#आम्हीभारतीय
1. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचं लिखित स्वरूपातील पुस्तक आहे. भारताच्या प्रगतीच्या आड येणारी जातीव्यवस्था का आणि कशी नष्ट झाली पाहिजे याचा अभ्यासपूर्ण तपशीलवार उहापोह म्हणजे 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक. प्रथम प्रकाशन 1937. द्वितीय आवृत्ती 1944.
डाॅ. आंबेडकरांनी यात 'कम्युनल ॲवाॅर्ड' ही संकल्पना मांडली आहे. तसेच जातीव्यवस्था नष्ट करण्यासंदर्भात 26 मुद्द्यांची कारणमीमांसा केली आहे. या गोष्टीला 80 वर्षं होऊन गेली परंतु त्यात मंडलेले विचार आजही अप्रस्तुत वाटत नाहीत. किंबहुना आपण भारतीयांनी याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
जातीव्यवस्था का असू नये याची कारणे -
2. त्या त्या जातीची, वर्णाची, वर्गाची किंवा वंशाची शुध्दता राखण्यासाठी जातीव्यवस्था असावी असे सनातन धर्मवाद्यांचे म्हणणे होते. (किंवा असेलही). पण बहुतांश वंशशास्त्रज्ञ किवा अभ्यासकांना (डाॅ. डी.आर. भांडारकर सहित) हे मान्य नाही.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद-दुसरा अपवाद वगळता संकर झाला नाही असा कोणताच शुध्द म्हणावा असा वर्ण, वंश, जाती जगात आढळत नाही. अगदी ब्राह्मणसुध्दा त्याला अपवाद नाही. अशा प्रकारचा संकर होणे हे मानववंश उत्क्रांतीचे लक्षण आहे. म्हणजे या ना त्या कारणाने जाती शुध्दता रहात नाही.
म्हणजे जाती-वर्ण-वंश शुध्दतेचे केले जाणारे समर्थनही पोकळ आहे. किंबहुना मानवाच्या उत्क्रांतीला अडथळा निर्माण करणारे आहे. थोडक्यात या कारणासाठीसुध्दा जातीव्यवस्थेचे समर्थन करणे चुकीचे आहे. चला तर मग आपण तरी आपल्या जातीचा त्याग करून मानववंशाची पाठराखण करू.
3. हिंदू हा एकसंघ समूह नसून अनेक जातींच्या समूहांचा समुदाय आहे. मुस्लीमांच्या आक्रमणापूर्वी 'हिंदू' हा शब्द अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी कोणत्याही संस्कृत लिखाणांमधे डाॅ. आंबेडकरांना हिंदू हा शब्द आढळला नाही.
इथे असलेल्या अनेक जाती-जमाती एकत्र नांदत नसल्यामुळे इथे ज्यांनी आक्रमण केले त्या मुस्लीमांनी सर्व समुदायांना मिळून 'हिंदू' असे नाव दिले. डाॅ. आंबेडकरांच्या मते इथल्या जाती-जमातींमधे कोणतीही देवाण-घेवाण नव्हती, रोटी-बेटी व्यवहार नव्हता.
इतकेच नाही तर सर्व सणवार, व्रतं-वैकल्य आणि रिवाज इ. प्रत्येक समूहात वेगवेगळी आणि वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जात. सर्व जाती-जमाती एकत्र येऊन सर्वांचा मिळून एक असा कोणताच सण वा कार्यक्रम नाही. त्यामुळे 'हिंदू' हा एकसंध नाही.
डाॅ. आंबेडकर त्यापुढे असं म्हणतात की, 'हिंदू' हे एक मिथक आहे. फक्त मुस्लीम वा ख्रिस्ती लोकांच्या विरोधात ते एकत्र येतात. त्यातही ज्या ज्या जमातींना हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्यावर अन्याय केला असे वाटते ते हिंदू विरोधात लढायचं पसंत करतात. या सर्व गोष्टी हिंदू म्हणवणार्या समुदायांना प्रगती करण्यापासून अवरोध करतात.
