Saturday, 13 July 2019

साजरी बाजरी आणि मी (कल्पना चारुदत्त - 5 जुलै 2019)

बाजरीची आणि आमची पहिली ओळख 72-73 च्या दुष्काळातली. आम्ही गोवन मुळातले पक्के भातखाऊ. रोजचं जेवण म्हणजे मुख्यतः भात. चपाती, फुलके, पोळ्या फक्त सकाळच्या न्याहरीपुरत्या. तेही आमची आई लग्नानंतर बरीच पुणेकर झाल्यानंतर. थोडक्यात 72 सालच्या दुष्काळाच्या झळा थेट आमच्या भाताला न् पोटाला बसल्या. तांदुळच दुकानातून गायब होऊन रेशनवर गेला. आम्ही वाढत्या वयातली पाठोपाठची चार भावंडं, रेशनचा तांदूळ पुरणार कसा?

गरज आणि तीही एका आईची गरज ही अनेक शोधांची जननी असते. आईला कोणीतरी सांगातलं की बाजरीचा भात होऊ शकतो. मग काय प्रयोग सुरू. रात्री नीट निवडून सावडून आईनं बाजरी गरम पाण्यात भिजवली न् दुस-या दिवशी भात बनवला. मस्त शिजवली मऊमऊ. घरभर छान गोडसर सुवास पसरला होता. स्वतःशीच बडबडत ती बोलत होती की त्याबरोबर काय! डाळ? कडधान्य? कुवळ? तिवळ ? छे छे! तिनं पहिल्या दिवशी मधुर ताक घुसळून काढलं (ताक मधुरच असतंय!) न् म्हणाली खा पोटभर!  आम्ही ताव मारला. मासळीसोबत मात्र साठवलेल्या रेशनच्या तांदळाचाच भात!

बाजरीचा मऊ गोडसर भात, जोडीला ताक. दुष्काळ संपून गेला तरी हा भात आमचा प्रियच होऊन बसला. कालांतरानं आमच्या खाण्याच्या पध्दतीत अमूलाग्र बदल होत होत कधी त्या चपात्या स्वयंपाक घरात शिरल्या कोण जाणे!

ही आठवण आज आली कारण फारा दिवसांनी बाजरीतली आंबाडीची भाजी मी आज बनवली, स्वतः खाल्ली न् सगळ्यांना खाऊ घातली. ही रेसिपी म्हणजे माझ्या सासूबाईंचा माहेरचा वारसा, नाशिकचा! चांगली फुलाला आलेली (पण फुलं न आलेली) आंबाडीची जुडी - लाल देठांची जास्त चवदार! शक्य तितके जून देठ न घेता पानं आणि टोकाकडचे कोवळे देठ खुडून घ्यायचे. एक  मध्यम आकाराची वाटीभरून  बाजरी रात्री कडकडीत गरम पाण्यात भिजत घालायची. भिजवलेली बाजरी, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले हरभरे किंवा हरभरे डाळ, एकत्र एक शिट्टी देऊन ऊकडून घ्यायची. कुकरचं झाकण निघालं की आंबाडी बारीक चिरून (पाण्यात घालून पिळून पाणी टाकणे इ. सोपस्कार न करता) कुकरमधे बाजरीवर टाकायची. थोडं मीठ न् तेल सोडून पुन्हा कुकरमधे नीट शिजवून घ्यायची. भरपूर लसूण आणि हवी तेवढी हिरवी मिरची बारीक चिरून नेहमीपेक्षा जरा जास्त तेलात फोडणी करून शिजवलेली बाजरीमिश्रित भाजी फोडणीत टाकायची. भरपूर वाफवून परतायची. जरा घट्टसर व्हायला हवी. भाजीची गंमत पुढंच आहे. एका छोट्या कढईत मोठा कपभर तेल तापवून मोहरी, जिरे, लाल अख्ख्या मिरच्यांचे तुकडे, माणशी किमान 7-8 लसूण पाकळ्या इ. ची खमंग फोडणी करून ठेवायची. जेवताना भाजी वाढून त्यात विहीर करून हवी तितकी फोडणी वाढून घेऊन मऊसूत घडीच्या पोळ्यांबरोबर हवी तेवढी चापायची. आंबाडीत 'ए' व्हिटॅमिन भरपूर असतं, ते शरीरात पध्दतशीर शोषून घेण्यासाठी तेल भरपूर हवं, कारण 'ए' व्हिटॅमिन तेलात पचनायोग्य होतं असं माझ्या डॉक्टर आतेसासूबाई सांगत. अशी भाजी खाऊन मन धाधोशी (अधाशीच्या विरूध्द 'समाधानी' या अर्थाचा गोवन शब्द) होतं!

आम्ही 2-3 वर्षं मंचर त्र्यंबक इ. ठिकाणी काढली. बारोमास बाजरी! उष्ण किंवा थंड  म्हणून अमुकच ऋतूत खा, किंवा चतकोरच खा, वगैरे वगैरे भानगडच नाही. बाजरी खाणा-या प्रदेशात (निदान  वीस वर्षापूर्वीची गोष्ट) बायकांना कंबरदुखी हा विकार नव्हता. बाजरीत भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, आवश्यक ती खनिजं असतात. आठवड्यातून एकदातरी बाजरी खा!

मामाची बस, ट्रीप आणि थालिपीठ


मामाची बस, ट्रीप आणि थालिपीठ (कल्पना चारुदत्त – 10 जुलै 2019)

