Tuesday, 18 September 2018

Rajendra Dakhane

*अडगळीत_गेलेले_शब्द*
.
.
‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की *‘अडगळ’* हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.
.
.
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.
.
.
जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. *ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर* हे शब्द विसरायला झाले आहेत.
.
.
*माळा* (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
.
.
तसंच आता *व्हेंटिलेटर* फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.
.
.
*‘वळचण’* हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
.
.
*पागोळं* म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात - ती पागोळी.
.
.
*‘फडताळ’* ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. *खुंटी, कोनाडे, देवड्या* हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
.
.
जुन्या घरातील *न्हाणीघर* (बाथरूम) असंच. ऐसपैस *चुलाण्यावर* पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी *चौरंग,* अंग घासायला *‘वज्री’, ‘घंगाळ’* असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
.
.
गृहिणीची *कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या* सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
.
.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला *‘आगवळ’* म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
.
.
.

स्वयंपाकघरातील *चूल* गेली त्याचबरोबर *चूल,वैल,निखारे* हे शब्दही गेले.
.
.
स्वयंपाकघरातील *सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज* हे शब्द आठवेनासे झाले.
.
.
*ओगराळं* हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
.
.
*पंचपाळे, चौफुले, कावळे* हे सगळे हरवले.
.
.
देवघराबरोबर *सहाण, गंधाची थाटी* गायब.
.
.
*‘काथवट’* हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
.
.
कपड्यांचा विचार करताना *तठव,जाजम,बसकर, सुताडे* सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
.
.
पण उत्तरवस्त्र *‘पाभरी’* हरवून गेली.
.
.
सोवळ्यात नेसण्याची *‘धाबळी’* सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
.
.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
.
.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण *कणग्या, ढोल्या* - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.
.
.
*सूप* खुंटीवरून बाउल मधे आलं.
.
.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे *‘पेव’* खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
.
.
जेवण्याची *पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक* वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर *पिकदानी* सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ *अडकित्त्याचा* हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला *चोप* म्हणत असत..घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला *बैठक* असायची ,तिला *ढाळज* किंवा *ढेळज* म्हणत..हे पण अडगळीतील नावे आहेत ...
.
.
.
लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच....
( Rajendra Dakhane

Saturday, 15 September 2018

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
            *सन: ७/२/१९५८*

      *.... गणपतीचे रहस्य ....*

(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)

   पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा

_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._

_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._

_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._

_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._

_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._

_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._

_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._

_चित्त आणि मल्ल._

_चित्त म्हणजे शरीर,_ 
_मल्ल म्हणजे मळ._

_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावूनपार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला._

_तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे._

_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!_

_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??_

        *…अष्टविनायक…*

_जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला._

_म्हणजे दुखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत._

_मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले._

_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे._

_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपति सुखकर्ता दुखहर्ता होउ शकतो काय...???_

_काल्पनिक गणपतिने बुद्धत्व प्राप्त करुन दुक्खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही._

_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???_

_बुद्धाने दुक्ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत._

_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपति हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे...!!!_

_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले..._

          *…मोरया…*

_पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्रह्मंनानी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या._

_मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे....!!!_

_कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे._

_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!_

_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली._

_ब्रह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर_

_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले._

_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._

_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._

_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._

_कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता._

_पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला._

_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला._

_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि  सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात._

_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो._

 *- प्रबोधनकार ठाकरे*
    *सन: ७/२/१९५८*

Vijay sir 👌👌👍

Tuesday, 11 September 2018

वॉटस्ॲपवरून पाठवलेली -- पुणे, मराठी इ.इ.

*#पुणे*

हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले 'यम'नियमही स्वतंत्र आहेत.

वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता 'अमृततूल्य' म्हणतो

पुणे-मुंवई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. - गुगलवर मराठी टाईप करताना अद्  भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, 'गणपती बघायला आले आणि इथेच राहिले' या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत
चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी -

*एका वाक्यात उत्तरे द्या*
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

*खालील विषयांवर निबंध लिहा -*
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार - अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

*सविस्तर उत्तरे द्या -*
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

*हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. -*
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३.  पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

*योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा - (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) -*
१. पुणेकर ..... असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले ...... आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ..... आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ..... असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे.
पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे.