जाती-जातींमधली तेढ इतकी तीव्र आहे की त्यामुळे हिदू एकसंध रहाणे मुष्किलच. उच्च जाती विरूध्द नीच जाती हा लढा तीव्रच होत जाणार. म्हणूनच आपण आज तरी जाती नष्ट करायच्या असं ठरवणं देशाच्या एकसंधतेचच्या दृष्टीने महत्वाचे आहे. #आम्हीभारतीय
कारण -4 - बाबासाहेबांच्या मतानुसार हिदू धर्म हा समाजव्यवस्था (anti social) विरोधी आहे.
उदा. जाती, पोट जाती, उपजातीही एकमेकात मिसळायला तयार नाहीत. अगदी 1950 पर्यंत सुध्दा ऋग्वेदी देशस्त, यजुर्वेदी देशस्त, कोकणस्त, कराडे, सारस्वत, कायस्थ इ. इ. एकमेकात देवाण घेवाण करीत पण रोटी-बेटी व्यवहार करीत नसत.
असे काही जातीबाहेर विवाह झालेच तर त्यांना जातीबाहेर काढले जाई. आपल्या छोट्या बांधीव समूहात रहाणे हिंदू पसंत करतात. वाळीत टाकणे हा रिवाजही हिंदूंना जातीनिहाय एकटा पाडतो.
अशा घट्ट आणि कातीव किंवा बांधीव समाजाची सामाजिक प्रगती होत नाही. अमुकने शिकायचे नाही (स्त्रियासुध्दा), तमुकने संस्कृत वाचायाचे नाही, वेद, पूजा फक्त अमुकच लोकांनी करायची इ.इ. मुळे ज्ञानविस्तार होऊ शकत नाही.
ब्राह्मण सोडून इतर सर्व ज्ञानापासून वंचित राहिले. अशाने समाजबांधणीला अडथळा होतो. म् णूनच आपण जातीव्यवस्था मोडून काढू.
कारण 5 - ब्राह्मणवर्गाने स्वतःला उच्च वर्ग म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपलाच अघोषित कायदा अंमलात आणला.
त्यांनी नीच म्हणून ज्या ब्राह्मणेतर जाती ठरवल्या त्यांना उच्च वर्गात येण्यापासून रोखण्यासाठी आपणच जे अन्यायकारक असे कायदे बनवले (conspired), ते त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांद्वारे इतर जातींवर लादले.
आंबेडकरांनी दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) आणि पाठारे प्रभू या दोन जातींची उदाहरणे दिली आहेत. या दोन्ही समाजांनी ब्राह्मण होण्यासाठी आपल्या काही रूढी-रिवाजात बदल केला. तेव्हा ब्राह्मण समाजाने पेशव्यांकडे तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर बंधने आणली.
यामुळे नीच समजल्या जाणार्या जाती-जमातींकडे प्राप्त परीस्थितीत राहून स्वतःची प्रगती करून घेण्याच्या सर्व संधींपासून लांब रहावे लागले. शिक्षण नाही, अधिकचे कौशल्य मिळवण्याची संधी नाही, अन्यायकारक कायद्यांच्या बेडीतून सुटका नाही अशा अधःपतित अवस्थेत त्यांना रहावे लागले.
बाबासाहेब म्हणतात की यामुळे या नीच समजल्या गेलेल्या जातींचे मानवीहक्क पायदळी तर तुडवले गेलेच शिवाय या मनुष्यांना उन्नतीपासून रोखल्यामुळे या जातींचे, धर्माचे आणि देशाचे अतोनात नुकसान झाले. थोडक्यात नको हा असला अन्याय करणारा धर्म न् नको या जाती.
6 -जातीव्यवस्थेमुळे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होणे शक्य नाही, त्यामुळे धर्म संकुचित रहातो.
जातींच्या जाचक अटींमुळे हिंदू धर्मीय धर्मांतर करू शकतात. प्रचार आणि प्रसार हे इतर धर्मांचं मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे इतर धर्मातून आलेल्या लोकांचा स्वीकार करायला हे धर्म उत्सुक असतात.