69 – 70 सालातली गोष्ट. विजयमामानं बस घेतली, बस घेतली ही बतमी पुण्यतल्या आमच्या सर्व नातेवाईकंमधे भर्र्कन पसरली. कोणी कोणाला आधी सांगितलं, कोणी कोणाला नंतर सांगितलं या चर्चा चालल्या होत्या, तोवर विजयमामाच घरी येऊन पोचला. म्हणाला, “सुधा, मी बस घेतलीये, काय, तू ऐकलंच असणार.” आई हं म्हणून गालातल्या गालात हसली. म्हणाली, “काम काय ते सांग.”
“सगळ्यांना घेऊन ट्रीप काढायची म्हणतोय, काय.” आईनं परत तेच विचारलं, काम काय ते सांग आधी. विजयमामानं आम्हा चौघाही मुलांची चौकशी केली. हा मामा तसा आमचा फार फार आवडता मामा होता. बस त्याने घेतली होती, आम्ही अजून पाहिलीही नव्हती, पण काहीतरी मस्तच असणार असं वाटून आमची मनं उत्साहीत झालेली होती. मग मामा पुढं म्हणाला, “हे बघ, आपण सगळी मिळून माझ्या बसमधून एक ट्रीप काढूयात. तू थालिपीठ करून घे.” “फक्त? आणि जेवणाचं काय?”
“त्याचं सोड तू. ती झालीय सोय. आचारी आहेत बरोबर. थालिपीठ तुझ्याशिवाय अणि कोणाला जमणार? आपण सगळी हां, अगदी भाऊ आणि शालीसुद्धा. रविवारी हां! समजलं?” आईनं काहीही विचार न करता पट्कन होकार दिला. आपण सगळी म्हणजे पुण्यातले सगळे नातेवाईक. किमान 30-40 जण तरी होते. चहा-पाणी-गप्पा झाल्या. खुशीत मामा निघून गेला.
तो गेल्या गेल्या आईनं वरच्या फळीवरचे दोनही मोठे टोप खाली काढले.
हे आमचं थालिपीठ प्रकरण फार वेगळं असतं. उत्सवच म्हणाना! आईनं शेजारच्या कासटच्या दुकानातून दोन-तीन किलो तांदुळ आणले. दोन-तीन नारळ आणले. एका बाजूला आमच्याशी काहीबाही बडबडतही होती. त्यादिवशी बडबड करून माझी लाज काढू नका. हे वाक्य खास माझ्यासाठी. दंगाबिंगा तर अजिबात करायचा नाही.  पेटीतले चांगलेसे कपडे काढून ठेवा. खरंतर पेटीत ठेवणीतले असे दोन-तीनच कपडे असायचे. आम्ही चार भावंडं. परीस्थिती बेताची. शिवाय त्यावेळीही पैसेवाल्यांकडे काही फार कपडे असायचे असं नाही. असो! अशा तिच्या सुचना तीन-चार दिवस चालु होत्या. एका बाजूला तिचे हात थलिपीठाच्या दिशेने काम करत होते. दुसर्‍या दिवशी तिनं दोनेक किलो तांदुळ धुवून स्वच्छ पंचावर पसरून ठेवले. ते न लाथाडण्याबद्दल आम्हाला तंबी देऊन ठेवली. शनिवार उजाडला. सकाळची शाळा. आम्ही शाळेतून घरी आलो तर आईनं जातं मांडून ठेवलेलं. आम्हाला समजूनच गेलं की आता पुढं मज्जाच आहे. उत्सव सुरू झाला. आईनं धुतलेले तांदुळ कणीदार दळून काढले. संदिपला कोळसे आणायला पळवलं. खरंतर ती कधीच शनिवारी कोळसे आणीत नसे. पण विजयमामा, बस, ट्रीप आणि थालिपीठ अशा सगळ्याच गोष्टींवर तिचं अतीव प्रेम! मला संगितलं आणि मी लगेच कॉट्खालून शेगडी काढली. माझ्याकडून कांदे चिरून घेतले दोनेक किलो तरी असतील. दोन नारळ फोडले. स्वतः विळीवर खोबरं खवलं. एका ताटात 20-22 लवंगा, त्याच्या जरा चढत्या प्रमाणात मिरी, दलचिनी, धणे, बडिशेप, खसखस, लसूण, आणि त्याच्याबरोबर खवलेल्या खोबर्‍यामधलं (दोन नारळ) थोडं खोबरं हे सगळं मंद मंद भाजून काढलं. मला बसवलं पाट्यावर वाटायला. भाजलेला मसाला आणि उरलेलं खवलेलं खोबरं. तेव्हा मिक्सर-बिक्सर असलं काही नव्हतं. वाटण गंधबारीकच हवं. एका बाजूला तिनं थोड्या काजूचे वाटीभर तुकडे करून घेतले. नारळाच्या एका वाटीतून खोबर्‍याचे तुकडे काढले. ते विळीवर अगदी बारीक चिरून घेतले. दीडेक वाटी गूळ चिरून ठेवला. अर्धी वाटी चिंच भिजवली. एव्हढं होईस्तो रात्रीचे आठ वाजून गेले होते. स्टोव्हवर मोठा टोप चढवून ती लागली शेगडीच्या मागे. शेगडीची पूर्वतयारी माझ्याकडे सोपवून तापलेल्या टोपात जरासं तेल टाकून ते तापल्यावर त्यात कांदा टाकला. कांदा जरा जरा भाजल्यावर त्यात तिनं दळलेल्या तांदुळकण्या टाकल्या. भरपूर हळद आणि मीठ टाकलं. परतताना सरासर वाफा यायला लागल्या तसं तिनं त्यात जितक्यास तितकं आणि वर जरा जास्त इतकं उकळतं पाणी टाकलं. झाकणी ठेऊन जरा वाफ आणली. कणी दोन बोटात दबून पाहिली. मऊ झालेली होती. मग त्यात वाटलेला सगळा मसाला घेऊन त्यात भाजलेल्या लाल मिरचीची पूड दोनेक वाट्या (कारण हे थालीपीठ खूप तिखट होणं हे त्याचं खास वैशिश्ट्य.) घालून नीट कालवून, थोडं पाणी घालून ते मिश्रण सरसरीतसं करून शिजवलेल्या तांदुळकण्यांमधे टाकून, काजू तुकडे आणि खोबर्‍याचे बारीक चिरलेले तुकडे घालून, चिंच-गूळ त्यात मिक्स करून मस्त परतून घेतलं. वरती मोठं ताट ठेऊन ताटात पाणी ओतलं. स्टोव्ह जरा जरा वेळानं मंद केला. तो टोप खाली उतरवला आणि त्याच्यावर दुसरा टोप ठेऊन त्यात भरपूर तेल टाकलं. खूप तापल्यावर मूठभर मोहरी टकली, तडतड्ल्यावर स्टोव्ह बंद करून त्यात मूठभर जिरे टकले. फोडणी थोडी थंड झाल्यावर निम्मी एका वाटीत काढून घेतली. फोडणी असलेल्या टोपात शिजवलेलं सगळं मिश्रण निगुतीनं ओतलं. थारवल्यावर उरलेली वाटीतली फोडणी वरती नीट पसरून टाकली. 
