ते एका पायावर तयार आहेत, एवढेच नाही तर हेच काम ते अगदी अलीकडे पर्यंत ते व्यवस्थित पार पाडत आलेले आहेत. प्रदीप व्ही उत्साहाने सांगतात की अहो हे काम निवडणूक काळात आम्ही उत्तम केलेले आहे. भाजपाची अशा स्वरूपाची इतकी कँपेन आम्ही चालवलीत, इतकी कँपेन चालवलीत, की आता मला नेमका आकडाही सांगता येणार नाही. एक मॅडिसन नावाची एजेन्सी होती, त्यांच्या मार्फत हे काम आम्हाला मिळत असे. इथे पुष्प शर्मा शिताफीने या प्रदीप व्हीना बोलत करतात. प्रदीप व्हीच्या तोंडून अशी माहिती बाहेर पडते कि खुद्द भाजपाच्या कमिटीने एका एजेंसी मार्फत रेडियो एफ एम ला कंत्राट दिले होते. प्रदीप व्ही पुढे शर्माला सांगतात कि थेट व्यहवार करण्यापेक्षा आचार्य अटलच्या आश्रमाने एखादी त्रयस्थ एजेन्सी धरावी व त्यांच्या बरोबर पैशाचा व्यहवार करावा. त्या त्रयस्थ एजेंसी बरोबर आम्ही – म्हणजे रेडियो एफ एम, व्यहवार करेल, रोकडित व्यहवार करायचा असेल तर उत्तमच. ते सगळ्यांनाच सोयीचे पडेल.

त्यानंतर पुष्प शर्मा रेडियो मिरचीच्या पाटणा ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना भेटला. त्यापैकी रेडियो मिरची पटना चे प्रमुख प्रभू झा यांनी तर शर्मास सांगितले की त्यांना ज्या तर्हेचे काम हवे आहे, उदाहरणार्थ गीतेतील श्लोक उचलून ते सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य म्हणून वापरायचे व त्यातून भाजपा विरोधकांची प्रतिमा मालिन करणारा संदेश बिंबवायचा, हे काम करण्यासाठी मी तुमची भेट आमच्या स्क्रिप्ट रायटरशी घालून देतो. तो एक नंबर काम करून देईल . आचार्य अटलला भेटून या प्रभू झा यांना बंधुप्रेमाचे भरतेच आले, त्यांनी शर्मन सांगितले की, अहो मी पण आर एस एस चाच माणूस आहे. तुमचे काम म्हणजे माझे काम. मी काय, आमचे इकडचे प्रोग्राम हेड काय, आमची जडण-घडण संघातच झाली आहे. गेल्या खेपेस सुद्धा आम्ही इथे भाजपाची प्रचार मोहीम चालविण्याचे कंत्राट घेतलेच होते की. प्रभू झानी शर्माला असेही सांगितले कि आमची अख्खी टीमच “त्याच” विचाराची आहे. आम्ही सगळी माणसे, त्यांची पार्श्वभूमी पाहूनच घेतो, त्यामुळे तुम्हाला दहा ठिकाणी जायची गरज नाही. तुमचं टार्गेट फक्त सांगा, आणि टार्गेटची प्रतिमाभंजन करण्याचे काम माझी क्रिएटिव्ह टीम चोख पार पाडेल.

पुष्प शर्मा एवढ्यावर थांबला नाही, त्याने नंतर मंगलोर ऑफिस मध्ये एरन डिमेलो बरोबर हिंदुत्वाचा अजेंडा, करमणुकीच्या कार्यक्रमांतून गुंडाळून कसा पेश करता येईल याची चर्चा केली. खरतर डिमेलोंनेच त्याला सांगितलं की आम्ही थेट टीका नाही करू शकणार नाही पण मनोरंजनाच्या कार्यक्रमातून हा पेड प्रचार किंवा अपप्रचार बेमालूमपणे पेश करता येईल. त्यानंतर शर्मा गुवाहाटीला जाऊन टाइम्सच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंशुमन डे यांना भेटला. डे कडे शर्माने बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न काढला. डे त्याला म्हणाले कि असे इश्यू एक तर संपादकीयातून मांडता येतील किंवा “प्रायोजित” संपादकीयातूनही रेटता येतील. तुम्ही कंटेन्ट द्या, आम्ही तो बरोबर वृत्तपत्रीय भाषेत सादर करू. मीडिया जगतात या प्रकाराला “ऍडव्होटोरियल” या नावाने ओळखले जाते. पण डे सारखा शर्माला आम्ही तुमची जाहिरात कशी करत राहू त्याचे मार्ग सांगत राहिला. शर्माने जेव्हा विरोधकांवर वार करण्याची गोष्ट काढली तेव्हा डे त्याला म्हणाला की ते फार सावधानीपूर्वक करावं लागेल.

त्यानंतर शर्मा हैदराबाद येथील टाइम्सचा डेप्युटी जनरल मॅनेजर, विजय भास्कर रेड्डी यांना भेटला. रेड्डी स्वतःच हिंदुत्ववादाने भारून गेलेले होते असे शर्मास वाटले, लव्ह जेहाद चा मुद्दा तापवत ठेवणारी एखादी मोहीम सुरु करायची झाली तर तुम्ही सहकार्य कराल का असे शर्माने त्यांना विचारले. रेड्डी म्हणाले “हो जायेगा” ! या नंतर शर्मा, दिल्ली रेडियो मिरचीचे मुख्य अधिकारी विजय प्रताप सिंग याना भेटला. चंदीगढचे डेप्युटी मॅनेजर विशाल गुलेरी यांची भेट घेतली पुढे लखनौ मध्ये नवभारत टाइम्सचे चीफ मॅनेजर बिपीनकुमार याना भेटला. सगळेच “धंदा” करण्यास आनंदाने तयार होते. बिपीनकुमार तर शर्माना म्हणाले की मोदी शहा जोडगोळी आमच्या पेपर वर नाराज आहे. त्यामुळे सरकारी जाहिराती पूर्वीसारख्या मिळत नाहीत. विरोधकांचे चारित्र्यहनन करून मोदी शहांची मर्जी संपादन करता आली तर चांगलेच आहे.

