सध्या अनेक लोक "न्यूड" ह्या फिल्मचे कौतुक करताना दिसतात. एखादी फिल्म आवडण्या/ नावडण्या साठी प्रत्येकाची अनेक वैयक्तिक कारणं असू शकतात.एखाद्या स्त्री पत्राला केंद्रस्थानी ठेवणारी फिल्म मराठीत क्वचितच येते. म्हणून मी कुतूहलाने 'न्यूड' पाहिला. त्यातल्या कलाकारांचा अभिनय, गाणी व cinematographyह्या बाबी मला आवडल्या. पण संपूर्ण सिनेमा मात्र आवडला नाही, कारण आशयाच्या मांडणीत कमतरता भासली. आज Shilpa Kamble ने "न्यूड" बद्दल जे लिहिलेेआहे - बरेचसे तसेच माझ्याही मनात येऊन गेले. म्हणून तिने लिहलेले इथे copy करीत आहे. -
न्यूड ( २०१८) या बहुचर्चीत चित्रपटाला गोवा फिल्म फँस्टीवलला उद्घाटनच्या वेळी झालेला विरोध, परिक्षण मंडळाच्या सुरवातीच्या नकारानंतर ए सर्टीफिकेट मिळवून या चित्रपटाचे झालेले प्रदर्शन या गोष्टीने प्रभावीत होवून मोठ्या अपेक्षेने चित्रपट पहायला गेले, अपेक्षाभंग झाला. पण हे काही नवीन नाही, असे होते कधीमधी आपण चित्रपट पहायला जातो आणि तो फसलेला असतो. न्यूड चित्रपटाने त्यापेक्षा काहीतरी भंयकर केले होते. त्यातील प्रतारणा अधिक सहेतुक होती.त्यामागे राजकारण होतं , सिनेमाचं अर्थकारण होतं, आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे दाभिंकपणा होता .आता हा दाभिंकपणा नेमका काय आहे त्याचा विचार करूया. हा दाभिंकपणा उघड होण्यासाठी या चित्रपटाचे sexual politics काय आहे ते समजून घ्यावे लागेल.’गायनोक्रिटीसिझम’ या एलिन शोवाल्टर यांनी प्रचलीत केलल्या समीक्षेपद्दतीत लेखक स्त्रीपात्रांना कोणत्या विचारव्यूहातून रेखाटतो याचा अभ्यास केला जातो.व त्यामागची अन्यायकारी पुरूषप्रधान विचारपद्धतीची चिकित्सा केली जाते. विल्यम शेक्सपीयर यांच्या Taming of the Shrew मधील गर्विष्ट व नाठाळ नायिका कँथरिना हिला वठणीवर आणण्यासाठी तिचा नवरा Petruchio शाररीक हिंसा, उपासमार, माहेर वर्ज्य, एकाकीपणा, शाब्दीक छळ असे अनेक आयुधे वापरतो.ज्या आधुनिक कथनानुसार घरगुती हिंसाचार या सदरात मोडल्या जाणाऱ्या आहेत. व हा सर्व छळ सहन केल्यानंतर नायिका तिच्या ‘योग्य स्थानी’ येते व व्यवस्थित वागू लागते. या नाटकाचे त्याप्रकारची चिकित्सा पाश्चात्य जगात झालेली आहे. व ती मौलिक स्वरूपाची आहे.तर या पार्श्वभूमीवर आपण न्यूड या चित्रपटाकडे वळूया.
या चित्रपटातील नायिका यमुना, तिची मावशी चंद्राक्का या सोलापूर,पंढरपूर या बहुतेक भागातील मागास समाजातील स्त्रिया आहेत ( भंडारा ,गोंदिया या भागातही हे काम होते पण त्यांची बोलीभाषा इथे वापरलेली नाही. )कारण यमुना जे बिडी वळण्याचे काम करते ते याच भागात चालते व समाजातील गरीब गरजू व प्रामुख्याने मागास, दलित जातीतील बायका हे काम करतात. पेहलवानी करणारा नवरा हा जरी उच्चवर्णीय व उच्चवर्गीय असण्याची शक्यता असली तरी मग त्याची बायको घराबाहेर असंघटीत क्षेत्रात रोजगार मिळवण्याची शक्यता फार कमी आहे.तर भाषा , व्यवसाय, शिक्षण,राहणीमान,मुंबईतील झोप़डपट्टीतील निवारा यावरून हा तर्क बळकट होतो की ग्रामीण भागातील खालच्या जातीच्या स्त्रिया या चित्रपटाच्या कथानकाच्या वाहक आहेत.( उदा.काकस्पर्श-२०१२ या चित्रपटातील केशवापन हि ब्राम्हण स्त्रियांचा विशेष अनुभव आहे.त्या अनुभवावर आधारलेली ती ऱ्हदयस्पर्शी गोष्ट आहे.)