इकडे तोवर तिच्या मदतीने मी शेगडी मस्त फुलवलेली होती. शेगडी एका कोपर्‍यात ठेवली. टोपावर ठेवायच्या ताटात निम्म्याहून अधिक फुलवले कोळसे ठेवले. परत शेगडीत कोळसे भरले. आणि थालिपीठबुवाचा टोप त्यावर ठेवला. त्याच्यावर कोळशांनी भरलेलं ताट ठेवलं. ताटावरच्या फुललेल्या कोळशात मधेमधे कांडी कोळशाचे छोटे छोटे तुकडे पेरून ठेवले. साईबाबा पाव रे बाबा, सगळं नीट होऊंदे रे बाबा, असं म्हणून हात जोडले. एव्हाना रात्रीचे अकरा तरी वाजून गेले होते. आम्ही मुलं बराच वेळ बड्बड करत बसलो होतो. आई कधी झोपली कोण जाणे!
सकाळी उठ्लो तर आई आंघोळ वगैरे करून तय्यार. मधेच तिनं बाबांनाही तयार व्हायला बजावलं. आमचं आवरेस्तो आठ वाजून गेले होते. ट्रीपचं ठिकाण होतं पुण्याजवळचं बनेश्वर, नसरापूर. मामा आला, आईला हाक दिली. अलगद थलिपीठाच्या पातेल्याजवळ आला. त्याच्यावरचं ताट काढलं. जरा वाकून वास घेऊन पाहिलं. “अरे सुधा, व्वा, व्वा! सुंदरच गं! अरे संदीप, जा लवकर, त्या ---“ संदीप जाग्यावर नव्हताच. बस, ट्रक यांच्यातच कायम रमणारा संदीप बसकडे कधीच पळाला होत. मी गेले आणि बसमधल्या त्या दोन आचारी नामक काकांना घेऊन आले. मामा आणि त्या दोघांनी मिळून थालिपीठबुवांना अलगद उचलून बसच्या पुढच्या भागात चादरीची एक चुंबळ करून त्यावर ठेऊन टाकलं. दबक्या आवाजात दंगा गड्बड करत, आई डोळे वटारुन (आधीच तिचे डोळे मोठे त्यात आम्ही तिला न आवडणार्‍या गोष्टी केल्या तर ती ते वटारून आम्हाला खाणाखुणा करून दंगा न करण्याबद्दल बजावते) बघत नाहिये ना असं बघून ढकलाढकली करून बसमधे बसलो. बाबा आमच्या मागे बसमधे आले आणि मामाच्या शेजारी जाऊन बसले. आई बसमधे चढल्याबरोबर आधी तिच्या थालिपीठाकडे जाऊन प्रेमानं त्याच्याकडं पाहून आली. तिनं साईबाबा साईबाबा जप सुरू केला आणि बस सुरू झाली.
पहिला थांबा सीटीपोस्ट. तिथं भाऊमामा, मामी आणि त्यांची तीन मुलं आली. मग फडके हौद. तिथं विजयमामी, विजयमामाची तीन मुलं, आणखी तीन मामा, मामी आणि त्यांची मुलं. तिसरा थांबा रास्तापेठ. तिथं बाकीचे सगळेच बसमधे आले आणि बस भरूनच गेली. सगळा दंगा, बड्बड, गड्बड, मुलांचा आरडाओरडा. कोणाच्याच आयांचं त्यांच्या मुलांकडे लक्ष नव्हतं. मामा, माम्या, मावशा, काका वगैरे मंडळी त्यांच्या त्यांच्या गप्पांमधे रंगून गेली.
कात्रजचा घाट उतरून बस जरा पुढं आली आणि ठ्ठॉम्म असा मोठा आवाज करत बंद पडली. आधी मामा खाली उतरला, मग ड्रायव्हर, मागून संदीप आणि इतर मामावगैरे मंडळी उतरली. काहीतरी खाट्खुट केलं. बसचा रुसवा जाईना. आत बायकांचा आणि उरलेल्या बारक्या मुलांचा दंगा. मी मागच्या खिडकीतून पहाते तो पुरुषमंडळी चक्क बस ढकलत होती. एकदम फार्र-फार्र करत बस सुरू झाली. सगळे जसजसे बसमधे चढले तसतसे मोठ्या मंडळींचे आवाज वाढत गेले. विजयमामानं टूम काढली की सगळ्या जोडप्यांनी शेजारी शेजारी बसायचं. बारकी मुलं त्यांच्या त्यांच्या नादात. मोठी मुलं जे काय चाललंय ते निगुत ऐकत होती. आमच्यासारख्या भोचक आणि अर्धवट वयातली आम्ही तिघं-चौघं उत्सुकतेने काय चाललंय ते आपलं लक्ष नाही असं भासवत चोरून चोरून पहात-ऐकत होतो. भाऊमामा आधीच मामीच्या जवळ बसला होता. आम्ही पुणेकर भावंडं मामा-मामीला विजयमामा-विजयमामी, भाऊमामा-भाऊमामी, अप्पासाहेबमामा-आप्पासाहेबमामी असं म्हणायचो. कोणी शिकवलं कोण जाणे! मामीमंडळींची नावं आम्हाला ठाऊकच नव्हती. त्याच्यावर थट्टा-विनोद झाले. हळूहळू सगळी जोडपी एकत्र बसली, फक्त आमचे आई-बाबा सोडून. विजयमामानं आईला ऊठून बाबांच्या शेजारी बसायला सांगितलं. माझ्या भावंडांना कळत होतं की नाही कोण जाणे, पण तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी कोरला गेलेला आहे. केतकी-गोरी आमची आई गालाला सुंदर खळ्या, कुरळ्या केसांच्या दोन-तीन छोट्याशा बटा, डोळे अर्धे मिटलेले, ओठ किंचित वाकडा करून तिचं हसणं – लाजून का काय म्हणतात तसं! सगळ्यांनीच आग्रह केला आणि ती हळूच उठली आणि बाबांच्या शेजारी संकोचून बसली. प्रत्येक जोडप्यावर विनोद चालले होते. आम्हाला काही कळत होते, काही कळत नव्हते. ऐकत मात्र होतो. बनेश्वरसाठी बस फाट्यावर वळली आणि परत बंद पडली. पुन्हा तेच. बस ढकल्णे इ. इ. मुलं मात्र एव्हाना प्रचंड रंगात आली होती. माम्या आईला थालिपीठाबद्दल विचरत होत्या. काहीजणी एकमेकात कुजबूज करत बसल्या होत्या. मामा-काका काय विषयांवर बोलत होते कोण जाणे. एकदची बस बनेश्वरला पोचली. मुलांना उतरायची