जी बी सिंड्रोम या आजारावर प्रकाश टाकणारhttps://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5524146674279998913%3FBookName%3DTyanchya-Sindromechi-Katha&ved=2ahUKEwiDnIa_jvvYAhVJOY8KHQggBToQFjAAegQIDxAB&usg=AOvVaw0UBK1YxlaR_invyHEuQgy_
Sunday, 28 January 2018
काहूर
रात्र सरे काळोखाची, दिवस उघडी डोळे
धूर साचला सभोती, दिसामाजी जग जळे.
दिस सारे दिसापरी, रात्र सदाची आजारी
इथे-तिथे दंगा धोपा, शांती रडतसे दारोदारी.
सूर्य येई डोक्यावरी, घेऊनी नवी उभारी
दिसामाजी डोळ्यामधी, पाणी सुकल्या विहीरी.
मन माझं सुन्न सुन्न, सांगावे हे कोणापाशी
धर्म जातीच्या जंजाळी, बुडालेत देशवासी.
परदेशा कसे जावे, पहारा तो वेशीपाशी
माती माझी माझ्यापरी, प्राण अमुचे कंठाशी.
बाप अमुचा उघड्या देही, मरण घेई छातीवरी
देश जळे चितेमधी, शांती-ज्योत फरफर करी.
येऊ दे पहाट नवी, अंत नको पाहू देवा
उसवलेल्या माणसासाठी, एक टाका हवा नवा.
(ओवीच्या चालीत)
कल्पना भागवत

Sunday, 25 August 2013
charukalp: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार ...
charukalp: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार ...: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्काराच्या घटना वाढणे यांचा काही परस्पर संबध आहे का? काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे २०००-२००...
समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार यांचा परस्पर संबध आहे का?
समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्काराच्या घटना वाढणे यांचा काही परस्पर संबध आहे का?
काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे २०००-२००१ च्या सुमारास सांगली येथे स्त्री-भ्रूण हत्त्ये संदर्भात डॉक्टर्सचे संमेलन आयोजित झाले होते. त्यावेळी सांगलीतील प्रथित यश डॉक्टर्स तसेच आरोग्य अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ एकत्र आले होते.
या चर्चेमध्ये एका मानसोपचार तज्ज्ञांनी (त्यांचे नाव आता लक्षात नाही) असे एक मत मांडले की "ज्या ज्या वेळी समाजात स्त्रियांची संख्या घातली आहे त्या त्या वेळी समाजात स्त्रियांवरील अत्याचार विशेषतः बलात्काराच्या घटना वाढलेल्या आढळल्या. "
त्यांनी त्यावेळी असेही भाकीत केले होते की, इथून पुढे येत्या १०-१२ वर्षात आपल्याला याचे प्रत्यंतर येइलच. आणि आज-काल आपण अशाच प्रकारच्या परिस्थितीतून जात आहोत. गेल्या दहा वर्षात माध्यमांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जागरूकता निर्माण झाली म्हणून या बातम्यांना प्रसिद्धी मिळते हे खरे असले तरी बलात्काराच्या घटना वाढतच आहेत.
आम्हाला खरोखर असे जाणून घ्यावयाचे आहे की समाजातील स्त्री-पुरुष प्रमाण आणि स्त्रियांवर होणारे बलात्कार यांचा काही परस्पर संबध आहे का?
जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा ही विनन्ति.

Saturday, 24 August 2013
charukalp: "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!"
charukalp: "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!": "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!" काही वर्षांपूर्वी वर्गात मी मुलाना म्हणत असे की "गर्वसे कहो हम हिंदू है " ...
Friday, 12 July 2013
पंचेंद्रिये आणि अंतर्ज्ञान किंवा तात्कालिक ज्ञान
अंतर्ज्ञान ही एक देणगी आहे असा आपल्यापैकी खूप लोकांचा समाज आहे. अंतर्ज्ञान देणारे एखादे सहावे इंद्रिय असावे असेही काहीजणांना वाटते.
आपण रोजच्या रोज बरेच निर्णय घेत असतो. काही योग्य असतात, काही अयोग्य असतात. काही चुकीचे असतात तर काही बिनचूक असतात. निर्णय चुकीचा ठरला तर त्यामुळे आपले नेमके किती नुकसान झाले त्यावर आपण केलेल्या चुकीची किंमत आपण ठरवतो.
कधी कधी आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले काही नुकसान झाले आहे हेच काहीजण मान्य करीत नाही. अशा व्यक्ती आपल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करण्याच्या फांदातही पडत नाहीत.
काही व्यक्ती मात्र चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचा नीटपणे अभ्यास करतात. समजा प्रत्यक्ष नुकसान झाले नसले तरीही आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीत चुकीचा निर्णय घेतला याबाबत चिकित्सक असतात.अशा व्यक्ती कळत-नकळत आपण नेमकी कशी आणि कोणती चूक केली याचा सखोल अभ्यास करतात. अशा व्यक्ती हळू हळू नेमका आणि बिनचूक निर्णय घ्यावयास शिकतात. काही काळाने असे लक्षात येते की अशा व्यक्तींचा कोणताच निर्णय चुकीचा ठरत नाही. त्यांचे निर्णय सहसा बिनचूक असतात. अशा व्यक्तींना काही अंतर्ज्ञान झाले कि काय किंवा काही तात्कालिक ज्ञान मिळण्याची सिद्धी प्राप्त झाली कि काय असे वाटते.
अंतर्ज्ञान ही काही मंत्र सिद्धी नाही. किंवा असे ज्ञान देणारे कोणतेही सहावे इंद्रिय नाही.आपण घेतलेल्या चुकीच्या व बिनचूक निर्णयाचे सतत विश्लेषण करण्याच्या साधनेमुळे मिळालेली ही अदभूत शक्ती आहे. ती आपल्याला जन्मतःच मिळालेली नसते. प्रयत्नानेच मिळते.
कोणताही निर्णय घेत असताना आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांच्या तर्फे मिळालेल्या ज्ञानाची गरज असते. पाचही इंद्रियांतर्फे मिळाले ज्ञान संकलित रित्या मांडून त्याचा सांकल्याने विचार करून, त्याच्या साधक-बाधक परिणामांची शक्यता लक्षात घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकीच ठरत नाही. इतका की जणू असे निर्णय घेण्याची आपल्याला काही दैवी शक्तीच प्राप्त झाले कि काय असे वाटावे.
अशी साधना कोणीही करू शकते. किनालाही साधू शकते. पंचेन्द्रियांतर्फे मिळालेल्या ज्ञानाचा सर्वांगीण विचार म्हणजेच अंतर्ज्ञान. हि काही जन्मजात देणगी नव्हे.

Monday, 8 July 2013
charukalp: मोलकरीण आणि मदतनीस
charukalp: मोलकरीण आणि मदतनीस: आपल्या सगळ्याकडे घरकाम करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त महिला नेमलेल्या असतीलच. क्वचितप्रसंगी एखादा पुरुषही असू शकेल. आपण यांना काय स...
Subscribe to:
Posts (Atom)