या सगळ्या स्टिंग ऑपरेशनचा कळस म्हणजे शर्मा थेट टाइम्स ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट संजीव शाह व त्यापाठोपाठ टाइम्स ग्रुपचे सर्वेसर्वा विनीत जैन यांना भेटला. संजीव शाह याना शर्माने आपला अजेंडा श्रीकृष्ण व भगवद गीतेपासून सुरवात करून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्याचा असल्याचे स्वच्छ शब्दांत सांगितले. संजीव शहा यावर “करेक्ट, करेक्ट, बस वही” असे उदगार काढत राहिले. त्यानंतर शर्माने विनीत जैन यांची भेट घ्यायची वार्ता सुरु केली, त्यावर संजीव शहा जरा आढेवेढे घेऊ लागले. म्हणाले, की मी एकदा विनीत बरोबर बोलून घेतो, कस आहे, की आम्ही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. ही मिटिंग अतिगुप्त ठेवावी लागेल.

त्यानंतर शर्माला विनीत जैन यांची अपॉइंटमेंट मिळाली, परंतु तत्पूर्वी संजीव शहाबरोबर अजून एक मिटिंग पार पडली. संजीव शहा त्यांना म्हणाले की विनीत माझ्यावर जाम उखडलाय, कारण मी या सगळ्यात पैशाचं काही ठरवलंच नाही. विनीत जैनना तुमचा एकंदर अजेंडा दाखविल्यावर त्यांचं म्हणणं पडलं की हे राबवायचे किमान हजार कोटी द्यावे लागतील. मी म्हंटले काय विनीत, हजार कोटी कोण देईल, कस शक्य आहे ? तर विनीत म्हणाले ठीक आहे, पण ५०० कोटीच्या खाली बातच करू नका. अखेरीस शर्माची विनीत जैनबरोबर भेट करून देण्यात आली. जैन त्याला म्हणाले की तुमचा अजेंडा वैगेरे ठीकच आहे, परंतु आमची विश्वासार्हता यात पणाला लागेल , त्यामुळे आम्हाला वरवर तरी आम्ही समतोल राखत असल्याचे दाखवावे लागेल. अशी एकारली भूमिका घेता येणार नाही. पण हा समतोल असल्याचा दिखावा साधत तुमचा अजेंडा राबवावयास आमची हरकत नाही. शर्मा यांच्या भाजपच्या राजकीय विरोधकांवर प्रच्छन्न टीका करण्याच्या प्रस्तावावर जैन यांची काही हरकत दिसली नाही. जैन यांच्या भेटी नंतर शर्माची भेट परत एकदा संजीव शहा बरोबर होते. या भेटीत शहा त्याला ५०० करोड रुपयाचे “एस्टीमेट” देतात. वर, टाइम्स प्रकाशने रोज ७ करोड लोकांपर्यंत पोचत असल्याने, हि किंमत कशी वाजवी आहे ते सुध्दा सांगतात.

शर्मा त्याला या पाचशे करोड पैकी एक तृतीयांश रक्कम रोकड स्वरूपात स्वीकाराल का अशी विचारणा करतात. संजीव शहांकडे सगळ्या प्रश्नांवर तोडगे तयार आहेत. ते म्हणतात कि आपण त्रयस्थ मध्यस्थ कंपनीच्या माध्यमातून रोकड रक्कम सफेद करून घेऊ शकतो.  या नंतरची भेट शर्मा, संजीव शहा व विनीत जैन यामध्ये होते. जैन फारसे बोलत नाहीत, संजीव शहाच शर्माना, ते देणार असलेली रोख रक्कम टाइम्सच्या खात्यात सफेद होऊन कशी आणता येईल हे सोप्या भाषेत समजावून सांगत राहतात. विनीत जैन मध्ये मध्ये फक्त हुं, हुं करताना ऐकू येते.

कोब्रापोस्ट ने टाइम्स वृत्तसमूहावर केलेल्या हल्ल्याची कहाणी इथे संपते. खर तर कोब्रापोस्टने हे ऑपरेशन इतर कैक वृत्तसमूहांवर केले आहे, पण घाव जिव्हारी लागलाय टाइम्सच्या. दे वर कॉट पँट्स डाउन ! गेल्या आठवड्यात कोब्रापोस्ट ने टाइम्सवरील स्टिंग ऑपरेशन अगदी विनीत जैन व संजीव शहा यांच्या व्हिडियोसह प्रसिद्ध केल्यानंतर टाइम्सने या पुष्प शर्माची अख्खी कुंडली खणून काढली. पुष्प शर्माला २००९ साली दिल्ली पोलिसांकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्याबद्दल अटक झाल्याची बातमी टाइम्सने २८ मी रोजी छापली. पुष्प शर्मा हा ब्लॅकमेलर असून त्याने जो काही “पुरावा” कोब्रापोस्ट वर व्हिडियोच्या रूपात टाकला आहे तो संपादित असून वेगवेगळे तुकडे जोडून मुद्दाम टाइम्स व इतर प्रतिष्ठित वृत्तसमूहांची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे असा दावा टाइम्स ने केलेला आहे. टाइम्सच्या दाव्यात तथ्थ्य असेलही, पण आश्चर्य एवढ्याच गोष्टीचे वाटते की एक टीनपॉट ब्लॅकमेलर सरळ उठून टाइम्स ग्रुपच्या कॉलरला हात घालतो, टाइम्स ग्रुपच्या विश्वसार्हतेलाच सुरुंग लावतो आणि टाइम्स ग्रुप त्यावर कायदेशीर कारवाईची नोटीसही काढत नाही, प्रत्युत्तरादाखल हा माणूस स्वतःच कसा फ्रॉड आहे याचे रिपोर्ट देत राहते. यातच सत्याचे किती अंश कोणाच्या बाजूने आहेत याचा अंदाज येतो.

कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वतः किती स्वच्छ आहे याची प्रचिती कोब्रापोस्ट च्या ऑपरेशन १३६ ने आपल्याला दिली आहे.


तीर्थराज सामंत
लेखक राईटअँगल्सचे नियमित वाचक व हितचिंतक आहेत.