भयंकर घाई. एकामेकांना ढकलत-ढुकलत उतरली. कोणीतरी रडलं, पण त्याच्या आईला पत्ताच नव्हता. किती वाजले होते कोण जाणे. आचारी आणि मामानं मिळून मोकळी जागा शोधली. दगड मांडून चूल लावली. सगळ्यांना भूक लागलेली होती. “अरे ते थालिपीठ कुठे हे? काढा ना आता. चला गं सुधा, काय नुसतं वासासाठी ठेवलंय की काय? अशी शेरेबाजी सुरू झाली. आई उठली. मावशीला घेतलं बरोबर. मामाही आला. त्या पातेल्यावरचं ताट एका चटईवर खाली ठेवलं. तिघांनी पातेल्याला हात लावला, एकानं वरती काठाला, दोघांनी पातेल्याच्या तळाला. सगळ्या देवांची नावं घेतली. उचललं. हळूच त्याचा काठ ताटाला टेकवला आणि पटकन पातेलं उपडी केलं. उपडी केलेलं पातेलं तळाला तिघांनी धरून परत इंचभर उचललं आणि जरा जोरात ताटावर आपटलं. आई सतत साईबाबाचं नाव उच्चारत होती. अखेरीला पातेलं पूर्ण उचललं. एकदम तो बुवा प्रगटला. थालिपीठ्बुवा. सुंदर पातेल्याच्या आकाराचा तो एक मोठ्ठा केकच, फक्त तिखट. वरती फोडणीयुक्त तांबूस रंगाची खरपुडी. खालच्या बाजूला पण नक्की असणार. वर आणि खाली ठेवलेल्या कोळशांची करामत. “अरे, पण कोयता आणलाय का?” हा ठोकळा कापायला कोयताच हवा होता. आईनं अर्थातच आणला होता. झक्क काळा, पण धारदार. तिनंच अलवार त्याला मधोमध कापला, एकमेकापासून अलग केला. बशीजोगे लहान लहान लांबट चौकोनी तुकडे केले. तळालापण सुंदर तांबूस रंगाची खरपुडी होतीच. आचारीकाकांनी तोवर मस्त गरम गरम चहा बनवला. सगळे पाण्याचे पेले काढून प्रत्येकाला त्यात ओतून दिला. एकेक जण उठून थालिपीठकडे जाऊन एकेक तुकडा घेऊन एका हातात चहा आणि एका हातात थालिपीठ खाताना दिसत होते.. पोरासोरांसकट सगळ्यांनी नाकानं सू सू आवाज करत, तोंडाने स्स स्स आवाज करत, नाक आणि डोळ्यातून पाणी गाळत थालिपीठावर यथेच्छ ताव मारला. विजयमामानं शेवटी ताट चाटून पुसून खाल्लं. मिळेल त्या पदराला, फडक्याला, किंवा आपापल्या कपड्यांना मुलांनी हातांची सफाई केली. गेली सगळी हुंदडायला. बायकांना स्वैंपाकाचं वगैरे काहीच काम नव्हतं. पुन्हा एकत्र, दोघा-तिघात. चार-चौघात अशा गप्पा-गॉस्सिप सुरू झाले. विजयमामाच्या बसबद्दल बरंच कौतुक, जरा चेष्टा, काही खवचट, काही कुचकट बोलून झालं.
यथावकाश जेवणं झाली. बराच वेळ माम्या-मावशा सुस्तावल्या होत्या त्या चटाचट कामाला लागल्या. साडेचार वाजून गेले. मुलं खेळून दमली. आपापल्या आयांच्या जवळ येऊन बसली. चला-उठा असं सुरू झालं. सगळं सामान बसच्या दिशेने निघालं. सगळ्यांनी थालिपीठ आवडीनं खाल्लं आणि संपवलं म्हणून आई खुशीत होती. बसचा ड्रायव्हर आधीच बसमधे बसून बस सुरू करून आमची वाट बघत बसला होता. सगळे बसमधे बसले. बस सुरू झाली. आमच्या आईचा साईबाबाचा जप सुरू झाला. बस छान चालली होती. सातारा-पुणे रोडला लागली. जरा पुढे आली आणि प्रचंड मोठ्ठा आवाज करून थांबली. बंद पडली. सकाळसारखा कार्यक्रम सुरू झाला. बस ऐकेचना. यावेळी सगळ्यांना खाली उतरवलं. बस ढकलली. जेमतेम 10-12 फूट पुढे जायची आणि थांबायची. तिनं असहकारच पुकारला. बसमधून परत सतरंज्या वगैरे काढल्या. रस्त्याकडेला चांगलीशी जागा बघून अंथरल्या. बस बंद पडली की मोठी माणसं गंभीर व्हायची. मुलं चेकाळायची. मज्जाच वाटायची त्यांना. रस्त्याच्या पलिकडे वडाची खूप झाडं होती. त्यांच्या पारंब्या मुलांना – अगदी माझ्यासकट – खुणावत होत्या. भराभर मुलांनी रस्ता ओलांडला. आयांचा विरोध एव्हाना कमी झाला होता. मला आठवतं तसं त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहतूकही नव्हती. तास हो ऊन गेला. मुलं पडली, रडली, खेळून दमली. आयांच्याकडे परतली. पेंगुळ्ली. मामा वगैरे लोक काय करत होते कोण जाणे!. अंधार पडायला लागला. आणि एकदम बस सुरू झाल्याचा आवाज झाला. सगळे बसमधे आले. बसचा आवाज सोडून सगळं गपगार झालं होतं. त्यानंतर मात्र कुठेच बंद न पडता बसनं सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडलं. सर्वात शेवटी आमचं घर. सगळे दमले होते. आई मात्र घरी पोचल्या पोचल्या एकदम उत्साही झाली. मामाशी खूप बोलत बसली होती. एका बाजूला आमचा स्वैंपाक. मामाला चहा दिला. मामाचं खूप कौतुक केलं. म्हणाली,” इतकं धाडस तर आपल्यात आतापर्यंत कोणीच केलेलं नाही.” मामा निघण्यासठी उठला. दरवाजातून बाहेर पडता पडता म्हणाला, “सुधा, बसचं सोड, अरे, थालिपीठ काय सुंदर झालं होतं गं” अधाशासारखं खाल्लं सगळ्यांनी. आता ट्रीप नाही, पण खास तुझ्या थालिपीठाचा कार्यक्रम नक्की करायचा.” आई मागे वळली. मला वाटलं की तिच्या सुंदर मोठ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.                            