या चित्रपटाची कथावस्तू त्याचे गृहीतत्व सरळसरळ ....स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंतकाळाची माता आहे . या पितृस्ताक विचारसरणीवर आधारलेली आहे. उदा. या चित्रपटातील नायिका यमुना हि जेव्हा पहिल्यांदा जे.जे. मध्ये न्यूड म्हणून पोझ करण्यासाठी येते तेव्हां तिचे मानसिक द्वंदव चाललेले असते. त्यावेळी नेमका कँमेरा एका आईमुलाच्या फ्रेमवर स्थिरावतो. मग ही यमुना आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तिला मान्य नसलेला व्यवसाय स्वीकारते.मग ज्या शरीरातून दुसऱ्या शरीराचा जन्म झाला त्या शरीराचे भांडवल करून तिला उदारनिर्वाह करावा लागतो. इथे शरिरविक्रीशी संबधित कार्यकर्तीने नमूद केलेला किस्सा आठवतो ज्यावेळी एखादी महिला मारहाण ,धमकी इत्यादी गोष्टी केल्यानंतरही शरिरविक्रय करण्यास विरोध करते तेव्हां तिचे दलाल व मालकिणी तिच्या मुलांना ओलिस ठेवतात व तसे केल्यानंतर ती महिला निरूउपाय होवून शरिरविक्रयास तयार होते. अगदी हाच मुद्दा मदर इंडिया(१९५७)या चित्रपटातही एका प्रसंगात आला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणारी नायिका ‘लाला’ या बनियाच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडत नसते पण जेव्हां तिची मुले भूकेने अन्न अन्न करून मरू लागतात तेव्हां ती त्याच्यासमोर शरणागती पत्करते .मात्र आयत्यावेळी अन्नाचा शोध लागून ती त्या दृष्कृत्यातून वाचते.
तर न्यूड या चित्रपटातील यमुना नवऱ्याशीही याच गोष्टीने संघर्ष करते की तिला तिच्या मुलाच्या फी भरण्यासाठी पैसे हवेत. आता यमुना ज्या गोष्टीसाठी घर सोडते त्याच गोष्टीसाठी जगही सोडते. तिच्या मुलाला चित्रकार बनवायचे तिचे (ते त्याचेही स्वप्न असते) स्वप्न भग्न पावते व तो आईला रांड म्हणतो .या धक्क्याने ती आत्महत्याचा निर्णय घेवून समुद्रात विलीन होते. म्हणजेच त्या नायिका अनंतकाळाची माताच असते.इथे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला अस्तित्व(२०१०) हा चित्रपट आठवतो. या चित्रपटाची विषय स्त्रीला विवाहबाह्य संबधातून झालेली अपत्य, त्यातून निर्माण झालेला ताण , व उद्धवस्त झालेले कुंटुब असा होता. या चित्रपटात स्त्रीचे स्वतःचे अस्तित्व म्हत्वाचे मानले होते व त्यामुळे नायिक मुलाच्या वाग्दत वधूचा आधार घेत घर सोडते. आपले जगणे संपवत नाही.
न्यूड चित्रपटात खालच्या जाती/वर्गातील स्त्री घेवून तिला वर्ण वर्चस्ववादी भूमिकेतून तयार झालेल्या पुरूषकेंद्री विषमतावादी मानसिकतेतून रेखाटले आहे. तिचे असे चित्रपटातून शोषण करतांना या चित्रपटाचा प्रपोंगडा मात्र असा करण्यात आला आहे की हा चित्रपट आधुनिकता मांडणारा, स्त्रीला मुक्त करणारा आहे. दुर्दैवाने हा चित्रपट खालच्या जाती/वर्गातील बाईचे कथनातून शोषण करणाराच आहे.इथे या चित्रपटात कला, कलेच्या स्वात्र्यांवर येणारा दबाव, झुंडशाही, या भारताला व संपूर्ण जगाला भेडसविणाऱ्या समस्यासंदर्भात काही विधाने केली गेलेली आहेत आणि ती चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत असे भासविले गेले असले तरी ती केद्रंस्थानी नाहीत.कारण एक जगविख्यात चित्रकाराचे दोन सीन, कलामहाविद्यालयावर झालेला हल्ला एक सीन, व महाविद्यालयातील प्रिसींपलचे सात-आठ वाक्य सोडल्यास धर्मसत्ता , संस्कृतीरक्षक यांना आव्हान देणारे काहीही या सिनेमात नाही.हा सिनेमा यमुना या पात्रावरच बेतलेला आहे.चित्रपटात या अर्थाचे एक वाक्य आहे... Just like medical students need bodies for post mortems, art students need nude models for studying painting.