Saturday, 26 May 2018

सध्या अनेक लोक "न्यूड" ह्या फिल्मचे कौतुक करताना दिसतात. एखादी फिल्म आवडण्या/ नावडण्या साठी प्रत्येकाची अनेक वैयक्तिक कारणं असू शकतात.एखाद्या स्त्री पत्राला केंद्रस्थानी ठेवणारी फिल्म मराठीत क्वचितच येते. म्हणून मी कुतूहलाने 'न्यूड' पाहिला. त्यातल्या कलाकारांचा अभिनय, गाणी व cinematographyह्या बाबी मला आवडल्या. पण संपूर्ण सिनेमा मात्र आवडला नाही, कारण आशयाच्या मांडणीत कमतरता भासली. आज Shilpa Kamble ने "न्यूड" बद्दल जे लिहिलेेआहे - बरेचसे तसेच माझ्याही मनात येऊन गेले. म्हणून तिने लिहलेले इथे copy करीत आहे. -
 न्यूड ( २०१८) या बहुचर्चीत चित्रपटाला गोवा फिल्म फँस्टीवलला उद्घाटनच्या वेळी झालेला विरोध, परिक्षण मंडळाच्या सुरवातीच्या नकारानंतर ए सर्टीफिकेट मिळवून या चित्रपटाचे झालेले प्रदर्शन या गोष्टीने प्रभावीत होवून मोठ्या अपेक्षेने चित्रपट पहायला गेले, अपेक्षाभंग झाला. पण हे काही नवीन नाही, असे होते कधीमधी आपण चित्रपट पहायला जातो आणि तो फसलेला असतो. न्यूड चित्रपटाने त्यापेक्षा काहीतरी भंयकर केले होते. त्यातील प्रतारणा अधिक सहेतुक होती.त्यामागे राजकारण होतं , सिनेमाचं अर्थकारण होतं, आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे दाभिंकपणा होता .आता हा दाभिंकपणा नेमका काय आहे त्याचा विचार करूया. हा दाभिंकपणा उघड होण्यासाठी या चित्रपटाचे sexual politics काय आहे ते समजून घ्यावे लागेल.’गायनोक्रिटीसिझम’ या एलिन शोवाल्टर यांनी प्रचलीत केलल्या समीक्षेपद्दतीत लेखक स्त्रीपात्रांना कोणत्या विचारव्यूहातून रेखाटतो याचा अभ्यास केला जातो.व त्यामागची अन्यायकारी पुरूषप्रधान विचारपद्धतीची चिकित्सा केली जाते. विल्यम शेक्सपीयर यांच्या Taming of the Shrew मधील गर्विष्ट व नाठाळ नायिका कँथरिना हिला वठणीवर आणण्यासाठी तिचा नवरा Petruchio शाररीक हिंसा, उपासमार, माहेर वर्ज्य, एकाकीपणा, शाब्दीक छळ असे अनेक आयुधे वापरतो.ज्या आधुनिक कथनानुसार घरगुती हिंसाचार या सदरात मोडल्या जाणाऱ्या आहेत. व हा सर्व छळ सहन केल्यानंतर नायिका तिच्या ‘योग्य स्थानी’ येते व व्यवस्थित वागू लागते. या नाटकाचे त्याप्रकारची चिकित्सा पाश्चात्य जगात झालेली आहे. व ती मौलिक स्वरूपाची आहे.तर या पार्श्वभूमीवर आपण न्यूड या चित्रपटाकडे वळूया.
या चित्रपटातील नायिका यमुना, तिची मावशी चंद्राक्का या सोलापूर,पंढरपूर या बहुतेक भागातील मागास समाजातील स्त्रिया आहेत ( भंडारा ,गोंदिया या भागातही हे काम होते पण त्यांची बोलीभाषा इथे वापरलेली नाही. )कारण यमुना जे बिडी वळण्याचे काम करते ते याच भागात चालते व समाजातील गरीब गरजू व प्रामुख्याने मागास, दलित जातीतील बायका हे काम करतात. पेहलवानी करणारा नवरा हा जरी उच्चवर्णीय व उच्चवर्गीय असण्याची शक्यता असली तरी मग त्याची बायको घराबाहेर असंघटीत क्षेत्रात रोजगार मिळवण्याची शक्यता फार कमी आहे.तर भाषा , व्यवसाय, शिक्षण,राहणीमान,मुंबईतील झोप़डपट्टीतील निवारा यावरून हा तर्क बळकट होतो की ग्रामीण भागातील खालच्या जातीच्या स्त्रिया या चित्रपटाच्या कथानकाच्या वाहक आहेत.( उदा.काकस्पर्श-२०१२ या चित्रपटातील केशवापन हि ब्राम्हण स्त्रियांचा विशेष अनुभव आहे.त्या अनुभवावर आधारलेली ती ऱ्हदयस्पर्शी गोष्ट आहे.)
या चित्रपटाची कथावस्तू त्याचे गृहीतत्व सरळसरळ ....स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंतकाळाची माता आहे . या पितृस्ताक विचारसरणीवर आधारलेली आहे. उदा. या चित्रपटातील नायिका यमुना हि जेव्हा पहिल्यांदा जे.जे. मध्ये न्यूड म्हणून पोझ करण्यासाठी येते तेव्हां तिचे मानसिक द्वंदव चाललेले असते. त्यावेळी नेमका कँमेरा एका आईमुलाच्या फ्रेमवर स्थिरावतो. मग ही यमुना आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तिला मान्य नसलेला व्यवसाय स्वीकारते.मग ज्या शरीरातून दुसऱ्या शरीराचा जन्म झाला त्या शरीराचे भांडवल करून तिला उदारनिर्वाह करावा लागतो. इथे शरिरविक्रीशी संबधित कार्यकर्तीने नमूद केलेला किस्सा आठवतो ज्यावेळी एखादी महिला मारहाण ,धमकी इत्यादी गोष्टी केल्यानंतरही शरिरविक्रय करण्यास विरोध करते तेव्हां तिचे दलाल व मालकिणी तिच्या मुलांना ओलिस ठेवतात व तसे केल्यानंतर ती महिला निरूउपाय होवून शरिरविक्रयास तयार होते. अगदी हाच मुद्दा मदर इंडिया(१९५७)या चित्रपटातही एका प्रसंगात आला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणारी नायिका ‘लाला’ या बनियाच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडत नसते पण जेव्हां तिची मुले भूकेने अन्न अन्न करून मरू लागतात तेव्हां ती त्याच्यासमोर शरणागती पत्करते .मात्र आयत्यावेळी अन्नाचा शोध लागून ती त्या दृष्कृत्यातून वाचते.