  

Thursday, 2 May 2019




मोदीच पुन्हा निवडूनच नव्हे तर जिंकूनही यावेत..

श्रीकांत आगवणे

२०१४ च्या निवडणुकीत विकास, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, भ्रष्टाचारमुक्त भारत या लाटेवर स्वार होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले! त्या निवडणुकीतही माझं मत मोदींना नव्हतं. इंदिरा गांधींनंतरच्या काळात वाढलो असल्यानं आणि थोडंफार असलेलं डोकं खांद्यावर अजूनही असल्यानं ते काँग्रेसलाही नव्हतं. यावेळच्या निवडणुकीत काय केलं? NOTAचा नेहमीचा निद्रिस्त अवस्थेतला पर्याय होताच. मी जरी मोदींना मत दिलं नसलं तरी मला ‘मोदीच पुन्हा जिंकून येवोत’ असं वाटतं!!

साल २००४. नॅशनल इन्स्टिट्यूटचं हॉस्टेल. देशभरातून आलेली मुलं. जागतिकीकरणोत्तर, उदारीकरणोत्तर ही पिढी. रात्रीच्या चकाट्या पिटताना १९९२ चा विषय निघाला. रात्र कोलकात्त्याची होती आणि हवेत अजूनही सोशॅलिझमचा ऑक्सिजन होता. एकानं वेगळा विचार मांडला- जर समजा आपली गंगाजळी पूर्ण आटली असती, NRI इंडियन्सकडून देशात परकीय चलनाचा ओघ सुरू नसता झाला, तर काय झालं असतं? डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंहराव यांचं नियोजन, दूरदृष्टी यांचं जे आख्यान आपण लावतो, ते कदाचित नसतं. पूर्ण अर्थव्यवस्था झोपली असती. भारत देश एका रात्रीत दूर गोष्टीपल्याडच्या आफ्रिकेतल्या निबिड देशांच्या रांगेत उभा असता? रेशनच्या दुकानासमोर असलेल्या रांगा आणखी मोठ्या झाल्या असत्या? या रांगा (लॅटिन अमेरिका- पूर्व युरोपच्या) रिकाम्या सुपर मार्केटपुढच्या रांगांपेक्षा भेसूर-भयाण असत्या? नक्कीच नसत्या! शेती करणारा देश युद्धात कधीच हरत नसतो, हे सार्वकालिक सत्य खोटं ठरलं असतं? भारतात १९९२ पर्यंत तरी ७० टक्के लोक शेतीच करत होते!

जगाच्या इतिहासातला भीषण बंगाल दुष्काळ मनुष्यनिर्मित होता. आफ्रिकेतल्या अन्नान दशेला लागलेली मरणप्राय प्रजा हे सारं मानवनिर्मित. वसाहतीच्या लुटमारीतून मिळवलेल्या बक्कळ पैशातून श्रीमंत झालेले, नव्या जमान्यात भांडवलशाहीचा काटेरी पंजा घालून ओरबाडणारे आणि भांडवलशाहीच्या आहुतीत नवीन बळींची तजवीज होण्यासाठी डंकेल मांडणारे, हे सारे-सारे युरोपियन असावेत, हा काही योगायोग नाही!

डंकेल आणि गेटशी फारकत घेतली असती तर काही काळ या देशाला त्रास सहन करावा लागला असता. निओ-लिबरलच्या काळात ‘सोशल वेलफेअर स्टेट’ अवस्थेतून बाहेर पडत असताना त्रास भोगावा लागलाच असता. तो सहनही केला असता (‘मला ५० दिवसांची मुदत द्या’सारखी घोषणा सुरू करावी लागली असती!). त्याचा त्रास हा त्या पिढीला नवीन नव्हता. या पिढीनं लहानपणी शाळेच्या वर्गात चरख्यावर हातरुमाल कातला होता, तरुणपणी लाल बहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून सोमवारी उपवास ठेवला होता आणि जॉर्ज फर्नांडिसच्या खांद्याला खांदा लावून कोका कोल्याला ‘बाय बाय’ केला होता! या पिढीला स्वप्नं होती, पण सुख लुबाडण्याचा हव्यास नव्हता. त्या पिढीवर विश्वास ठेवून देशाला परत एकदा नेहरूविअन दृष्टी देऊ शकलो असतो! क्युबासारखी एक वर्ष कॉलेजेसना सुट्टी देऊन सर्व साक्षरता मोहीम सुरू केली असती, इराणसारखी स्वस्त आरोग्य व्यवस्था उभी करू शकलो असतो, जर्मनीसारखी शहरात पण शेती करण्याची सोय करून श्रमसंस्कार केले असते!

यांसारख्या प्रॅक्टिकल योजनांची अतिआदर्शवादी स्वप्नं म्हणून टिंगल करणारा, बुद्धिभेद करणारा वर्ग भांडवलशाही शिक्षण व्यवस्थेनं आधीच तयार करून ठेवला होता. अमेरिकेनं विद्यापीठांत सेमिनार, पेपर रिडिंग, सिम्पोझियम या हत्यारांनी अख्खा बोलिव्हिया लुबाडला. त्यांच्यासाठी भारत देश सुपिक होता… आणि आपण भांडवलशाही रक्तपिपासू जगापासून वेगळे पडलो असतो. पण अलिप्ततावादी देश म्हणून जेवढी इज्जत आणि दरारा होता, तोच दरारा आपण आर्थिक अलिप्ततावादी म्हणून ठेवू शकलो असतो.

