Sunday, 24 June 2018

योग दीना निमित्त -अशोक पानसरे, हैद्राबाद.

योग वैदिक कि अवैदिक??
**********************

योगशास्त्र हे वैदिकांचे नसून अवैदिकांचे आहे. ते श्रमण परंपरेतून विकसित झालेले आहे. परंतु सध्या योग पतंजलीच्या नावावर खपवला जात आहे. स्वतः पतंजली योगशास्त्र बौद्ध विद्यापीठात शिकला. पतंजली आपल्या भाष्यात म्हणतो, "योगशास्त्रे सांख्य प्रवचने", म्हणजे योग सांख्यांचा आहे असे तो स्वतः कबूल करतो. सांख्य तत्वज्ञान हे निरीश्वरवादी दर्शन आहे. त्यांनी उपनिषदातील ब्रम्ह नाकारून सृष्टीच्या उत्पत्तीला प्रकृती आणि पुरुष कारणीभूत आहेत हा सिद्धांत मांडला. "प्रकृती हे सृष्टीचे अव्यक्त(Hidden) रूप आहे, त्यात विकृती निर्माण झाली की सतत परिवर्तने होऊन त्यातून विविध मूलद्रव्य निर्माण होतात. नवीन असे काहीच निर्माण होत नाही, उलट जे अव्यक्त स्वरूपात आहे तेच व्यक्त स्वरूपात प्रदर्शित होत राहते." सांख्य तत्वज्ञानाचा प्रवर्तक कपिलमुनी आहे, त्यानेच बुद्धाच्या कपिलवस्तु या नगराची रचना अक्षपटा सारखी केली.

कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात म्हणतो की योग बृहस्पतीचा आहे. बृहस्पती चार्वाक परंपरेतील आहेत म्हणून तेही निरीश्वरवादी आहेत, त्यांनी वैदिकांच्या तीन वेदांची खिल्ली उडवलेली आहे.
"त्रयो वेदस्य कर्तारा भंड धूर्त निषाचरः"

हिंदू धर्माचे आद्यशंकराचार्य आपल्या शांड्करभाष्य या ग्रंथात बुद्धाला "योगाणाचक्रवर्ती" म्हणत आहेत!!

सांख्य निरीश्वरवादी, बृहस्पती निरीश्वरवादी, बुद्ध निरीश्वरवादी.

मग योग कुणाचा? वैदिकांचा कि अवैदिकांचा?

अशोक पानसरे, हैद्राबाद.

No comments:

Post a Comment