तर न्यूड या चित्रपटातील यमुना नवऱ्याशीही याच गोष्टीने संघर्ष करते की तिला तिच्या मुलाच्या फी भरण्यासाठी पैसे हवेत. आता यमुना ज्या गोष्टीसाठी घर सोडते त्याच गोष्टीसाठी जगही सोडते. तिच्या मुलाला चित्रकार बनवायचे तिचे (ते त्याचेही स्वप्न असते) स्वप्न भग्न पावते व तो आईला रांड म्हणतो .या धक्क्याने ती आत्महत्याचा निर्णय घेवून समुद्रात विलीन होते. म्हणजेच त्या नायिका अनंतकाळाची माताच असते.इथे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला अस्तित्व(२०१०) हा चित्रपट आठवतो. या चित्रपटाची विषय स्त्रीला विवाहबाह्य संबधातून झालेली अपत्य, त्यातून निर्माण झालेला ताण , व उद्धवस्त झालेले कुंटुब असा होता. या चित्रपटात स्त्रीचे स्वतःचे अस्तित्व म्हत्वाचे मानले होते व त्यामुळे नायिक मुलाच्या वाग्दत वधूचा आधार घेत घर सोडते. आपले जगणे संपवत नाही.
न्यूड चित्रपटात खालच्या जाती/वर्गातील स्त्री घेवून तिला वर्ण वर्चस्ववादी भूमिकेतून तयार झालेल्या पुरूषकेंद्री विषमतावादी मानसिकतेतून रेखाटले आहे. तिचे असे चित्रपटातून शोषण करतांना या चित्रपटाचा प्रपोंगडा मात्र असा करण्यात आला आहे की हा चित्रपट आधुनिकता मांडणारा, स्त्रीला मुक्त करणारा आहे. दुर्दैवाने हा चित्रपट खालच्या जाती/वर्गातील बाईचे कथनातून शोषण करणाराच आहे.इथे या चित्रपटात कला, कलेच्या स्वात्र्यांवर येणारा दबाव, झुंडशाही, या भारताला व संपूर्ण जगाला भेडसविणाऱ्या समस्यासंदर्भात काही विधाने केली गेलेली आहेत आणि ती चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत असे भासविले गेले असले तरी ती केद्रंस्थानी नाहीत.कारण एक जगविख्यात चित्रकाराचे दोन सीन, कलामहाविद्यालयावर झालेला हल्ला एक सीन, व महाविद्यालयातील प्रिसींपलचे सात-आठ वाक्य सोडल्यास धर्मसत्ता , संस्कृतीरक्षक यांना आव्हान देणारे काहीही या सिनेमात नाही.हा सिनेमा यमुना या पात्रावरच बेतलेला आहे.चित्रपटात या अर्थाचे एक वाक्य आहे... Just like medical students need bodies for post mortems, art students need nude models for studying painting.
आणि हीच आक्षेपार्ह गोष्ट आहे की कलेसाठी लागणारी ही न्यूड माँडेल्स जिवंत, हातपाय असणारी, चेतना असणारी माणसे आहेत.ती मेलेली शरीर नाहीत. या माँडेल्सवर बेतलेले तुमचे पात्र कितीही काल्पनिक असेल तरी त्याच्या प्रती तुमचे काही उत्तरदायित्व नाही का ? म्हणजे याच दिग्दर्शकाचा नटरंग( २०१०) हा तमाशातील नाच्याच्या जीवनावर बेतलेला चित्रपट घेवूया.यातील ‘गुणा’ हा कलावंत नायक त्याचा रोजगार गेल्याने तमाशाच्या धंद्यात येतो व इथे आल्यावर त्याला काही कारणास्तव नाच्याची भूमिका करावी लागते.या व्यवसायात त्याला मानहानी तर स्वीकारावीच लागते, पण त्याच्यावर शाररीक अत्याचारही होतो, त्याचे कुटुंब त्याला दुरावते,ग्रामस्थ वाळीत टाकतात,धंदा बुडतो पण अशा वेळी तो आत्महत्या करत नाही .तर पुन्हा तोच तमाशा सुरू करतो व त्यासाठी त्याला सहधर्मीही भेटते.मग जे नटरंगमध्ये झाले ते न्यूडमध्ये का झाले नाही....याचे कारण सरळ आहे तो ‘गुणा’ होता ही ‘यमुना’ आहे. आणि हेच ते sexual politics आहे.
जगभरात अनेक अर्थांनी नवीन जीवनमूल्ये देणारा ,शोषणाला नकार देणारा, कलात्मक व त्याचबरोबर आशयघन चित्रपट तयार होत आहे. भारतीय चित्रपटही हम(१९९१) मधील जुम्मा चुम्मा दे पासून पींक(२०१६) नो मीनस नो पर्यंत पोहचला आहे.इराणमधील circle ( 2010) हा इराणमध्ये त्यातील स्त्रीजीवनातील स्फोटक दर्शनाने इराणमध्ये बँन झालेल पण जगभरात गाजलेला चित्रपट पथदर्शी आहेच. पण तद्दन व्यावसायिक असलेल्या हाँलीवूडमध्येही वंशदेवषी वर्चस्ववादी वाह्यात नेत्याला ठणकावून सांगणारे नीडर कलावंत आहेत. मेरील स्ट्रीपने ज्या वाक्याचा पुनर्उच्चार केला की Take your broken heart turn it into Art .त्या वाक्याचा आधार घेतच हे विवेचन संपवते.ऱ्हदयाला सांधण्याची , अलटरनेटीव जग दृश्यमान करण्याची , सत्य निर्माण करण्याची ताकद चित्रपटासारख्या माध्यमात असते.न्यूड या चित्रपटाला हि संधी मिळाली होती.चित्रपट हे माध्यम अतिशय खर्चिक आहे. उत्कृष्ट कलावंत, कँमेरामन, संगीत , निसर्गरम्य लोकेशन ही सारी आयुधे असूनही हा चित्रपट दिशादिग्दर्शक होवू शकला नाही. आशयाच्या पातळीवर या चित्रपटाचे रसातळाला जाण्याचे कारण एकच- परकायाप्रवेश लेखकाला जमला नाही. हाडाचा कलावंत त्याच्या व्यक्तीगत संस्कारातून बाहेर येवून आपल्यापेक्षा भिन्न व्यक्तीला सामावून घेतो त्याच्या सहवेदनेला भोगू शकतो.व त्यातून त्याची पात्रे तयार करतो त्यांच्या जगण्याला अर्थ देतो.
पुन्हा पुन्हा ऐकलेले वाक्य इथे आठवत राहते..If you are caste blind then you are upper caste and if you are gender blind then you are male. मग सांगा आजूबाजूच्या वास्तवावर डोळे झाकून पडद्यावर रंग उधळणारी तुमची हि गोष्ट आंधळेपणाने आम्ही कशी पहावी ? व त्यातून काय अनुभव घ्यावा.