इतर लोकांना हिंदू धर्म आवडला आणि धर्मांतर करून हिंदू धर्मात यायचं असेल तर काही गोष्टींमुळे ते शक्य नाही. बाहेरची व्यक्ती हिंदू धर्मात यायची असेल तर तिला कोणत्याही जातीत सामावून घेता येत नाही, कारण जात ही जन्मावरच अवलंबून आहे.
जातीवरची बंधनं इतकी कडक आहेत की इतर कोणालाच कोणत्याही जातीत सामावून घेताच येत नाही. उदा. ब्राह्मण समाज हिंदू धर्मातल्या इतर जातीच्या कोणाला ब्राह्मण जातीत सामावून घेत नाही, तर इतर धर्मातील लोकांना ब्राह्मण जातीत घेणंच अशक्य.
या असल्या जाचक कायद्यांमुळे हिंदू धर्म वाढला नाही, किंबहूना हिंदूंमधील अनेक जाती-जमातींनी इतर धर्म जवळ केले. म्हणूनच असली जाचक बंधनं असलेला धर्म आणि जातींना आपण नष्ट केले पाहिजे.
7 - डाॅ. आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्मात कोणत्याही दोन जातींमधे विश्र्वास, परस्पर सहकार्य आणि बंधूता यांचा अभाव आहे.
धर्माच्या जाचक अटी जातीअंतर्गत आणि जातीबाहेर, कुटुंबांतर्गत किंवा दोन कुटुंबांमधे एखाद्या व्यक्तीच्या हातून काही विपरित घडल्यास, काही चूक झाल्यास त्या व्यक्तीचे कोणी स्वकीय, मित्र वा नातेवाईक त्या व्यक्तीस मदत करू धजत नव्हते.
अशा व्यक्तीला सामावून घेण्यास किंवा क्षमा करण्यास धर्मांतर्गत बंधने होती. उदा. ज्ञानाश्र्वरांचे आई-वडील व भावंडे इ., घरातील स्त्रीचे लग्नबाह्य संबंध, स्पृश्यास्पृश्यते बाबतची सीमारेषा कोणी ओलांडल्यास इ. अशा व्यक्तींना बहिष्कृत केले जाई.
जवळच्या व्यक्तींना अशा प्रकारे बहिष्कृत करण्याच्या चालीमुळे परस्पर सहाय्य आणि बंधूता यापासून हिंदूधर्मीय कायम असुरक्षिततेच्या छायेत वावरत होते. त्यामुळे त्यांची भौतिक प्रगती होऊ शकली नाही.
ॲनिहिलेशन ऑफ कास्ट - समारोप
गेल्या बारा भागात जातीव्यवस्था का नष्ट करावी याबाबत डाॅ. आंबेडकरांची कारणमीमांसा आपण पाहिली. ही विषवल्ली जातीव्यवस्था हिंदू धर्माला आणि भारतातील समाजजीवनाला कशी खिळखिळी करते हे यावरून स्पष्ट दिसते. यावर डाॅ. आंबेडकरांनी काही अशा उपयुक्त गोष्टींचा उहापोह केलाय की ज्यामुळे भारतातील लोकशाही टिकून राहील.
हिंदू धर्मात सुधारणा आणू इच्छिणारे पुरोगामी लोक हिंदू धर्म बुडवू पहाताहेत असे हिंदूत्ववाद्यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात इतर धर्मातल्या जाती आधी नष्ट करा. डाॅ. आंबेडकरांच्या मते इतर धर्मातील जाती आणि हिंदू धर्मातील जाती यात खूप फरक आहे. मुस्लीम, शीख, ख्रिस्ती इ. धर्मात कडवे जातीभेद नाहीत. त्यांना जाती न म्हणता पंथ म्हणता येईल. हिंदू धर्मातील जाती या फक्त आणि फक्त हिंदू धर्मातच आहेत. इतर धर्मातील सर्व सणवार सर्व पंथ एकत्र रित्या एका ठिकाणी पाळतात, साजरे करतात. हिंदू धर्मात जाती जातीत इतका कडवेपणा आहे की सणावारीही ते एकत्र येऊ शकत नाहीत.
