Tuesday, 18 September 2018

Rajendra Dakhane

*अडगळीत_गेलेले_शब्द*
.
.
‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की *‘अडगळ’* हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.
.
.
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.
.
.
जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. *ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर* हे शब्द विसरायला झाले आहेत.
.
.
*माळा* (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
.
.
तसंच आता *व्हेंटिलेटर* फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.
.
.
*‘वळचण’* हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
.
.
*पागोळं* म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात - ती पागोळी.
.
.
*‘फडताळ’* ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. *खुंटी, कोनाडे, देवड्या* हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
.
.
जुन्या घरातील *न्हाणीघर* (बाथरूम) असंच. ऐसपैस *चुलाण्यावर* पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी *चौरंग,* अंग घासायला *‘वज्री’, ‘घंगाळ’* असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
.
.
गृहिणीची *कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या* सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
.
.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला *‘आगवळ’* म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
.
.
.

स्वयंपाकघरातील *चूल* गेली त्याचबरोबर *चूल,वैल,निखारे* हे शब्दही गेले.
.
.
स्वयंपाकघरातील *सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज* हे शब्द आठवेनासे झाले.
.
.
*ओगराळं* हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
.
.
*पंचपाळे, चौफुले, कावळे* हे सगळे हरवले.
.
.
देवघराबरोबर *सहाण, गंधाची थाटी* गायब.
.
.
*‘काथवट’* हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
.
.
कपड्यांचा विचार करताना *तठव,जाजम,बसकर, सुताडे* सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
.
.
पण उत्तरवस्त्र *‘पाभरी’* हरवून गेली.
.
.
सोवळ्यात नेसण्याची *‘धाबळी’* सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
.
.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
.
.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण *कणग्या, ढोल्या* - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.
.
.
*सूप* खुंटीवरून बाउल मधे आलं.
.
.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे *‘पेव’* खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
.
.
जेवण्याची *पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक* वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर *पिकदानी* सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ *अडकित्त्याचा* हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला *चोप* म्हणत असत..घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला *बैठक* असायची ,तिला *ढाळज* किंवा *ढेळज* म्हणत..हे पण अडगळीतील नावे आहेत ...
.
.
.
लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच....
( Rajendra Dakhane

Saturday, 15 September 2018

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
            *सन: ७/२/१९५८*

      *.... गणपतीचे रहस्य ....*

(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)

   पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा

_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._

_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._

_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._

_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._

_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._

_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._

_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._

_चित्त आणि मल्ल._

_चित्त म्हणजे शरीर,_ 
_मल्ल म्हणजे मळ._

_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावूनपार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला._

_तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे._

_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!_

_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??_

        *…अष्टविनायक…*

_जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला._

_म्हणजे दुखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत._

_मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले._

_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे._

_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपति सुखकर्ता दुखहर्ता होउ शकतो काय...???_

_काल्पनिक गणपतिने बुद्धत्व प्राप्त करुन दुक्खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही._

_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???_

_बुद्धाने दुक्ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत._

_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपति हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे...!!!_

_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले..._

          *…मोरया…*

_पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्रह्मंनानी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या._

_मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे....!!!_

_कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे._

_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!_

_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली._

_ब्रह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर_

_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले._

_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._

_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._

_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._

_कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता._

_पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला._

_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला._

_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि  सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात._

_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो._

 *- प्रबोधनकार ठाकरे*
    *सन: ७/२/१९५८*

Vijay sir 👌👌👍

Tuesday, 11 September 2018

वॉटस्ॲपवरून पाठवलेली -- पुणे, मराठी इ.इ.

*#पुणे*

हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले 'यम'नियमही स्वतंत्र आहेत.

वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता 'अमृततूल्य' म्हणतो

पुणे-मुंवई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. - गुगलवर मराठी टाईप करताना अद्  भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, 'गणपती बघायला आले आणि इथेच राहिले' या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत
चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी -

*एका वाक्यात उत्तरे द्या*
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

*खालील विषयांवर निबंध लिहा -*
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार - अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

*सविस्तर उत्तरे द्या -*
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

*हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. -*
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३.  पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

*योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा - (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) -*
१. पुणेकर ..... असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले ...... आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ..... आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ..... असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे.
पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे.

