महिला अणि राजकारण
दहा दिवसांपूर्वी टी व्ही बातम्यांमधे महापालिकेत महिला नगरसेविका भांडताना दाखविल्या गेल्या.
महिलांचे भांडण हा एक विनोदाचा प्रकार आहे किंवा काय अशा पद्धतीने सर्व (बघणारे आणि दाखवणारे) त्याकडे पाहत होते.
महिलांनी उच्चपद धारण करणे, त्या पदावरून काम करणे, आपल्या मुद्द्यांसाठी भांडणे, आपला मुद्दा समोरच्याला आग्रहाने सांगणे या गोष्टी सर्वाना नव्या नाहीत.
पण आपल्याकडे महिलांनी आपल्या मुद्द्यासाठी कसे भांडावे यासाठीची साचेबद्ध पद्धत नाही.
पुरुषांनी भांडताना खुर्च्या एकमेकांकडे फेकून मारल्या तर आपल्याला त्याबद्दल फारसे चुकीचे वाटत नाही. पुरुषांनी गुद्दागुद्दी केली तर त्याबद्दल फार हरकत घ्यावीशी वाटत नाही. किंबहुना पुरुषांची मर्दुमकी असल्याचा काहीजण दावाच करीत असतील. म्हणजे पुरुषांनी कसे भांडावे याबद्दलचे काही संकेत आपण मान्य केलेले दिसतात.
महिलांनी कसे भांडावे याबद्दल मात्र तसे काही संकेत अजून रूढ झालेले दिसत नाहीत. उच्चपदावर काम करणे व आपल्या मुद्द्यासाठी भांडणे याबाबत रूढी तयर होण्याच्या दृष्टीने महिलाकरण हा नवीनच प्रांत आहे. पूर्वी महिलांना भांडण्यासाठी नळ, पाणी भरणे, भाजीबाजार, चूल-घर अशा जागा होत्या. लौकिकार्थाने त्या कमीपणाच्या मानल्या जात होत्या. त्यामुळे महिलांमधील भांडणांना नळावरची भांडणे असे म्हटले जाते.
नव्या जमान्यात त्यामुळे आता मात्र या भांडणांना पुरुषांच्या भांडणा इतकीच प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. महिला भांडताना खुर्च्या फेकून मारणार नाहीत, शर्टाची बाही किंवा गळपट्टी पकडणार नाहीत, गुद्दागुद्दी करणार नाहीत. त्यांच्या नव्या रूढी तयार होईपर्यंत गळ्यातले मंगळसूत्र, केस, साडी, हातातली पर्स, छत्री इत्यादी गोष्टींचा वापर तिला करणे भाग आहे. पण म्हणून काही तिच्या भांडणाची तीव्रता कमी मानू नये. किंवा भांडणातल्या मुद्द्याचे महत्व कमी मानले जाऊ नये.
यात कोणीही महिलांना कमीपणा देणे बरोबर नाही. किंवा तो कमीपणा पुरुषांच्या भांडण्याच्या पद्धती इतकाच कमीपणाचा आहे. भांडण हे भांडणच आहे. पद्धत कोणतीही असो. टी व्ही माध्यमांनी याचा विचार करावा.

No comments:
Post a Comment