*पुण्यवान पुणेकर*

Tuesday, 4 September 2018

विवेकवाद
आभाळ का पडत नाही?
गोष्ट आहे विनोबांची.  आज तीव्रतेने आठवण झाली. ऐका –
एका गावातल्या एका तरूणाला एकदा प्रश्र्न पडला की डोक्यावरच्या या आभाळाला टेकू द्यायला खांब नाहीये, पण मग ते पडत कसं नाही?
या प्रश्र्नाने त्याच्या मनात घर केलं. त्याची तहान, भूक, झोप, शांती आणि इच्छाशक्ती हरवून गेली. साधू-संत, देवऋषि-महर्षि, गुरूजी-पुजारी आणि सर्व देवभक्त सर्वांना विचारून झालं. कोणालाच उत्तर ठाऊक नव्हतं.
एकदा त्या गावात एक अवलिया आला. दिसत होता भिकारी, पण तेजस्वी! गवकरी म्हणाले ‘जा त्याला विचार तुझा प्रश्र्न’. हा गावकरी गेला त्याच्याकडे.
म्हणाला “तुम्ही देव पाहिलाय का हो? ह्या आभाळाला खांब नाहीये आणि तरी ते कोसळत नाहीये आपल्यावर. सगळे म्हणतात की ते देवानं पेललंय. मला तर बुवा हा देव काही मला भेटला नाही की कोणाला दिसला नाही. तुम्ही इतके हुशार दिसताय, मला एव्हढं उत्तर द्या की.”
अवलिया गालातल्या गालात हसला. त्याला उत्तर ठाऊक होतं. पण ते उत्तर मिळवण्यासाठी एक कठोर परीक्षा द्यावी लागणार होती. गावकरी तयार झाला. अवलिया म्हणाला “उद्या सकाळी लवकर उठ. हातात वाडगा घे. प्रत्येक घरात भीक माग. पण एक अट आहे. कोणतंच घर वगळायचं नाही. घरासमोर उभा राहून हाक मारायची. घरातलं जे कोणी बाहेर येईल त्याला जोरजोरात येतील त्या शिव्या द्यायच्या. हात उगारायचा नाही. सगळी घरं संपली की काय काय घडलं ते मला जसंच्या तसं सांगायचं. परीक्षा कठीण आहे. पूर्ण केलीस तर आभाळ कोणी पेललंय ते कळेल.”
गावकरी अचंबित झाला पण उत्तराची आशा इतकी प्रबळ होती की तो तयार झाला. सकाळी लवकर निघाला. पहिल्या घरासमोर उभा राहून “जरा खायला दे गं माऽऽऽय”, अशी हाक दिली. मायमाऊली हातात भाकरी घेऊन बाहेर आली. या पठ्ठ्यानं शिव्या द्यायचं काम सारू केलं. त्या माऊलीनं त्याला बेदम चोपून काढलं. आणि हाकलून दिलं. बिचारा! तसाच पुढं गेला. उत्तर हवं होतं ना! गावातल्या प्रत्येक घरात हेच घडलं.
मार खाऊन अर्धमेला झाला. अंगावरचे कपडे फाटले. अंधार पडायला लागला. पोटातली भूक सहन होईना. परत निघाला. वाटेत एक मिणमिणता दिवा दिसला. एक झोपडं दिसलं. वाटलं बस्स आता. आता मार खायची हिम्मत नाही. ऐनवेळी अवलियाचा चेहरा आठवला. उत्तराची अपेक्षा वाढली. पाय ओढत ओढत झोपडीपाशी आला. हाक मारली. एक म्हातारी बाहेर आली. यानं शिव्यांची लाखोली सुरू केली. मार खायच्या तयारीत तिच्याकडे बघत होता. तेव्हढ्यात ती म्हातारी पुढं आली. त्याच्या दंडाला धरलं. म्हणाली “अरे येड्या, दमलेला दिसतुयस, जरा आत ये, बस, पाणी पी, भाकरी न् भाजी खाऊन घे. मग काय त्या शिव्या दे.”
गावकरी रडू लागला. खाण्याआधीच त्याचं पोट भरलं होतं. नंतर शिव्या द्यायचं तो विसरून गेला. त्या अवलियाकडे परत जायला निघाला. मनात म्हणाला ‘एव्हढं सगळं झालं पण तो देव किंवा आभाळाला पेलणारा कोणी भेटला नाही.’
अवलियाला सर्व कथा इत्यंभूत सांगितली.
अवलिया म्हणाला, “बाळा, तुझी दृष्टी अधू झालीये. ती म्हातारी आहे ना, ती म्हणजे विवेकाचं प्रतीक आहे. तिनं नुसतं बोट लावलंय आभाळाला. त्यामुळे ते पडत नाहीये. तिच्यात तुला देव दिसेल नीट पाहिलस तर!”