Saturday, 14 July 2018

हिंदू राज्य म्हणजे काय? नरहर कुरूंदकर

"हिंदुराज्य म्हणजे काय?" - हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे. भारतीय संविधानात स्मृतींच्या कायद्याविरोधी कोणताही कायदा असणार नाही व जो कायदा स्मृतींच्या विरोधी जाईल, तो कायदा रद्दबातल होईल, असे कलम समाविष्ट करण्यास हिंदुत्ववादी तयार आहेत काय? धर्मशास्त्राप्रमाणे हिंदुराज्य करायचे, तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत. अस्पृश्यांचे सगळेच हक्क रद्द करून त्यांना शिक्षणबंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि राजसत्तेने ब्राह्मण अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदु-धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्यरचना हिंदुत्ववादींना मान्य आहे काय? कारण खऱ्या अर्थाने हिंदुराज्य म्हणजे हिंदू प्रजेची संविधानाने स्वीकारलेली व पुरस्कारलेली गुलामी! इस्लामिक स्टेटची कल्पना याहून निराळी नाही. इस्लामिक स्टेट बिगरमुसलमानांना अधिकार देत नाही, हे केवळ अर्धसत्य झाले. इस्लामिक स्टेट धर्मशास्त्राप्रमाणे मुसलमानांनाही अधिकार देत नाही. अधिकार फक्त धर्मपंडितांचे  उलेमांचे; व हेही अधिकार निरपवाद नाहीत. ते मुस्लिम धर्मशास्त्राला सापेक्ष आहेत. हिंदुराज्य म्हणजे हिंदूंची गुलामी, मुस्लिम राज्य म्हणजे मुसलमानांची गुलामी, मग इतरांची गुलामी त्या (दोन्ही प्रकारच्या) राज्यांत अंतर्भूत आहेच.हे सत्य पाहूनही हिंदुराज्याची कल्पना स्वीकारार्ह वाटणार आहे का?

  - नरहर कुरुंदकर [`जागर' (१९६९) पृ १७३]

Tuesday, 10 July 2018

लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*
*मुंबई व इतर शहरे का बुडतात ?* *सतत दुर्घटना का घडतात ?*
अॅड. गिरीश राऊत

 या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खुप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासुन दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.

*मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल*. मात्र मुंबईच्या  काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडले गेले आहे.
सन १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगर पालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की *मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे.* त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो.

६४ च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, कीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी. *परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०•०३ एकर एव्हढेच उरले आहे.* त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.

मुंबई, सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. सन १७८४  सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणा-या सागरातील पहिल्या भरावाचे ( रेसकोर्सपासुन पायधुणीपर्यंत ) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती.  या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी  केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील  असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. *त्याचबरोबर महापूराकडे वाटचाल होत राहिली.*

मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनि:स्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या  दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाऱ्या  मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. *तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते*. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा  जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पूराच्या दिशेने वाटचाल झाली. उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती,  नरिमन पॉईंट, लोखंडवाला  काँम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव,  वांद्रे - कुर्ला संकुल इत्यादी भराव. यातील शेवटच्या 'वांद्रे - वरळी'  सागरी  पुलाच्या, मिठी नदीला गाडणाऱ्या, सागरात जाण्यापासुन अडवणार्या भरावाने व खांबांनी, मुंबईसाठी एका मोठ्या दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे. काँक्रीटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरत्यांना नाहक दोष दिला जात आहे. २६ जुलै २००५ रोजी महापूराच्यावेळी सायंकाळी दुपारी साधारण ३• ३० पासुन रात्री १०• ३० वाजेपर्यंत मोठी ओहोटी होती. भरती नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या आंधळ्या विकासाचे समर्थक प्रसारमाध्यमांद्वारे जनतेची दिशाभूल करतात याची जाणीव असावी.

उत्तरेकडील  बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासुन ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळ पर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या  तीन खाडी टेकड्यांपासुन ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज,  सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतुन माहीमच्या खाडीत येते. या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव ( त्यापैकी सुमारे ७०० एकर  मॅनग्रोव्ह गाडून ) करून नष्ट केली गेली. तेथून ते पाणी   माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम  काॅजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱ्या  प्रभादेवी, दादर - शिवाजी पार्क, माहीम व  वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला 'सी लिंक' प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.

*माहीमची खाडी व माहीमचा  उपसागर हे मिठी नदीच्या मुखाचे,  मॅनग्रोव्हचे जंगल असलेले, शहराच्या गाभ्यातील  क्षेत्र हा मुंबईची मूळ बेटे आणि उपनगरे यामधील दुवा आहे.* शहराच्या जीवनरेखा असलेल्या तीनही रेल्वे माहीमच्या खाडीच्या खाजण क्षेत्रातून जातात.  पूराच्या  दुर्घटनांच्या निवारणाच्या द्रृष्टीने तो अतिशय महत्वाचा  आघातशोषक आहे. परंतु याची जाणीव नियोजनकर्त्यांना नाही.
केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे  बुडत आहेत. नागपूरातही तेच  घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला 'मुंबई', त्यानंतर २८ ऑगस्टला 'न्यू ऑर्लीन्स व त्या पाठोपाठ 'शांघाय' सन २००५ मधे बुडाली.