क्युबा, पॅराग्वे, इराण, भूतान, इस्टोनिया यांसारख्या खिजगणित नसलेल्या देशांसारखे आपण स्वनिर्भर असतो. आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, समाधान या निकषांवर आपण वरचढ असतो, पण आपण कष्टाचा, सत्याचा लांबचा मार्ग सोडला! शॉर्टकट भांडवलशाहीला शरण गेलो. मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थेऐवजी आपण स्वस्त मनुष्यपुरवठा करणारी कॉलेजेस बांधली. ‘आम्ही कामगारांचे चीन-तैवानपेक्षा अधिक शोषण करू’ अशी आश्वासनं देऊ देऊ फॅक्टऱ्या आणल्या. कामगारांना पर्यटन-भत्ता(!) देऊनही नफा कमवणाऱ्या कंपन्या आपण विकृत अर्थशात्रीय नियमानं कवडीमोलानं विकल्या. ‘अंथरून पाहून पाय पसरावेत’चं परंपरागत शहाणपण आपण बाजारात विकून खाल्लं, शेअर बाजार कशाहीपेक्षा पाऊस चांगला येणार, या बातमीवरच उसळतो, या उशिरा आलेल्या अकलेचाही कांदा करून झाला… आणि एकीकडे भूकबळी, तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या इतकं वाईट दुष्टचक्र भोगायचं नशिबी आलं!

असो. या जर-तरच्या गोष्टी. इतिहास बदलता येत नाही, पण शिकता येतो. गेलेली संधी परत येत नाही, पण पुढची चूक करू नये ही संधी तर आपल्या हातात असते!

आता ही वेळ आली आहे. मोदी जिंकून यावेत! घसघशीत मतांनी निवडून येवोत!! माझ्या हातात नील चीझमन आणि ब्रिअन क्लास या प्रोफेसर दुकलीनं लिहिलेलं ‘How To Rig An Elction’ची प्रत आहे. निवडणूक आधी जिंकायची असते आणि मग निवडणुकीला उभं राहायचं असतं, अशा उदाहरणांनी या पुस्तकाची पानं भरली आहेत. सध्या लोकशाही हा जगभरातल्या हुकूमशहांना सत्तेवर येण्याचा ‘सरधोपट राजमार्ग’ आहे! उगाच का अमेरिका-युरोप ‘तेल’ देशांना ‘बऱ्याबोलानं वागा, नाहीतर लोकशाही निर्यात करू‘ अशी धमकी देतात!!

सिंगापूरच्या च्युइंगमवर बंदीचं कौतुक असलेल्या आणि तरीही त्या मुर्दाड हुकूमशाहीला पाहू न शकणाऱ्या भारतीयांसाठी मोदींनी परत यायला हवं! पाकिस्तानच्या इमरान खाननं मोदींची जाहीर चुम्माचाटी करूनही ज्यांना अणुबॉम्ब वापरायची खुमखुमी आहे, त्यांच्यासाठी ‘राजे, तुम्ही परत या’च्या चालीवर ‘मोदी, तुम्ही परत या!!’

मोदी निवडून आल्यावर काय होईल? तर नोटबंदीच्या अमाप यशाबद्दल चकार शब्द न काढणारं ‘मोदी सरकार’ परत पुन्हा नव्यानं एक फतवा काढेल, एका झटक्यात देश रस्त्यावर आणेल. नोटबंदी जारी  झाल्यावर मी देशाबाहेर होतो. उपग्रहातून पृथ्वी जशी सगळ्या परिप्रेक्ष्यातून दिसते, तसा भारत परदेशातून दिसतो, मग तुमची दृष्टी कितीही वेगळी असो! २४ तासांच्या आत या ढिसाळ निर्णयाचा परिणाम दिसू लागला होता. होत्याचं नव्हतं झालं होतं. आरक्षण, संविधान यासाठी कधीही रस्त्यावर येणार नाही, याची जेवढी खात्री होती, त्याहीपेक्षा खिशात हात घातल्यावर हा देश, ही नव-श्रीमंत, चंगळवादी स्वतःच्या हक्काबद्दल अति जागरूक जनता नक्कीच रस्त्यावर येईल ही अपेक्षा होती!

२६/११ च्या वेळी तीन दिवस मुंबई सुन्न होती. ताजची कोंडी फुटल्याबरोबर सारी मुंबई ताजसमोर आली. घोषणा दिल्या, नारे दिले, लिओपोल्डमध्ये जाऊन बिअर पचवल्या… पण किमान ते तरी केलं अशी म्हणायची वेळ आली! कोणी रस्त्यावर आलं नाही. सगळे एकटे पडले. सगळे एकटे असतात म्हणून तर माणूस पक्ष, युनियन, संघटना यांत भागीदार होतो. इथं तर सगळे चिडीचूप.

कोणीतरी पहिल्यांदा रस्त्यावर यायच असतं, मग मागे लोक जमतात हे सर्व लोक विसरले? कि कुठल्या गुंगीत त्यांनी ही आक्रमकता विझवून टाकली होती? हीच का ती जनता जिने पाकिस्तानचे तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींना घरी बसवलं होतं? हीच का ती जनता जी आंबेडकर, नेहरू, गांधी या प्राचीन इतिहासातल्या आणि अर्वाचीन काळातल्या पुल, तेंडुलकर, राजेश खन्ना, ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला रस्त्यावर उतरली होती? निर्भया, अण्णाच्या ‘लोकपाल’साठी जमली होती? पैशासाठी नाही, तर मग आता कशासाठी ही जनता उतरणार रस्त्यावर? क्रिकेटसाठी, जातीसाठी, धर्मासाठी, देशासाठी?

देश म्हणजे काय? पाकिस्तानच्या अल्याडचा म्हणजे माझा देश? की यातले लोक म्हणजे माझा देश? लोक म्हणजे कोण? माझ्या जातीतली? २००० च्या नोटेनं भ्रष्टाचार कमी होणार यावर जर सगळ्यांचा विश्वास होता, तर खरंच मोदी परत येवोत! त्यांनी परत ‘तुघलकी निर्णय’ घेवो. ‘तुघलक’बद्दल मला राग असण्याएवढा माझा इतिहासचा अभ्यास नाही, पण एवढा नक्कीच आहे की, भारत हा काही मध्ययुगीन काळात नाही, जिथं एक माणूस त्याच्या मनाला येईल असा निर्णय घेईल आणि एका रात्रीत १००-१५० जणांचा बळी  घेईल!

सुट्टी जोडून संप करणारे आणि लाच घेताना पकडले गेलात तरी अर्धा पगार हाती येईल, अशी कायम नोकरी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांची युनियन पण गप्प बसली? तिनं का नाही कामकाज बंद करून देश ठप्प केला आणि मोदींना उत्तर द्यायला भाग पाडलं? का म्हणून मोदी जपानमध्ये हसत भाषण देत होते? मग का म्हणून मी बँक कर्मचाऱ्याबद्दल, त्यांच्या मागण्याबद्दल सहवेदना ठेवावी?