Shilpa A. Kamble Vandana Khare

Monday, 14 May 2018

मराठा महायोद्धा बाजीराव
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून
गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला
सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने
देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे
कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर....

त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!
बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित
होतं…
पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव
खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व
देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते.
असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव
उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.
बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर
इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून
उशीर झाला!"

ह्याला म्हणतात मराठी बाणा!

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने
बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…
आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय
आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार
असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…
इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..
जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल
बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…

घोड्यांच्या टापांनी हादरून
उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही
बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव!
हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही
पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये
विचारल,
"इधर कोई समाधी है क्या?"

" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"
असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड
होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!
कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,
"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?" रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे
कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…
ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम... जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर
असावीत!

सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!
अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....
सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि
आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक
दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर
नेणारा हाच तो......
बाजीराव!

गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित
स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती!
कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक
व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!........असो!
तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन!
डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!
आता काय करायच ह्या विचारत असताना एक
उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी
वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू!
असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची
जाणीव त्या दिवशी झाली!
आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!
आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून
आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?"
असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही
गोष्ट घडली खरी! असो!
मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"
"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे
म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम
बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या
खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले....

"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!
पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!!
इतका मान! इतका आदर!!

ते देखील पुण्याहून शेकडो
मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य!

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या!
ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे
देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी.......
"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न
विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे
निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा
गावठी ‘दादासाहब’ कुठे !

मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का
असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत
आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,
क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!

शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?
कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना
इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा....
पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि
आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!
परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण
विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!
बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत
परत ऐकू येत होते....

पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!
पेशवा सरकार!!!

मित्रांनो नक्की शेयर करा /|\
http://www.rational-mind.com/पेशवा-सरकार/

वाचल्या बद्दल धन्यवाद्
प्रांजल वाघ.

Tuesday, 8 May 2018

#आम्हीभारतीय
1. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचं लिखित स्वरूपातील पुस्तक आहे. भारताच्या प्रगतीच्या आड येणारी जातीव्यवस्था का आणि कशी नष्ट झाली पाहिजे याचा अभ्यासपूर्ण तपशीलवार उहापोह म्हणजे 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक. प्रथम प्रकाशन 1937. द्वितीय आवृत्ती 1944.

डाॅ. आंबेडकरांनी यात 'कम्युनल ॲवाॅर्ड' ही संकल्पना मांडली आहे. तसेच जातीव्यवस्था नष्ट करण्यासंदर्भात 26 मुद्द्यांची कारणमीमांसा केली आहे. या गोष्टीला 80 वर्षं होऊन गेली परंतु त्यात मंडलेले विचार आजही अप्रस्तुत वाटत नाहीत. किंबहुना आपण भारतीयांनी याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

जातीव्यवस्था का असू नये याची कारणे -
2. त्या त्या जातीची, वर्णाची, वर्गाची किंवा वंशाची शुध्दता राखण्यासाठी जातीव्यवस्था असावी असे सनातन धर्मवाद्यांचे म्हणणे होते. (किंवा असेलही). पण बहुतांश वंशशास्त्रज्ञ किवा अभ्यासकांना (डाॅ. डी.आर. भांडारकर सहित) हे मान्य नाही.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद-दुसरा अपवाद वगळता संकर झाला नाही असा कोणताच शुध्द म्हणावा असा वर्ण, वंश, जाती जगात आढळत नाही. अगदी ब्राह्मणसुध्दा त्याला अपवाद नाही. अशा प्रकारचा संकर होणे हे मानववंश उत्क्रांतीचे लक्षण आहे. म्हणजे या ना त्या कारणाने जाती शुध्दता रहात नाही.
 म्हणजे जाती-वर्ण-वंश शुध्दतेचे केले जाणारे समर्थनही पोकळ आहे. किंबहुना मानवाच्या उत्क्रांतीला अडथळा निर्माण करणारे आहे. थोडक्यात या कारणासाठीसुध्दा जातीव्यवस्थेचे समर्थन करणे चुकीचे आहे. चला तर मग आपण तरी आपल्या जातीचा त्याग करून मानववंशाची पाठराखण करू.

3. हिंदू हा एकसंघ समूह नसून अनेक जातींच्या समूहांचा समुदाय आहे. मुस्लीमांच्या आक्रमणापूर्वी 'हिंदू' हा शब्द अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी कोणत्याही संस्कृत लिखाणांमधे डाॅ. आंबेडकरांना हिंदू हा शब्द आढळला नाही.

इथे असलेल्या अनेक जाती-जमाती एकत्र नांदत नसल्यामुळे इथे ज्यांनी आक्रमण केले त्या मुस्लीमांनी सर्व समुदायांना मिळून 'हिंदू' असे नाव दिले. डाॅ. आंबेडकरांच्या मते इथल्या जाती-जमातींमधे कोणतीही देवाण-घेवाण नव्हती, रोटी-बेटी व्यवहार नव्हता.

इतकेच नाही तर सर्व सणवार, व्रतं-वैकल्य आणि रिवाज इ. प्रत्येक समूहात वेगवेगळी आणि वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जात. सर्व जाती-जमाती एकत्र येऊन सर्वांचा मिळून एक असा कोणताच सण वा कार्यक्रम नाही. त्यामुळे 'हिंदू' हा एकसंध नाही.