*पुण्यवान पुणेकर*

Tuesday, 4 September 2018

विवेकवाद
आभाळ का पडत नाही?
गोष्ट आहे विनोबांची.  आज तीव्रतेने आठवण झाली. ऐका –
एका गावातल्या एका तरूणाला एकदा प्रश्र्न पडला की डोक्यावरच्या या आभाळाला टेकू द्यायला खांब नाहीये, पण मग ते पडत कसं नाही?
या प्रश्र्नाने त्याच्या मनात घर केलं. त्याची तहान, भूक, झोप, शांती आणि इच्छाशक्ती हरवून गेली. साधू-संत, देवऋषि-महर्षि, गुरूजी-पुजारी आणि सर्व देवभक्त सर्वांना विचारून झालं. कोणालाच उत्तर ठाऊक नव्हतं.
एकदा त्या गावात एक अवलिया आला. दिसत होता भिकारी, पण तेजस्वी! गवकरी म्हणाले ‘जा त्याला विचार तुझा प्रश्र्न’. हा गावकरी गेला त्याच्याकडे.
म्हणाला “तुम्ही देव पाहिलाय का हो? ह्या आभाळाला खांब नाहीये आणि तरी ते कोसळत नाहीये आपल्यावर. सगळे म्हणतात की ते देवानं पेललंय. मला तर बुवा हा देव काही मला भेटला नाही की कोणाला दिसला नाही. तुम्ही इतके हुशार दिसताय, मला एव्हढं उत्तर द्या की.”
अवलिया गालातल्या गालात हसला. त्याला उत्तर ठाऊक होतं. पण ते उत्तर मिळवण्यासाठी एक कठोर परीक्षा द्यावी लागणार होती. गावकरी तयार झाला. अवलिया म्हणाला “उद्या सकाळी लवकर उठ. हातात वाडगा घे. प्रत्येक घरात भीक माग. पण एक अट आहे. कोणतंच घर वगळायचं नाही. घरासमोर उभा राहून हाक मारायची. घरातलं जे कोणी बाहेर येईल त्याला जोरजोरात येतील त्या शिव्या द्यायच्या. हात उगारायचा नाही. सगळी घरं संपली की काय काय घडलं ते मला जसंच्या तसं सांगायचं. परीक्षा कठीण आहे. पूर्ण केलीस तर आभाळ कोणी पेललंय ते कळेल.”
गावकरी अचंबित झाला पण उत्तराची आशा इतकी प्रबळ होती की तो तयार झाला. सकाळी लवकर निघाला. पहिल्या घरासमोर उभा राहून “जरा खायला दे गं माऽऽऽय”, अशी हाक दिली. मायमाऊली हातात भाकरी घेऊन बाहेर आली. या पठ्ठ्यानं शिव्या द्यायचं काम सारू केलं. त्या माऊलीनं त्याला बेदम चोपून काढलं. आणि हाकलून दिलं. बिचारा! तसाच पुढं गेला. उत्तर हवं होतं ना! गावातल्या प्रत्येक घरात हेच घडलं.
मार खाऊन अर्धमेला झाला. अंगावरचे कपडे फाटले. अंधार पडायला लागला. पोटातली भूक सहन होईना. परत निघाला. वाटेत एक मिणमिणता दिवा दिसला. एक झोपडं दिसलं. वाटलं बस्स आता. आता मार खायची हिम्मत नाही. ऐनवेळी अवलियाचा चेहरा आठवला. उत्तराची अपेक्षा वाढली. पाय ओढत ओढत झोपडीपाशी आला. हाक मारली. एक म्हातारी बाहेर आली. यानं शिव्यांची लाखोली सुरू केली. मार खायच्या तयारीत तिच्याकडे बघत होता. तेव्हढ्यात ती म्हातारी पुढं आली. त्याच्या दंडाला धरलं. म्हणाली “अरे येड्या, दमलेला दिसतुयस, जरा आत ये, बस, पाणी पी, भाकरी न् भाजी खाऊन घे. मग काय त्या शिव्या दे.”
गावकरी रडू लागला. खाण्याआधीच त्याचं पोट भरलं होतं. नंतर शिव्या द्यायचं तो विसरून गेला. त्या अवलियाकडे परत जायला निघाला. मनात म्हणाला ‘एव्हढं सगळं झालं पण तो देव किंवा आभाळाला पेलणारा कोणी भेटला नाही.’
अवलियाला सर्व कथा इत्यंभूत सांगितली.
अवलिया म्हणाला, “बाळा, तुझी दृष्टी अधू झालीये. ती म्हातारी आहे ना, ती म्हणजे विवेकाचं प्रतीक आहे. तिनं नुसतं बोट लावलंय आभाळाला. त्यामुळे ते पडत नाहीये. तिच्यात तुला देव दिसेल नीट पाहिलस तर!”


Saturday, 25 August 2018

*एक वेगळा अनुभव*
उत्तम पडियार
ग्राफॉलॉजिस्ट

तुरुंगात एक कैदी गेली ४ ते ५ वर्ष खुनाच्या case मध्ये आहे. तो माझ्या कडून थेरपी घेतोय.
काल मला त्यांनी विचारलं "मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो का?" मी त्यांच्या प्रश्नांसमोर प्रश्न विचारला "का, वैताग आला का?"
त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो, मुद्दाम त्यांच्या शब्दात वर्णन करतो "एका महिन्यात माझी जामीन होण्याची शक्यता आहे, मला ही थेरपी पूर्ण केल्याशिवाय जायची इच्छा नाही"
ज्या व्यक्तीने गेली ४,५ वर्ष घर बघितलं नाही, मोकळ आभाळ बघितलं नाही, त्या व्यक्तीला बाहेर जाण्यापेक्षा जास्त काळजी थेरपी पूर्ण करण्याची आहे.

केलेल्या कामाची पावती याहून अधिक चांगली कोणाला मिळाली नसावी.

मी भाग्यवान आहे, graphology ला धन्यवाद

उत्तम पडियार
९४२३६४७०७८
*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*

Monday, 20 August 2018

*समुपदेशन...*
*एक चांगला मेसेज* अभय शरद देवरे


मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक  परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, "या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या." पण मी त्यांना म्हटलं की "असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही." त्यावर ते म्हणाले, "नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील." शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्‍यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या पण तेसुद्धा स्वीकारले.  कारण तो शिकायला आलेला होता. जरी त्याचे वडील म्हणाले होते की मुलाला तुम्ही काहीही देऊ नका तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते.  महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला तेंव्हा तो नाराज झालेला दिसला पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले. शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी  माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन ! त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ' माती, पंख आणि आकाश ' हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश ! पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले.
नाराजीने त्याने पगार घेतला आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.
हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात. त्याने एक उदाहरणही दिले. सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे.  मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील. आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले शिवाजीमहाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात...... अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ? पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ?  त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.
या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे. एकापत्य संस्कृतीत नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण.  मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही. दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे असे वाटते. 

*@ अभय शरद देवरे*