आजवर जाती-अंतर्गत सुधारणा घडवून आणून त्यायील कडवेपणा पातळ करण्याचा प्रयत्न विविध प्रकारे अनेकांनी केला पण त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. किंबहुना धर्मधुरीणांनी त्यांना बहिष्कृत केले. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, चोखा महार, एकनाथ, गाडगेबाबा, साईबाबा इ. अपवाद वगळता त्या त्या जातींनीच या लोकांना त्यांच्या हयातीत छळले. मरणोत्तरही हे संत सर्वांचे संत झाले नाही. वारकरी संप्रदाय आणि साईभक्त यांची गोष्ट अपवाद. तरीही जातींचा कडवेपणा नष्ट होऊ शकला नाही.
संतांप्रमाणेच इतर समाज सुधारकांनाही हिंदू धर्मीयांनी धर्मबुडवे म्हणून हिणवले. छं शाहूमहाराज, म.फुले, आगरकर, राजा राम मोहन राॅय, राजारामशास्त्री भागवत, शाहीर अण्णाभाऊ साठे, डाॅ. आंबेडकर इ. अनेकांची उदाहरणे देता येतील. काही झाले तरी हिंदू धर्मात सुधारणा होणार नाहीत तसेच प्रवाही उत्क्रांतीही त्यात घडून येणार नाही. वरकरणी लोक आपण जातीवादी नसल्याचे ओरडून सांगत असले तरी रोटी-बेटीचा प्रश्न आला की जातीनिरपेक्षतेपासून दूर पळतात.
म्हणूनच डाॅ आंबेडकर म्हणतात की काहीही झाले तरी हिंदू धर्मातली जातीयता नष्ट होणार नाही. हिंदू धर्म कधीच त्यांच्यातल्या दलित समजल्या गेलेल्या जातींची प्रगती होऊ देणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतः लाखो दलित बंधूंच्या उध्दारासाठी धर्मांतर केले. आणि देशीला जातीवादापासून वाचवण्यासाठी सर्वसमावेशक असे संविधान बनवले. संविधान बनवण्यात खूप मोठ्या मोठ्या पुरोगामी विचारवंतांचा सहभाग होता. त्या सर्वांच्या एकमताने संविधान संमत झाल्यामुळेच आज आपल्या देशाने 'संविधान' नावाचा धर्म पाळावयाचे ठरविले आहे.
जातीद्वेष आपल्या देशाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये म्हणून आपणही आज #आम्हीभारतीय असा नारा देऊ आणि आपला भारत प्रगतीपथावर पुढे जावा म्हणून संविधानास बांधील राहू.
कल्पना चारुदत्त

8 - हिंदू धर्मांतर्गत कोणत्याही जातीला प्रचलित रूढी-रिवाज जाचक किंवा अमानुष आहेत असे वाटले तरी त्या नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
किंवा त्यात सुधारणा घडवून आणण्याचा अधिकार कोणाला नाही. असा काही प्रयत्न झालाच तर त्याला जातीतीलच लोकांचा कडाडून विरोध होतो. ठिकठिकाणी जातपंचायत असते, ब्राह्मणांसाठी धर्ममार्तंडांची पीठे नेमली गेली. याद्वारा चुकांचे प्रायश्र्चित्त दिले जाई.
अशा प्रायश्र्चित्तांद्वारे घृणास्पद शिक्षा दिल्या जात. त्याविरूध्द आवाज उठवणे मात्र कोणालाच शक्य होत नसे. ज्या ज्या वेळी असे कोणी प्रयत्न केले त्यांना फार मोठ्या सामाजिक रोषाला तोंड द्यावे लागले. किंवा त्यांना बहिष्कृत केले गेले.