कोणीतरी फेसबुकवर म्हटलंय की, जेव्हा पुस्तक रस्त्यावर आणि चपला एसी दुकानात जातील, तो खरा ‘काळ’! अशा काळात पैसे, पैसे आणि पैसेच! उच्चशिक्षण फक्त पैसे मिळवण्यासाठीच घ्यायचं. आयआयटी, आयआयएम, एम्समधून शिकणारे आणि ABVP सारख्या संस्थेत जाऊन मेंदू बाजूला काढणारे लोक तुमच्या आसपास आहेत का? त्यांच्या सेवावृत्तीबद्दल आदर आहे का? आहेर द्यायच्या लायनीत उभे राहणारे आणि खाण माफियाशी साटंलोटं असणारे पर्रीकर तुमचे आवडते नेते होते का? पूर्वोत्तर भारतात जाऊन हिंदू धर्म वाचवणारे तुम्हाला धर्मरक्षक वाटतात का? पुतीन आणि अजित डोवाल हे तुम्हाला कणखर वाटतात का? ‘URI’ सिनेमा बघून तुमचा उर भरून आला का? बुलेट ट्रेन आणि भव्य विमानतळ म्हणजेच विकास या तुमच्या कल्पना आहेत का? बंगाल-केरळात येता-जाता संप असतात. तिकडे मोलकारीणीच्या संघटना असतात, याची तुम्ही खिल्ली उडवता का? या साऱ्यांची उत्तर ‘होय’ असतील (किंवा असतीलच) म्हणूनच मानवी हक्क, सद्भावना, मानवता, बंधुत्व हे बोलणारे लोक ‘जोक्स’ बनतात!

२००० लोकांच्या कत्तली होवोत किंवा तितकेच बलात्कार, कोणाला फरक पडतो? पुराणकथेतल्या रामावरून जर दंगली होत असतील, तर प्लास्टिक सर्जनाचा आविष्कार असलेला गणपती का मागे राहील? अखलाक नावाचा एक माणूस निव्वळ अफवा उठली म्हणून मारला जातो आणि त्याचं समर्थन केलं जातं; तो देश, रवांडा-कांगोचा दहा लाख लोकांचा कत्तलखाना बनण्यापासून किती दिवस लांब आहे?

लाखो लोंकाच्या कत्तली झाल्यावर आज जर्मनीत हिटलरचं नामोनिशाण नाही. चूक उमजल्यावर येणारं शहाणपण त्यांच्यात आलंय. जरी ते उशिरा आलेलं असलं तरी ते खूप महत्त्वाचं आणि कायमस्वरूपी आहे. तिथं एक तर तुम्ही हिटलरच्या विरुद्ध असता नाहीतर निओ-नाझी असता. आपल्यासारखं काठावर नसता. पुण्या-मुंबईच्या लोकांचे जर्मन मित्र एकाच वेळी निओ-नाझीचेही मित्र नसतात, ते नसतात म्हणूनच तुमचा मुलगा जर्मनीला आहे याचं कौतुक करू शकता. भारतीयांनी भेटेल त्या जर्मन माणसाला ‘हिटलर’ या विषयावर बोलू नये, अशी सक्त ताकीद जर्मन भाषेच्या पहिल्या वर्गात देण्यात येते!

पुण्यात एक आणि पाँडिचेरीत एक, अशी दोन दुकानं तरी मला माहित आहेत, ज्यांची नावं ‘हिटलर’ अशी आहेत. त्या दुकानात जाणाऱ्या लोकांना ‘हिटलर’ क्रूरकर्मा होता, हे राज ठाकरेंच्या भाषणाआधीही ठाऊक होतं का? आपल्या आत एक मोदी आहेत, ज्याला मुसलमान, अर्बन-नक्षल यांना भर चौकात ठेचून मारायचं असतं, त्यांच्या घरात घुसून मारायची सुप्त इच्छा असते… त्यांना जिवाच्या आकांतानं पळून आश्रयाला आलेल्या रोहिंग्यांना हाकलून देणं म्हणजे मर्दपणाची कृती वाटते.

आपल्याला बुद्धाच्या-महावीरांच्या-केशकंबलीच्या नास्तिक भारताबद्दल माहीत नसतं; १६०० भाषा असलेल्या भारताबद्दल माहिती नसतं; बहाई, पारसीसारख्या लाथाडल्या गेलेल्या धर्मियांचा देश म्हणजे भारत ही ओळख ज्यांना नको असते, ते आपणच असतो का? असे आपले मित्र असतात आणि त्यांना आपण तसंच असू देतो का? त्यांना त्यांची चूक दाखवणं म्हणजे ट्रोलिंग करणं असं वाटून तरी ब्लॉक करतो का? सभारंभात मांडीला मांडी लावून बसतो का? ‘तो माणूस म्हणून वाईट नाही’, ‘तो आपला यार आहे’, ‘ती आपली बायको/ तो आपला नवरा आहे’ असं म्हणून कानाडोळा करून सोडून देतो का? ताटातलं अन्न हे swiggy तून नाही तर शेतातून येतं, हे साधं शास्त्र माहीत आहे का?

‘पप्पू’, ‘गुंगाबाबा’ अशा नावांनी चिडवल्या जाणाऱ्या लोकांची सौम्यता, ऋजुता जाणवते का? मौनीबाबा आणि पाच वर्षं पत्रकारांना सामोरा ना जाणारा पंतप्रधान यातला फरक कळतो का? छायाचित्रांचा हव्यास असलेल्या माणूस आपल्याला दिसतो का? अमेरिकेपुढे मिंधं होऊन पुरात अडकलेल्या इराणच्या मदतीला ‘हो’ न देणारी ५६ इंचाची छाती दिसते का? जगाच्या नाकावर टिच्चून इजिप्तला त्याचा सुवेझ कालवा देणाऱ्या पंतप्रधानावर तुम्ही व्हॉट्सअॅपवर जोक्स शेअर करता का? बुलेट ट्रेनचं अव्यवहारी गणित दिसतं का? स्वतःला आध्यात्मिक म्हणवणाऱ्या सडेल बाबांच्या दुकानदारीत लाईन लावताना तुमचा मेंदू जागेवर असतो का?

