साजरी बाजरी आणि मी (कल्पना चारुदत्त - 5 जुलै 2019)
बाजरीची आणि आमची पहिली ओळख 72-73 च्या दुष्काळातली. आम्ही गोवन मुळातले पक्के भातखाऊ. रोजचं जेवण म्हणजे मुख्यतः भात. चपाती, फुलके, पोळ्या फक्त सकाळच्या न्याहरीपुरत्या. तेही आमची आई लग्नानंतर बरीच पुणेकर झाल्यानंतर. थोडक्यात 72 सालच्या दुष्काळाच्या झळा थेट आमच्या भाताला न् पोटाला बसल्या. तांदुळच दुकानातून गायब होऊन रेशनवर गेला. आम्ही वाढत्या वयातली पाठोपाठची चार भावंडं, रेशनचा तांदूळ पुरणार कसा?
गरज आणि तीही एका आईची गरज ही अनेक शोधांची जननी असते. आईला कोणीतरी सांगातलं की बाजरीचा भात होऊ शकतो. मग काय प्रयोग सुरू. रात्री नीट निवडून सावडून आईनं बाजरी गरम पाण्यात भिजवली न् दुस-या दिवशी भात बनवला. मस्त शिजवली मऊमऊ. घरभर छान गोडसर सुवास पसरला होता. स्वतःशीच बडबडत ती बोलत होती की त्याबरोबर काय! डाळ? कडधान्य? कुवळ? तिवळ ? छे छे! तिनं पहिल्या दिवशी मधुर ताक घुसळून काढलं (ताक मधुरच असतंय!) न् म्हणाली खा पोटभर! आम्ही ताव मारला. मासळीसोबत मात्र साठवलेल्या रेशनच्या तांदळाचाच भात!
बाजरीचा मऊ गोडसर भात, जोडीला ताक. दुष्काळ संपून गेला तरी हा भात आमचा प्रियच होऊन बसला. कालांतरानं आमच्या खाण्याच्या पध्दतीत अमूलाग्र बदल होत होत कधी त्या चपात्या स्वयंपाक घरात शिरल्या कोण जाणे!
ही आठवण आज आली कारण फारा दिवसांनी बाजरीतली आंबाडीची भाजी मी आज बनवली, स्वतः खाल्ली न् सगळ्यांना खाऊ घातली. ही रेसिपी म्हणजे माझ्या सासूबाईंचा माहेरचा वारसा, नाशिकचा! चांगली फुलाला आलेली (पण फुलं न आलेली) आंबाडीची जुडी - लाल देठांची जास्त चवदार! शक्य तितके जून देठ न घेता पानं आणि टोकाकडचे कोवळे देठ खुडून घ्यायचे. एक मध्यम आकाराची वाटीभरून बाजरी रात्री कडकडीत गरम पाण्यात भिजत घालायची. भिजवलेली बाजरी, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले हरभरे किंवा हरभरे डाळ, एकत्र एक शिट्टी देऊन ऊकडून घ्यायची. कुकरचं झाकण निघालं की आंबाडी बारीक चिरून (पाण्यात घालून पिळून पाणी टाकणे इ. सोपस्कार न करता) कुकरमधे बाजरीवर टाकायची. थोडं मीठ न् तेल सोडून पुन्हा कुकरमधे नीट शिजवून घ्यायची. भरपूर लसूण आणि हवी तेवढी हिरवी मिरची बारीक चिरून नेहमीपेक्षा जरा जास्त तेलात फोडणी करून शिजवलेली बाजरीमिश्रित भाजी फोडणीत टाकायची. भरपूर वाफवून परतायची. जरा घट्टसर व्हायला हवी. भाजीची गंमत पुढंच आहे. एका छोट्या कढईत मोठा कपभर तेल तापवून मोहरी, जिरे, लाल अख्ख्या मिरच्यांचे तुकडे, माणशी किमान 7-8 लसूण पाकळ्या इ. ची खमंग फोडणी करून ठेवायची. जेवताना भाजी वाढून त्यात विहीर करून हवी तितकी फोडणी वाढून घेऊन मऊसूत घडीच्या पोळ्यांबरोबर हवी तेवढी चापायची. आंबाडीत 'ए' व्हिटॅमिन भरपूर असतं, ते शरीरात पध्दतशीर शोषून घेण्यासाठी तेल भरपूर हवं, कारण 'ए' व्हिटॅमिन तेलात पचनायोग्य होतं असं माझ्या डॉक्टर आतेसासूबाई सांगत. अशी भाजी खाऊन मन धाधोशी (अधाशीच्या विरूध्द 'समाधानी' या अर्थाचा गोवन शब्द) होतं!
आम्ही 2-3 वर्षं मंचर त्र्यंबक इ. ठिकाणी काढली. बारोमास बाजरी! उष्ण किंवा थंड म्हणून अमुकच ऋतूत खा, किंवा चतकोरच खा, वगैरे वगैरे भानगडच नाही. बाजरी खाणा-या प्रदेशात (निदान वीस वर्षापूर्वीची गोष्ट) बायकांना कंबरदुखी हा विकार नव्हता. बाजरीत भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, आवश्यक ती खनिजं असतात. आठवड्यातून एकदातरी बाजरी खा!

No comments:
Post a Comment