अमेरिकेत 'ह्यूस्टन' शहरासह  पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे  'हार्वे' नाव दिलेले अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० कि मी वेगाचे  चक्रीवादळ आठवडाभरात दोनदा आदळले. अशावेळी खाड्या, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याची व सागरी रस्ते व भुयारी रेल्वे,  रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.

 *तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बाॅन येथे झालेल्या युनोच्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते जाहीर झाले आहे. एव्हढा 'कार्बन डाय ऑक्साईड' वायू  वातावरणात साठला आहे की, त्याच्या उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे तापमान वाढतच राहणार आहे. कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश तात्काळ  न थांबवल्यास मानवजात व जीवसृष्टी या शतकात नष्ट होणार आहे. म्हणजे *औद्योगिकरण व शहरीकरण हा शाप ठरला आहे.*

महासागरांचे पाणी आणि पर्वत व धृव प्रदेशांवरील बर्फाची, वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची    रूढ अभिसरण पध्दती मोडली आहे. प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे.* त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे. शहरे 'उष्णता बेट' परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या सागराच्या पातळीतील वाढीमुळे  मुंबई, न्यूयाॅर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. आपल्याकडे मात्र तापमानवाढीला अधिक वेग देणाऱ्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई  नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत. प्रसारमाध्यमे हितसंबंधामुळे किंवा त्यांचा सहभाग असल्यामुळे
याला हातभार लावत आहेत. आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.

मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या 'आय पी सी सी' ने हे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. *मेट्रो प्रकल्प व त्यातही  'मेट्रो - 3' हा भुयारी रेल्वे प्रकल्प व 'सागरी रस्ता' हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज  आहे. *माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्व देणे ही चूक आहे.* कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायट्यांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.

वांद्रे - कुर्ला संकुल, मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वांत खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील  रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील    कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले. तेथील इमारतींच्या  तळ मजल्याच्या वर  संकुलाच्या  रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही. असा रस्ता म्हणजे देखील दुर्घटनेला समजुन उमजून आमंत्रण आहे.

आम्ही वरळी-वांद्रे सागरी पुल प्रकल्पाविरूध्द प्रखर आंदोलन केले. मच्छीमारांनी वांद्रे  भूशिराच्या जवळ समुद्रात, क्रेनमधुन टांगलेल्या एक - दोन टन वजनाच्या मोठ्या  दगडांखाली सतत आठ -दहा दिवस होड्या व बोटी लावुन, जीव धोक्यात घालून भराव थांबवला. मुंबई वाचवण्यासाठी  वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागांत व प्रभादेवीच्या समुद्रात भराव करू दिला नाही. माहीम काॅजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला  भरावाचा काही  भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढुन टाकावयास लावल्या. माहीमच्या खाडीत झोपडपट्ट्या करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बर्‍याच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५ च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

*मुंबईला आता  doing ची नसून  undoing ची गरज आहे.* सी लिंक प्रकल्प मुंबईसाठी संकट आहे. तो बंद करून काढून टाकावा. माहीम काॅजवे ते वांद्रे भूशिरापर्यंत केलेला भराव व त्यावरील रस्ता ( येथे पूल बांधला नाही ) हा मागास व हास्यास्पद आहे. त्यामुळे समुद्राची कोंडी होऊन भरत्या मुंबईच्या पर्जन्यवाहिन्यांमधुन उलट शहरात शिरतात. पूर्ण वांद्रे - कुर्ला संकुल ( बी के सी )   मिठी नदीच्या मूळ प्रवाहासह, सागराच्या भरती व ओहोटी रेषांमधील क्षेत्राला गाडून उभे आहे. अशा स्थितीत सर्व नाले , नलिका स्वच्छ आहेत,  गाळ  प्लास्टिक इ. घनकचर्यापासुन मुक्त आहेत, अशी कल्पना केली तरी मुंबई बुडणार आहे. सर्व शहर जलमय झाल्यावर पंप काय कामाचे. साठलेले पाणी एका ठिकाणी उचलून, टाकणार कोठे ? बी के सी मधील इमारती न बांधलेला भरावाचा भाग तर तातडीने काढून टाकावा. जमिनीच्या किंमतीचा विचार करू नये.