आपल्याला कशाचंच काहीच कळत नसेल, वाटत नसेल, आपण आपल्या सेल्फीमग्नतेमधून स्वमग्न अवस्थेत गेलो असू, तर मोदी परत येवोत. आपल्या आतला सैतान जागा होवो. दंगलीची जाळपोळ आपल्या घरापर्यंत घुसो, आपल्या सुरक्षित असलेल्या घराचं घरपण गळो, किचनमध्ये घुसून काय शिजवलंय, तुम्ही बेडरूममध्ये काय पाहता, हे तपासून पाहण्याची सनद आपल्या शेजारच्याला मिळो, आपल्या गर्लफ्रेंडला-बहिणीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके मिळोत, सौदी अरेबियासारखा ‘शिस्तबद्ध’ असा हा देश होवो, संस्कार-पोलिसांचे जत्थे रस्त्या-रस्त्यावर फिरोत, आपण सारे एकमेकांचे पोलीस बनून सारा देश एक मोठा तुरुंग बनो... मोदी परत येवोत... मोदी परत येवोत...

नामदेव ढसाळ यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे हा देश एका गळूसारखा होवो. मोदी पुन्हा निवडून आले नाहीत, तर हे गळू पिकणार नाही, सुकणार नाही... ते तसंच आतल्याआत ठसठसत राहील. परत हे गळू कधीही येईल ही भीती राहीलच. त्यापेक्षा मोदी परत येवोत, हा देश आपल्या साऱ्या दोषांसकट गळूसारखा पिकून येवो… फसफसून पू भरलेल्या जखमेसारखा होवो... असह्य वेदना होतील, पण एकदाचं हे गळू फुटेल, सारा पू  वाहून जाईल... आणि ही जखम कायमची भरून येईल…

लेखक श्रीकांत आगवणे मुक्त फिल्ममेकर आहेत.

Sunday, 18 November 2018

*टाइमबँक*

          स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका  ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

          मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

          एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम  आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

          सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

          ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच*करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ वकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

*बघा विचार करुन*

हा लेख मी वाचला, मला संकल्पना आवडली म्हणून लेख स्वतः टाईप केला आहे. काही शाब्दिक चुका असतील त्या माझ्या आहेत.
(लेखकाचे नाव माहित नाही.

Tuesday, 18 September 2018

Rajendra Dakhane

*अडगळीत_गेलेले_शब्द*
.
.
‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की *‘अडगळ’* हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.
.
.
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.
.
.
जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. *ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर* हे शब्द विसरायला झाले आहेत.
.
.
*माळा* (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
.
.
तसंच आता *व्हेंटिलेटर* फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.
.
.
*‘वळचण’* हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
.
.
*पागोळं* म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात - ती पागोळी.
.
.
*‘फडताळ’* ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. *खुंटी, कोनाडे, देवड्या* हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
.
.
जुन्या घरातील *न्हाणीघर* (बाथरूम) असंच. ऐसपैस *चुलाण्यावर* पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी *चौरंग,* अंग घासायला *‘वज्री’, ‘घंगाळ’* असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
.
.
गृहिणीची *कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या* सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
.
.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला *‘आगवळ’* म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
.
.
.

स्वयंपाकघरातील *चूल* गेली त्याचबरोबर *चूल,वैल,निखारे* हे शब्दही गेले.
.
.
स्वयंपाकघरातील *सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज* हे शब्द आठवेनासे झाले.
.
.
*ओगराळं* हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
.
.
*पंचपाळे, चौफुले, कावळे* हे सगळे हरवले.
.
.
देवघराबरोबर *सहाण, गंधाची थाटी* गायब.
.
.
*‘काथवट’* हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
.
.
कपड्यांचा विचार करताना *तठव,जाजम,बसकर, सुताडे* सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
.
.
पण उत्तरवस्त्र *‘पाभरी’* हरवून गेली.
.
.
सोवळ्यात नेसण्याची *‘धाबळी’* सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
.
.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
.
.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण *कणग्या, ढोल्या* - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.
.
.
*सूप* खुंटीवरून बाउल मधे आलं.
.
.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे *‘पेव’* खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
.
.
जेवण्याची *पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक* वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर *पिकदानी* सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ *अडकित्त्याचा* हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला *चोप* म्हणत असत..घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला *बैठक* असायची ,तिला *ढाळज* किंवा *ढेळज* म्हणत..हे पण अडगळीतील नावे आहेत ...
.
.
.
लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच....
( Rajendra Dakhane

Saturday, 15 September 2018

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
            *सन: ७/२/१९५८*

      *.... गणपतीचे रहस्य ....*

(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)

   पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा

_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._

_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._

_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._

_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._

_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._

_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._

_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._

_चित्त आणि मल्ल._

_चित्त म्हणजे शरीर,_ 
_मल्ल म्हणजे मळ._

_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावूनपार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला._

_तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे._

_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!_

_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??_

        *…अष्टविनायक…*

_जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला._

_म्हणजे दुखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत._

_मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले._

_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे._

_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपति सुखकर्ता दुखहर्ता होउ शकतो काय...???_

_काल्पनिक गणपतिने बुद्धत्व प्राप्त करुन दुक्खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही._

_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???_

_बुद्धाने दुक्ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत._

_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपति हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे...!!!_

_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले..._

          *…मोरया…*

_पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्रह्मंनानी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या._

_मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे....!!!_

_कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे._

_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!_

_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली._

_ब्रह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर_

_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले._

_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._

_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._

_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._

_कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता._

_पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला._

_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला._

_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि  सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात._

_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो._

 *- प्रबोधनकार ठाकरे*
    *सन: ७/२/१९५८*

Vijay sir 👌👌👍

Tuesday, 11 September 2018

वॉटस्ॲपवरून पाठवलेली -- पुणे, मराठी इ.इ.

*#पुणे*

हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले 'यम'नियमही स्वतंत्र आहेत.

वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता 'अमृततूल्य' म्हणतो

पुणे-मुंवई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. - गुगलवर मराठी टाईप करताना अद्  भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, 'गणपती बघायला आले आणि इथेच राहिले' या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत
चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी -

*एका वाक्यात उत्तरे द्या*
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

*खालील विषयांवर निबंध लिहा -*
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार - अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

*सविस्तर उत्तरे द्या -*
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

*हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. -*
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३.  पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

*योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा - (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) -*
१. पुणेकर ..... असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले ...... आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ..... आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ..... असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे.
पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे.

*पुण्यवान पुणेकर*