उदा. सती जाणे, विधवेचे केशवपन करणे, स्पृश्यास्पृश्यता इ. प्रथा बंद करणे, आंतरजातीय विवाह मान्य करणे, रोटी-बेटी व्यवहाराला मान्यता देणे इ.कालसापेक्ष सुधारणा घडवून आणणे इ. गोष्टींना धर्मधुरीण आणि धर्ममार्त॔डांचा पूर्ण विरोध होता.
यासाठी तर आधी ब्रिटिश आणि नंतर स्वतंत्र भारताचे संविधान यांच्यामार्फत अमानुष आणि व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणार्या चालीरितींच्या विरोधात कडक कायदे करावे लागले.डाॅ. आंबेडकरांनी सविधान सादर केले त्यासही आता 70 वर्षे झाली.
तरी काही अनिष्ट प्रथा, जातपंचायत इ. आजही आपले प्राबल्य राखून आहेत. उदा. काही मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाकारणे, आंतरजातीय विवाह अमान्य करणे, काही कामे करण्यापासून स्त्रियांना वा काही जातींना वंचित ठेवणे इ.
त्यामुळे सामाजिक सुधारणांना अडथळा करणार्या जातीव्यवस्थेचा अंत घडवून आणणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण संविधान पाळू, जाती नष्ट करू, #आम्हीभारतीय #ThanksDrAmbedkar

9 - हिंदू धर्मामधे 'सार्वजनिक भावना', एकीची भावना', 'एकता ही भावना', 'सामाजिक दातृत्व', किंवा सामाजिक बांधिलकी' इ. संकल्पना फारच संकुचित अर्थाने वापरल्या गेल्या आहेत.
कारण 'सार्वजनिक' म्हणजे त्या जातीपुरता स्तिमित किंवा मर्यादित असा. एका जातीचा समाज दुसर्या जातीच्या समाजाला आपलेसे करू शकत नाही तिथे सार्वजनिक ही संकल्पनाच फोल ठरते. एखादी व्यक्ती नेता असेल तर तिला नेता म्हणून फक्त त्या व्यक्तीच्या समाजाची मान्यता असते.
डाॅ. आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त म. गांधी सर्व जाती-जमातींनी मान्य केले असे नेते होते. सार्वजनिक भावनेचा अभाव असल्यामुळे सामाजिक बांधिलकी, एकता, इ. संकल्पना अर्थहीन ठरल्या. आजही आपल्या अनेक नेत्यांचे बहुमोल कार्य जातीच्या संकुचितपणामुळे मर्यादित राहिले.

10 - हिंदू धर्मातील 'चातुर्वर्ण' ही व्यवस्था हिंदू समाजात खोलवर रुजली आहे. आर्य समाज सारख्या सुधारकांसकट अनेकांनी जाती नष्ट करण्याचे प्रयत्न केले.
परंतु वर्ण व्यवस्थेतून ते बाहेर पडू शकले नाहीत. प्रचलित 4000 जातीमधे जे कोणी विचारवंत, अभ्यासक, ज्ञानी असतील मग ते कोणत्याही जातीचे असोत, त्यांना ब्राह्मण म्हणावे, आणि त्याखाली तरतम योग्यतेप्रमाणे क्षत्रिय, वैश्य वा शूद्र म्हणावे अशीआर्यसमाजाची मांडणी होती.
पण सर्व मांडणी मूळ चार वर्णांच्या पलिकडे जाऊ शकली नाही. डाॅ. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे जाती व जातीवाचक उल्लेख यांचा पूर्णपणे नायनाट झाल्याशिवाय आपण समता, एकता, आणि बंधूता ही मूल्य जोपासू शकणार नाही.
म्हणूनच आपण आपली जात कोणती आहे हे विसरून जाऊ.

11. चातुर्वर्णव्यवस्थेमुळे हिंदू समाजावर किती घातक परीणाम झालेत याबद्दल डाॅ. आंबेडकरांनी बरेच मुद्दे मांडलेत. चातुर्वर्ण हे माणसाची उन्नति रोखणारं दुष्ट चक्र आहे.
