Sunday, 25 August 2013

charukalp: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार ...

charukalp: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार ...: समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्काराच्या घटना वाढणे यांचा काही परस्पर संबध आहे का? काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे २०००-२००...

समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्कार यांचा परस्पर संबध आहे का?

समाजातील स्त्रियांचे प्रमाण कमी होणे आणि बलात्काराच्या घटना वाढणे यांचा काही परस्पर संबध आहे का?

काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे २०००-२००१ च्या सुमारास सांगली येथे स्त्री-भ्रूण हत्त्ये संदर्भात डॉक्टर्सचे संमेलन आयोजित झाले होते. त्यावेळी सांगलीतील प्रथित यश डॉक्टर्स तसेच आरोग्य अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ एकत्र आले होते.

या चर्चेमध्ये एका मानसोपचार तज्ज्ञांनी (त्यांचे नाव आता लक्षात नाही) असे एक मत मांडले की "ज्या ज्या वेळी समाजात स्त्रियांची संख्या घातली आहे त्या त्या वेळी समाजात स्त्रियांवरील अत्याचार विशेषतः बलात्काराच्या घटना वाढलेल्या आढळल्या. "

त्यांनी त्यावेळी असेही भाकीत केले होते की, इथून पुढे येत्या १०-१२ वर्षात आपल्याला याचे प्रत्यंतर येइलच. आणि आज-काल आपण अशाच प्रकारच्या परिस्थितीतून जात आहोत. गेल्या दहा वर्षात माध्यमांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जागरूकता निर्माण झाली म्हणून या बातम्यांना प्रसिद्धी मिळते हे खरे असले तरी बलात्काराच्या घटना वाढतच आहेत.

आम्हाला खरोखर असे जाणून घ्यावयाचे आहे की समाजातील स्त्री-पुरुष प्रमाण आणि स्त्रियांवर होणारे बलात्कार यांचा काही परस्पर संबध आहे का?

जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा ही विनन्ति.  

Saturday, 24 August 2013

charukalp: "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!"

charukalp: "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!": "मी धर्मनिरपेक्ष आहे याचा मला अभिमान आहे!" काही वर्षांपूर्वी वर्गात मी मुलाना म्हणत असे की "गर्वसे कहो हम हिंदू है " ...