'मेट्रो ३ भूयारी रेल्वे' हा बोगस प्रकल्प आहे. तो नियोजनात नव्हता. कोणत्याही वाहतुक अभ्यासाने त्याची शिफारस केली नाही. 'हा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता', हे  याबाबतचे न्यायालयाचे विधान चुकीचे आहे. एम एम आर डी ए ने नागरिकांना दिलेल्या पत्रात कारणे देऊन, मुंबईत भूयारी रेल्वे करू नये असे म्हटले आहे. त्यात मुंबई बुडण्याचे कारणही आहे. प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी म्हणतात की, हरित ऊर्जा वापरू. याबाबत नागरिकांनी किती वीज वापरली जाणार ? व ऊर्जेबाबत  इतर माहिती विचारली. यावर, मेट्रो ३ हा प्रकल्प सुरू झाल्यावर ही माहिती देऊ असे मासलेवाईक, बेजबाबदार उत्तर एम एम आर सी एल कडून मिळाले. या प्रकल्पात ६७३ झाडे तोडली जातील असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात सुमारे १५००० पेक्षा जास्त झाडे आतापर्य॔त तोडली गेली. माहीमच्या खाडीतील मॅनग्रोव्ह जंगल तोडले गेले. सन २०११ मधे या प्रकल्पाचा खर्च २४ ३४० कोटी रू. दाखवला आहे. तो आता वाढत ५००००  कोटी रूपयांवर गेला असा अंदाज आहे. तो अजून वाढेल.  प्रकल्पामुळे मुंबईकरांचे आताच हाल होत आहेत. ९०  ते १२० फूट खोल असल्याने भविष्यात तो मुंबईकरांना बुडवून मारणार आहे असे दिसते. एलफिन्स्टन पुलावर दिवसाढवळ्या घडणारी दुर्घटना हाताळता येत नाही तर १०० फूट खाली माणसांना कसे वाचवणार ?

 फक्त २००० कोटी रूपयात बेस्ट बसचा ताफा दुप्पट, तिप्पट करून व कर्मचार्यांचे   इतर प्रश्न सोडवून मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. गेल्या ३० वर्षांतील सर्व अहवालांनीदेखील बसला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. पण त्याविरूध्द जाऊन अनावश्यक बांधकामयुक्त महागड्या प्रकल्पांचा मारा करण्यात आला. याला बहुतेक मुंबईकरांची, स्वतःला आधुनिक मानून, पटकन खुळावली जाणारी  तंत्रज्ञान संमोहित मानसिकतादेखील कारण आहे. प्रकल्पकर्ते तिचा खुबीने वापर करतात. मुंबईत ठिकठिकाणी जमीन खचत आहे हे दिसत असताना मेट्रो ३  प्रकल्प होऊ दिला तर नंतर अश्रू गाळून उपयोग नाही.
प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याची व तो रद्द करण्याची गरज आहे.

बर्याच  नागरिकांना युरोप, अमेरिकेचे वेड आहे.  तेथील जीवनशैली येथे यावी म्हणून ते आसुसलेले आहेत. त्यावर बोट ठेवून, आपण काहीही खपवू शकतो अशी संबंधित राजकारणी, नोकरशहा, कंपन्या, अभियंते इ. ना खात्री आहे. ते कोणतीही घातक गोष्ट करताना, आपल्याला विकास नको का ? आपण मागास राहणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर नागरिक मागे हटतात व आपण प्रगतीचे विरोधक ठरू नये या भावनेने पूर्ण चुकीच्या प्रकल्पाला विकास मानून, होकार देऊन बसतात.
नागरिकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कृपया याला नकारात्मक विचार समजू नये. *हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱ्या  पृथ्वीची जपणुक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे.* आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक, निराशावादी विचाराचा माणुस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.

तापमानवाढीचे सतत भान हवे. *दर वर्षी १/५° से म्हणजे पाच वर्षात १°से अशी  इतिहासात कोट्यावधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व  वाढ पृथ्वीच्या  सरासरी तापमानात होत आहे.  फक्त येत्या  ४ वर्षांत  सन १७५० च्या तुलनेत २°से ची वाढ  होत आहे.  माध्यमे सांगतात त्याप्रमाणे सन २१०० मधे नाही. मानवजात वाचविण्यासाठी केलेला  'पॅरिस करार' अयशस्वी ठरत आहे.* भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कॅनडात आत्ता उष्णतेची अभूतपूर्व लाट चालू आहे. आतापर्यंत ५०  च्या वर माणसे मरण पावली. जपानमधे तासाला चार इंच असा ऐतिहासिक विक्रमी पाऊस पडत आहे. महापूर आला आहे. ३० लाख  नागरीकांना सुरक्षित जागी हलवले जात आहे व ५० ००० माणसे सुटका करण्याच्या कामाला लावण्यात आली आहेत. या घटनांची जाणीव हवी. त्याऐवजी राजकारण, मनोरंजन, युध्द, उद्योग, तंत्रज्ञान, अर्थव्यवहार अशा बिनमहत्वाच्या हानिकारक  गोष्टीत जग गुंतले आहे.

 विकासाच्या संमोहनातुन तात्काळ बाहेर पडणे आवश्यक आहे. *मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली  जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तरच  कार्बनचे उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश थांबेल.  तसे केले नाही तर औद्योगिकरण कोसळण्याच्या प्रक्रियेबरोबर जीवनही नष्ट होईल.* आशियातील औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या  मुंबईतील दुर्घटना मोठ्या अनर्थाची नांदी आहेत.
धन्यवाद,

आपला
गिरीश राऊत

निमंत्रक : मुंबई रक्षण समिती / भारतीय जीवन व   पर्यावरण चळवळ

दू. क्र. ९८६९ ०२३१२७ व्हाॅ. अॅप.
         ०२२ २४३७८९४८
कृपया सर्वत्र पाठवा.