काहूर
रात्र सरे काळोखाची, दिवस उघडी डोळे
धूर साचला सभोती, दिसामाजी जग जळे.
दिस सारे दिसापरी, रात्र सदाची आजारी
इथे-तिथे दंगा धोपा, शांती रडतसे दारोदारी.
सूर्य येई डोक्यावरी, घेऊनी नवी उभारी
दिसामाजी डोळ्यामधी, पाणी सुकल्या विहीरी.
मन माझं सुन्न सुन्न, सांगावे हे कोणापाशी
धर्म जातीच्या जंजाळी, बुडालेत देशवासी.
परदेशा कसे जावे, पहारा तो वेशीपाशी
माती माझी माझ्यापरी, प्राण अमुचे कंठाशी.
बाप अमुचा उघड्या देही, मरण घेई छातीवरी
देश जळे चितेमधी, शांती-ज्योत फरफर करी.
येऊ दे पहाट नवी, अंत नको पाहू देवा
उसवलेल्या माणसासाठी, एक टाका हवा नवा.
(ओवीच्या चालीत)
कल्पना भागवत
रात्र सरे काळोखाची, दिवस उघडी डोळे
धूर साचला सभोती, दिसामाजी जग जळे.
दिस सारे दिसापरी, रात्र सदाची आजारी
इथे-तिथे दंगा धोपा, शांती रडतसे दारोदारी.
सूर्य येई डोक्यावरी, घेऊनी नवी उभारी
दिसामाजी डोळ्यामधी, पाणी सुकल्या विहीरी.
मन माझं सुन्न सुन्न, सांगावे हे कोणापाशी
धर्म जातीच्या जंजाळी, बुडालेत देशवासी.
परदेशा कसे जावे, पहारा तो वेशीपाशी
माती माझी माझ्यापरी, प्राण अमुचे कंठाशी.
बाप अमुचा उघड्या देही, मरण घेई छातीवरी
देश जळे चितेमधी, शांती-ज्योत फरफर करी.
येऊ दे पहाट नवी, अंत नको पाहू देवा
उसवलेल्या माणसासाठी, एक टाका हवा नवा.
(ओवीच्या चालीत)
कल्पना भागवत
No comments:
Post a Comment