डाॅ. आंबेडकर त्यापुढे असं म्हणतात की, 'हिंदू' हे एक मिथक आहे. फक्त मुस्लीम वा ख्रिस्ती लोकांच्या विरोधात ते एकत्र येतात. त्यातही ज्या ज्या जमातींना हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्यावर अन्याय केला असे वाटते ते हिंदू विरोधात लढायचं पसंत करतात. या सर्व गोष्टी हिंदू म्हणवणार्या समुदायांना प्रगती करण्यापासून अवरोध करतात.

जाती-जातींमधली तेढ इतकी तीव्र आहे की त्यामुळे हिदू एकसंध रहाणे मुष्किलच. उच्च जाती विरूध्द नीच जाती हा लढा तीव्रच होत जाणार. म्हणूनच आपण आज तरी जाती नष्ट करायच्या असं ठरवणं देशाच्या एकसंधतेचच्या दृष्टीने महत्वाचे आहे. #आम्हीभारतीय

कारण -4 - बाबासाहेबांच्या मतानुसार हिदू धर्म हा समाजव्यवस्था (anti social) विरोधी आहे.

उदा. जाती, पोट जाती, उपजातीही एकमेकात मिसळायला तयार नाहीत. अगदी 1950 पर्यंत सुध्दा ऋग्वेदी देशस्त, यजुर्वेदी देशस्त, कोकणस्त, कराडे, सारस्वत, कायस्थ इ. इ. एकमेकात देवाण घेवाण करीत पण रोटी-बेटी व्यवहार करीत नसत.

असे काही जातीबाहेर विवाह झालेच तर त्यांना जातीबाहेर काढले जाई. आपल्या छोट्या बांधीव समूहात रहाणे हिंदू पसंत करतात. वाळीत टाकणे हा रिवाजही हिंदूंना जातीनिहाय एकटा पाडतो.

अशा घट्ट आणि कातीव किंवा बांधीव समाजाची सामाजिक प्रगती होत नाही. अमुकने शिकायचे नाही (स्त्रियासुध्दा), तमुकने संस्कृत वाचायाचे नाही, वेद, पूजा फक्त अमुकच लोकांनी करायची इ.इ. मुळे ज्ञानविस्तार होऊ शकत नाही.

ब्राह्मण सोडून इतर सर्व ज्ञानापासून वंचित राहिले. अशाने समाजबांधणीला अडथळा होतो. म् णूनच आपण जातीव्यवस्था मोडून काढू.

कारण 5 - ब्राह्मणवर्गाने स्वतःला उच्च वर्ग म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपलाच अघोषित कायदा अंमलात आणला.

त्यांनी नीच म्हणून ज्या ब्राह्मणेतर जाती ठरवल्या त्यांना उच्च वर्गात येण्यापासून रोखण्यासाठी आपणच जे अन्यायकारक  असे कायदे बनवले (conspired), ते त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांद्वारे इतर जातींवर लादले.

आंबेडकरांनी दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) आणि पाठारे प्रभू या दोन जातींची उदाहरणे दिली आहेत. या दोन्ही समाजांनी ब्राह्मण होण्यासाठी आपल्या काही रूढी-रिवाजात बदल केला. तेव्हा ब्राह्मण समाजाने पेशव्यांकडे तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर बंधने आणली.

यामुळे नीच  समजल्या जाणार्या जाती-जमातींकडे प्राप्त परीस्थितीत राहून स्वतःची प्रगती करून घेण्याच्या सर्व संधींपासून लांब रहावे लागले. शिक्षण नाही, अधिकचे कौशल्य मिळवण्याची संधी नाही, अन्यायकारक कायद्यांच्या बेडीतून सुटका नाही अशा अधःपतित अवस्थेत त्यांना रहावे लागले.

बाबासाहेब म्हणतात की यामुळे या नीच समजल्या गेलेल्या जातींचे मानवीहक्क पायदळी तर तुडवले गेलेच शिवाय या मनुष्यांना उन्नतीपासून रोखल्यामुळे या जातींचे, धर्माचे आणि देशाचे अतोनात नुकसान झाले. थोडक्यात नको हा असला अन्याय करणारा धर्म न् नको या जाती.
 6 -जातीव्यवस्थेमुळे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होणे शक्य नाही, त्यामुळे धर्म संकुचित रहातो.

जातींच्या जाचक अटींमुळे हिंदू धर्मीय धर्मांतर करू शकतात. प्रचार आणि प्रसार हे इतर धर्मांचं मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे इतर धर्मातून आलेल्या लोकांचा स्वीकार करायला हे धर्म उत्सुक असतात.

इतर लोकांना हिंदू धर्म आवडला आणि धर्मांतर करून हिंदू धर्मात यायचं असेल तर काही गोष्टींमुळे ते शक्य नाही. बाहेरची व्यक्ती हिंदू धर्मात यायची असेल तर तिला कोणत्याही जातीत सामावून घेता येत नाही, कारण जात ही जन्मावरच अवलंबून आहे.

जातीवरची बंधनं इतकी कडक आहेत की इतर कोणालाच कोणत्याही जातीत सामावून घेताच येत नाही. उदा. ब्राह्मण समाज हिंदू धर्मातल्या इतर जातीच्या कोणाला ब्राह्मण जातीत सामावून घेत नाही, तर इतर धर्मातील लोकांना ब्राह्मण जातीत घेणंच अशक्य.

या असल्या जाचक कायद्यांमुळे हिंदू धर्म वाढला नाही, किंबहूना हिंदूंमधील अनेक जाती-जमातींनी इतर धर्म जवळ केले. म्हणूनच असली जाचक बंधनं असलेला धर्म आणि जातींना आपण नष्ट केले पाहिजे.

 7 - डाॅ. आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्मात कोणत्याही दोन जातींमधे विश्र्वास, परस्पर सहकार्य आणि बंधूता यांचा अभाव आहे.

धर्माच्या जाचक अटी जातीअंतर्गत आणि जातीबाहेर, कुटुंबांतर्गत किंवा दोन कुटुंबांमधे एखाद्या व्यक्तीच्या हातून काही विपरित घडल्यास, काही चूक झाल्यास त्या व्यक्तीचे कोणी स्वकीय, मित्र वा नातेवाईक त्या व्यक्तीस मदत करू धजत नव्हते.