चायुर्वर्णामुळे जाती, उपजाती, पोटजाती, जातीअंतर्गत आडनावनिहाय, गोत्रनिहाय आणि कुलनिहाय असे कडवे समूह तयार झाले. त्यातून सोडवता येणार नाहीत असे अशक्यप्राय गुंते निर्माण झाले.
उदा. कुलकर्णी- कुलकर्णी हा उच्च विवाह मानला गेला म्हणजे अर्थातच एखाच जातीतल्या मिश्र विवाहाचं काय? लिमये कुलवृत्तांत, जोशी कुलवृत्तांत अशा गोष्टींनी कुला-कुलात छोटा आणि मोठा असे भादभाव आणले. याची परीणती म्हणजे प्रत्येक समूहा समूहात विद्वेष निर्माण झाला.
यामुळे समाजांतर्गतसुध्दा ज्ञानाची देवाण घेवाण नष्ट झाली. ज्ञान दिल्याने वाढते पण इथे ते लपवून ठेवावे कसे अशाच प्रथा निर्माण होत गेल्या. त्यामुळे बाबासाहेबांनी जातीरहित नवीन समाजाची संकल्पना मांडली.

12. वर्णव्यवस्थेचे प्राबल्य आणि जातीव्यवस्थेचा विळखा यातून बाहेर पडायचे असेल तर ही व्यवस्था नाकारली पाहिजे आणि त्यासाठी प्रचलित धर्मशास्त्राचा हिंदूंनी त्याग केला पाहिजे असे डाॅ. आंबेडकरांचे स्पष्ट मत होते.
जाती आणि वर्ण यापलिकडे जाऊन मिश्र विवाह, योग्यतेनुसार सामाजिक मानमरातब व मान्यता, व्यक्तीस्वातंत्र्य, समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. चा पुरस्कार करणारा समाज व देश निर्माण व्हावा ही त्यांची कळकळीची इच्छा होती.
पण ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी जातीनिहाय (communal award) मतदारसंघ असावेत अशी ब्रिटिश सरकारसमोर मांडणी केली. त्याला म. गांधींनी सक्त विरोध केला. म. गांधींच्या मते जातीविद्वेषच इतका आहे की जातीजातींचे वेगवेगळे मतदार संघ तयार झाले तर जाती जातीत युध्दंच होतील.
70 वर्षांपूर्वी आणि त्यानंतरही जाती या विषयांवर खूप उहापोह झाले. आपण आज 21 व्या शतकात, इंटरनेट आणि तत्सम हाय्-टेक विश्वात कोणताच उहापोह आणि फारसा कांगावा न करता आपल्या जातींचा त्याग करू शकतो का हा खरा कळीचा मुद्दा आहे.
जाती आणि वर्ण यापलिकडे जाऊन मिश्र विवाह, योग्यतेनुसार सामाजिक मानमरातब व मान्यता, व्यक्तीस्वातंत्र्य, समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. चा पुरस्कार करणारा समाज व देश निर्माण व्हावा ही त्यांची कळकळीची इच्छा होती.
पण ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी जातीनिहाय (communal award) मतदारसंघ असावेत अशी ब्रिटिश सरकारसमोर मांडणी केली. त्याला म. गांधींनी सक्त विरोध केला. म. गांधींच्या मते जातीविद्वेषच इतका आहे की जातीजातींचे वेगवेगळे मतदार संघ तयार झाले तर जाती जातीत युध्दंच होतील.
70 वर्षांपूर्वी आणि त्यानंतरही जाती या विषयांवर खूप उहापोह झाले. आपण आज 21 व्या शतकात, इंटरनेट आणि तत्सम हाय्-टेक विश्वात कोणताच उहापोह आणि फारसा कांगावा न करता आपल्या जातींचा त्याग करू शकतो का हा खरा कळीचा मुद्दा आहे.