आणि हीच आक्षेपार्ह गोष्ट आहे की कलेसाठी लागणारी ही न्यूड माँडेल्स जिवंत, हातपाय असणारी, चेतना असणारी माणसे आहेत.ती मेलेली शरीर नाहीत. या माँडेल्सवर बेतलेले तुमचे पात्र कितीही काल्पनिक असेल तरी त्याच्या प्रती तुमचे काही उत्तरदायित्व नाही का ? म्हणजे याच दिग्दर्शकाचा नटरंग( २०१०) हा तमाशातील नाच्याच्या जीवनावर बेतलेला चित्रपट घेवूया.यातील ‘गुणा’ हा कलावंत नायक त्याचा रोजगार गेल्याने तमाशाच्या धंद्यात येतो व इथे आल्यावर त्याला काही कारणास्तव नाच्याची भूमिका करावी लागते.या व्यवसायात त्याला मानहानी तर स्वीकारावीच लागते, पण त्याच्यावर शाररीक अत्याचारही होतो, त्याचे कुटुंब त्याला दुरावते,ग्रामस्थ वाळीत टाकतात,धंदा बुडतो पण अशा वेळी तो आत्महत्या करत नाही .तर पुन्हा तोच तमाशा सुरू करतो व त्यासाठी त्याला सहधर्मीही भेटते.मग जे नटरंगमध्ये झाले ते न्यूडमध्ये का झाले नाही....याचे कारण सरळ आहे तो ‘गुणा’ होता ही ‘यमुना’ आहे. आणि हेच ते sexual politics आहे.
जगभरात अनेक अर्थांनी नवीन जीवनमूल्ये देणारा ,शोषणाला नकार देणारा, कलात्मक व त्याचबरोबर आशयघन चित्रपट तयार होत आहे. भारतीय चित्रपटही हम(१९९१) मधील जुम्मा चुम्मा दे पासून पींक(२०१६) नो मीनस नो पर्यंत पोहचला आहे.इराणमधील circle ( 2010) हा इराणमध्ये त्यातील स्त्रीजीवनातील स्फोटक दर्शनाने इराणमध्ये बँन झालेल पण जगभरात गाजलेला चित्रपट पथदर्शी आहेच. पण तद्दन व्यावसायिक असलेल्या हाँलीवूडमध्येही वंशदेवषी वर्चस्ववादी वाह्यात नेत्याला ठणकावून सांगणारे नीडर कलावंत आहेत. मेरील स्ट्रीपने ज्या वाक्याचा पुनर्उच्चार केला की Take your broken heart turn it into Art .त्या वाक्याचा आधार घेतच हे विवेचन संपवते.ऱ्हदयाला सांधण्याची , अलटरनेटीव जग दृश्यमान करण्याची , सत्य निर्माण करण्याची ताकद चित्रपटासारख्या माध्यमात असते.न्यूड या चित्रपटाला हि संधी मिळाली होती.चित्रपट हे माध्यम अतिशय खर्चिक आहे. उत्कृष्ट कलावंत, कँमेरामन, संगीत , निसर्गरम्य लोकेशन ही सारी आयुधे असूनही हा चित्रपट दिशादिग्दर्शक होवू शकला नाही. आशयाच्या पातळीवर या चित्रपटाचे रसातळाला जाण्याचे कारण एकच- परकायाप्रवेश लेखकाला जमला नाही. हाडाचा कलावंत त्याच्या व्यक्तीगत संस्कारातून बाहेर येवून आपल्यापेक्षा भिन्न व्यक्तीला सामावून घेतो त्याच्या सहवेदनेला भोगू शकतो.व त्यातून त्याची पात्रे तयार करतो त्यांच्या जगण्याला अर्थ देतो.
पुन्हा पुन्हा ऐकलेले वाक्य इथे आठवत राहते..If you are caste blind then you are upper caste and if you are gender blind then you are male. मग सांगा आजूबाजूच्या वास्तवावर डोळे झाकून पडद्यावर रंग उधळणारी तुमची हि गोष्ट आंधळेपणाने आम्ही कशी पहावी ? व त्यातून काय अनुभव घ्यावा.
Shilpa A. Kamble Vandana Khare

No comments:
Post a Comment