अशा व्यक्तीला सामावून घेण्यास किंवा क्षमा करण्यास धर्मांतर्गत बंधने होती. उदा. ज्ञानाश्र्वरांचे आई-वडील व भावंडे इ., घरातील स्त्रीचे लग्नबाह्य संबंध, स्पृश्यास्पृश्यते बाबतची सीमारेषा कोणी ओलांडल्यास इ. अशा व्यक्तींना बहिष्कृत केले जाई.

जवळच्या व्यक्तींना अशा प्रकारे बहिष्कृत करण्याच्या चालीमुळे परस्पर सहाय्य आणि बंधूता यापासून हिंदूधर्मीय कायम असुरक्षिततेच्या छायेत वावरत होते. त्यामुळे त्यांची भौतिक प्रगती होऊ शकली नाही.

 8 - हिंदू धर्मांतर्गत कोणत्याही जातीला प्रचलित रूढी-रिवाज जाचक किंवा अमानुष आहेत असे वाटले तरी त्या नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

किंवा त्यात सुधारणा घडवून आणण्याचा अधिकार कोणाला नाही. असा काही प्रयत्न झालाच तर त्याला जातीतीलच लोकांचा कडाडून विरोध होतो. ठिकठिकाणी जातपंचायत असते, ब्राह्मणांसाठी धर्ममार्तंडांची पीठे नेमली गेली. याद्वारा चुकांचे प्रायश्र्चित्त दिले जाई.

अशा प्रायश्र्चित्तांद्वारे घृणास्पद शिक्षा दिल्या जात. त्याविरूध्द आवाज उठवणे मात्र कोणालाच शक्य होत नसे. ज्या ज्या वेळी असे कोणी प्रयत्न केले त्यांना फार मोठ्या सामाजिक रोषाला तोंड द्यावे लागले. किंवा त्यांना बहिष्कृत केले गेले.

उदा. सती जाणे, विधवेचे केशवपन करणे, स्पृश्यास्पृश्यता इ. प्रथा बंद करणे,  आंतरजातीय विवाह मान्य करणे, रोटी-बेटी व्यवहाराला मान्यता देणे इ.कालसापेक्ष सुधारणा घडवून आणणे इ. गोष्टींना धर्मधुरीण आणि धर्ममार्त॔डांचा पूर्ण विरोध होता.

यासाठी तर आधी ब्रिटिश आणि नंतर स्वतंत्र भारताचे संविधान यांच्यामार्फत अमानुष आणि व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणार्या चालीरितींच्या विरोधात कडक कायदे करावे लागले.डाॅ. आंबेडकरांनी सविधान सादर केले त्यासही आता 70 वर्षे झाली.

तरी काही अनिष्ट प्रथा, जातपंचायत इ. आजही आपले प्राबल्य राखून आहेत. उदा. काही मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारणे, आंतरजातीय विवाह अमान्य करणे, काही कामे करण्यापासून स्त्रियांना वा काही जातींना वंचित ठेवणे इ.

त्यामुळे सामाजिक सुधारणांना अडथळा करणार्या जातीव्यवस्थेचा अंत घडवून आणणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण संविधान पाळू, जाती नष्ट करू, #आम्हीभारतीय #ThanksDrAmbedkar

9 - हिंदू धर्मामधे 'सार्वजनिक भावना', एकीची भावना', 'एकता ही भावना', 'सामाजिक दातृत्व', किंवा सामाजिक बांधिलकी' इ. संकल्पना फारच संकुचित अर्थाने वापरल्या गेल्या आहेत.

कारण 'सार्वजनिक' म्हणजे त्या जातीपुरता स्तिमित किंवा मर्यादित असा. एका जातीचा समाज दुसर्या जातीच्या समाजाला आपलेसे करू शकत नाही तिथे सार्वजनिक ही संकल्पनाच फोल ठरते. एखादी व्यक्ती नेता असेल तर तिला नेता म्हणून फक्त त्या व्यक्तीच्या समाजाची मान्यता असते.

डाॅ. आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त म. गांधी सर्व जाती-जमातींनी मान्य केले असे नेते होते. सार्वजनिक भावनेचा अभाव असल्यामुळे सामाजिक बांधिलकी, एकता, इ. संकल्पना अर्थहीन ठरल्या. आजही आपल्या अनेक नेत्यांचे बहुमोल कार्य जातीच्या संकुचितपणामुळे मर्यादित राहिले.

 10 - हिंदू धर्मातील 'चातुर्वर्ण' ही व्यवस्था हिंदू समाजात खोलवर रुजली आहे. आर्य समाज सारख्या सुधारकांसकट अनेकांनी जाती नष्ट करण्याचे प्रयत्न केले.

परंतु वर्ण व्यवस्थेतून ते बाहेर पडू शकले नाहीत. प्रचलित 4000 जातीमधे जे कोणी विचारवंत, अभ्यासक, ज्ञानी असतील मग ते कोणत्याही जातीचे असोत, त्यांना ब्राह्मण म्हणावे, आणि त्याखाली तरतम योग्यतेप्रमाणे क्षत्रिय, वैश्य वा शूद्र म्हणावे अशीआर्यसमाजाची मांडणी होती.

पण सर्व मांडणी मूळ चार वर्णांच्या पलिकडे जाऊ शकली नाही. डाॅ. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे जाती व जातीवाचक उल्लेख यांचा पूर्णपणे नायनाट झाल्याशिवाय आपण समता, एकता, आणि बंधूता ही मूल्य जोपासू शकणार नाही.

म्हणूनच आपण आपली जात कोणती आहे हे विसरून जाऊ. 

11. चातुर्वर्णव्यवस्थेमुळे हिंदू समाजावर किती घातक परीणाम झालेत याबद्दल डाॅ. आंबेडकरांनी  बरेच मुद्दे मांडलेत. चातुर्वर्ण हे माणसाची उन्नति रोखणारं दुष्ट चक्र आहे.

चायुर्वर्णामुळे जाती, उपजाती, पोटजाती, जातीअंतर्गत आडनावनिहाय, गोत्रनिहाय आणि कुलनिहाय असे कडवे  समूह तयार झाले. त्यातून सोडवता येणार नाहीत असे अशक्यप्राय गुंते निर्माण झाले.

उदा. कुलकर्णी- कुलकर्णी हा उच्च विवाह मानला गेला म्हणजे अर्थातच एखाच जातीतल्या मिश्र विवाहाचं काय? लिमये कुलवृत्तांत, जोशी कुलवृत्तांत अशा गोष्टींनी कुला-कुलात छोटा आणि मोठा असे भादभाव आणले. याची परीणती म्हणजे प्रत्येक समूहा समूहात  विद्वेष निर्माण झाला.