ॲनिहिलेशन ऑफ कास्ट - समारोप
गेल्या बारा भागात जातीव्यवस्था का नष्ट करावी याबाबत डाॅ. आंबेडकरांची कारणमीमांसा आपण पाहिली. ही विषवल्ली जातीव्यवस्था हिंदू धर्माला आणि भारतातील समाजजीवनाला कशी खिळखिळी करते हे यावरून स्पष्ट दिसते. यावर डाॅ. आंबेडकरांनी काही अशा उपयुक्त गोष्टींचा उहापोह केलाय की ज्यामुळे भारतातील लोकशाही टिकून राहील.
हिंदू धर्मात सुधारणा आणू इच्छिणारे पुरोगामी लोक हिंदू धर्म बुडवू पहाताहेत असे हिंदूत्ववाद्यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात इतर धर्मातल्या जाती आधी नष्ट करा. डाॅ. आंबेडकरांच्या मते इतर धर्मातील जाती आणि हिंदू धर्मातील जाती यात खूप फरक आहे. मुस्लीम, शीख, ख्रिस्ती इ. धर्मात कडवे जातीभेद नाहीत. त्यांना जाती न म्हणता पंथ म्हणता येईल. हिंदू धर्मातील जाती या फक्त आणि फक्त हिंदू धर्मातच आहेत. इतर धर्मातील सर्व सणवार सर्व पंथ एकत्र रित्या एका ठिकाणी पाळतात, साजरे करतात. हिंदू धर्मात जाती जातीत इतका कडवेपणा आहे की सणावारीही ते एकत्र येऊ शकत नाहीत.
आजवर जाती-अंतर्गत सुधारणा घडवून आणून त्यायील कडवेपणा पातळ करण्याचा प्रयत्न विविध प्रकारे अनेकांनी केला पण त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. किंबहुना धर्मधुरीणांनी त्यांना बहिष्कृत केले. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, चोखा महार, एकनाथ, गाडगेबाबा, साईबाबा इ. अपवाद वगळता त्या त्या जातींनीच या लोकांना त्यांच्या हयातीत छळले. मरणोत्तरही हे संत सर्वांचे संत झाले नाही. वारकरी संप्रदाय आणि साईभक्त यांची गोष्ट अपवाद. तरीही जातींचा कडवेपणा नष्ट होऊ शकला नाही.
संतांप्रमाणेच इतर समाज सुधारकांनाही हिंदू धर्मीयांनी धर्मबुडवे म्हणून हिणवले. छं शाहूमहाराज, म.फुले, आगरकर, राजा राम मोहन राॅय, राजारामशास्त्री भागवत, शाहीर अण्णाभाऊ साठे, डाॅ. आंबेडकर इ. अनेकांची उदाहरणे देता येतील. काही झाले तरी हिंदू धर्मात सुधारणा होणार नाहीत तसेच प्रवाही उत्क्रांतीही त्यात घडून येणार नाही. वरकरणी लोक आपण जातीवादी नसल्याचे ओरडून सांगत असले तरी रोटी-बेटीचा प्रश्न आला की जातीनिरपेक्षतेपासून दूर पळतात.
म्हणूनच डाॅ आंबेडकर म्हणतात की काहीही झाले तरी हिंदू धर्मातली जातीयता नष्ट होणार नाही. हिंदू धर्म कधीच त्यांच्यातल्या दलित समजल्या गेलेल्या जातींची प्रगती होऊ देणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतः लाखो दलित बंधूंच्या उध्दारासाठी धर्मांतर केले. आणि देशीला जातीवादापासून वाचवण्यासाठी सर्वसमावेशक असे संविधान बनवले. संविधान बनवण्यात खूप मोठ्या मोठ्या पुरोगामी विचारवंतांचा सहभाग होता. त्या सर्वांच्या एकमताने संविधान संमत झाल्यामुळेच आज आपल्या देशाने 'संविधान' नावाचा धर्म पाळावयाचे ठरविले आहे.
जातीद्वेष आपल्या देशाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये म्हणून आपणही आज #आम्हीभारतीय असा नारा देऊ आणि आपला भारत प्रगतीपथावर पुढे जावा म्हणून संविधानास बांधील राहू.
कल्पना चारुदत्त
आम्हीभारतीय
ReplyDelete