यामुळे समाजांतर्गतसुध्दा ज्ञानाची देवाण घेवाण नष्ट झाली. ज्ञान दिल्याने वाढते पण इथे ते लपवून ठेवावे कसे अशाच प्रथा निर्माण होत गेल्या. त्यामुळे बाबासाहेबांनी जातीरहित नवीन समाजाची संकल्पना मांडली.

12. वर्णव्यवस्थेचे प्राबल्य आणि जातीव्यवस्थेचा विळखा यातून बाहेर पडायचे असेल तर ही व्यवस्था नाकारली पाहिजे आणि त्यासाठी प्रचलित धर्मशास्त्राचा हिंदूंनी त्याग केला पाहिजे असे डाॅ. आंबेडकरांचे स्पष्ट मत होते.

जाती आणि वर्ण यापलिकडे जाऊन मिश्र विवाह, योग्यतेनुसार सामाजिक मानमरातब व मान्यता, व्यक्तीस्वातंत्र्य, समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. चा पुरस्कार करणारा समाज व देश निर्माण व्हावा ही त्यांची कळकळीची इच्छा होती.

पण ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी जातीनिहाय (communal award) मतदारसंघ असावेत अशी  ब्रिटिश सरकारसमोर मांडणी केली. त्याला म. गांधींनी सक्त विरोध केला. म. गांधींच्या मते जातीविद्वेषच इतका आहे की जातीजातींचे वेगवेगळे मतदार संघ तयार झाले तर जाती जातीत युध्दंच होतील.

70 वर्षांपूर्वी आणि त्यानंतरही जाती या विषयांवर खूप उहापोह झाले. आपण आज 21 व्या शतकात, इंटरनेट आणि तत्सम हाय्-टेक विश्वात कोणताच उहापोह आणि फारसा कांगावा न करता आपल्या जातींचा त्याग करू शकतो का हा खरा कळीचा मुद्दा आहे.

ॲनिहिलेशन ऑफ कास्ट - समारोप
गेल्या बारा भागात जातीव्यवस्था का नष्ट करावी याबाबत डाॅ. आंबेडकरांची कारणमीमांसा आपण पाहिली. ही विषवल्ली जातीव्यवस्था हिंदू धर्माला आणि भारतातील  समाजजीवनाला कशी खिळखिळी करते हे यावरून स्पष्ट दिसते. यावर डाॅ. आंबेडकरांनी काही अशा उपयुक्त गोष्टींचा उहापोह केलाय की ज्यामुळे भारतातील लोकशाही टिकून राहील.

हिंदू धर्मात सुधारणा आणू इच्छिणारे पुरोगामी लोक हिंदू धर्म बुडवू पहाताहेत असे हिंदूत्ववाद्यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात इतर धर्मातल्या जाती आधी नष्ट करा. डाॅ. आंबेडकरांच्या मते इतर धर्मातील जाती आणि हिंदू धर्मातील जाती यात खूप फरक आहे. मुस्लीम, शीख, ख्रिस्ती इ. धर्मात कडवे जातीभेद नाहीत. त्यांना जाती न म्हणता पंथ म्हणता येईल. हिंदू धर्मातील जाती या फक्त आणि फक्त हिंदू धर्मातच आहेत. इतर धर्मातील सर्व सणवार सर्व पंथ एकत्र रित्या एका ठिकाणी पाळतात, साजरे करतात. हिंदू धर्मात जाती जातीत इतका कडवेपणा आहे की सणावारीही ते एकत्र येऊ शकत नाहीत.

आजवर जाती-अंतर्गत सुधारणा घडवून आणून त्यायील कडवेपणा पातळ करण्याचा प्रयत्न विविध प्रकारे अनेकांनी केला पण त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. किंबहुना धर्मधुरीणांनी त्यांना बहिष्कृत केले. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, चोखा महार, एकनाथ, गाडगेबाबा, साईबाबा इ. अपवाद वगळता त्या त्या जातींनीच या लोकांना त्यांच्या हयातीत छळले. मरणोत्तरही हे संत सर्वांचे संत झाले नाही. वारकरी संप्रदाय आणि साईभक्त यांची गोष्ट अपवाद. तरीही जातींचा कडवेपणा नष्ट होऊ शकला नाही.

संतांप्रमाणेच इतर समाज सुधारकांनाही हिंदू धर्मीयांनी धर्मबुडवे म्हणून हिणवले. छं शाहूमहाराज, म.फुले, आगरकर, राजा राम मोहन राॅय, राजारामशास्त्री भागवत, शाहीर अण्णाभाऊ साठे, डाॅ. आंबेडकर इ. अनेकांची उदाहरणे देता येतील. काही झाले तरी हिंदू धर्मात सुधारणा होणार नाहीत तसेच प्रवाही उत्क्रांतीही त्यात घडून येणार नाही.  वरकरणी लोक आपण जातीवादी नसल्याचे ओरडून सांगत असले तरी रोटी-बेटीचा प्रश्न आला की जातीनिरपेक्षतेपासून दूर पळतात.

म्हणूनच डाॅ आंबेडकर म्हणतात की काहीही झाले तरी हिंदू धर्मातली जातीयता नष्ट होणार नाही. हिंदू धर्म कधीच त्यांच्यातल्या दलित समजल्या गेलेल्या जातींची प्रगती होऊ देणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतः लाखो दलित बंधूंच्या उध्दारासाठी धर्मांतर केले. आणि देशीला जातीवादापासून वाचवण्यासाठी सर्वसमावेशक असे संविधान बनवले. संविधान बनवण्यात खूप मोठ्या मोठ्या पुरोगामी विचारवंतांचा सहभाग होता. त्या सर्वांच्या एकमताने संविधान संमत झाल्यामुळेच आज आपल्या देशाने 'संविधान' नावाचा धर्म पाळावयाचे ठरविले आहे.

जातीद्वेष आपल्या देशाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये म्हणून आपणही आज #आम्हीभारतीय असा नारा देऊ आणि आपला भारत प्रगतीपथावर पुढे जावा म्हणून संविधानास बांधील राहू.

कल्पना चारुदत्त